ब- लई भारी लई भारी!
मु.- काय आता? नेमेचि येतो मग शुक्रवार. यावेळी काय?
ब- अरे आता मज्जा एकदम, बघ काय लिवलंय!-
"दोन आठवडे छान रंगीत हेल्दी पदार्थ बनवलेत ना? कंटाळा आला का? तर आता जर बदल करु. रंगीत नको! यावेळी वापरायच्या आहेत पांढर्या भाज्या किंवा फळे! आतून-बाहेरुन कश्याही असोत, वापरायचा भाग पांढरा हवा. करायचं काय? तर वडे, पकोडे, वड्या, भजी, कबाब, कटलेट, पॅटीज, कोफ्ते!!"
मु- अरे वा! शेवटी नेहमीच्या वाटेवर गेले म्हणायचे! 'हेल्दी खाऊया' वगैरे चाललं होतं, त्याचं काय झालं?
ब- बायका कंटाळल्या वाटतं हेल्दी खाऊन :ड पनीर टिक्का, व्हेज बिर्याणी आणि सामिष आहार दिसायला लागला. तसं कधीतरी चालतंय रे, आणि आपला टर्न आला ना आता. आपल्यालाही घेतील. हे बघ पुढं काय लिहीलंय-
"मुळा आणि बटाटा आपल्याला सुरुवातीपासून मदत करतायत. तर त्यांनाही सन्मानानं सामिल करुन घेऊ."
मु- माझे डोळे भरुन आले..
ब- आता नियमांचं आणि मार्कांचं बघू! मग ढसाढसा रडशील
मु- ते आहेतच का पुन्हा
ब- ते नेहमीचे आहेतच रे! मार्किन्ग बदललंय!
मार्किन्ग शिश्टीम.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. १ फोटो - १ मार्क, २ फोटो - २ मार्क इ. इ..
३. मुळा वापरला - ३ मार्क, बटाटा वापरला - १ मार्क
४. कॅलरी तक्त्याची गरज नाही. मुद्दाम दिला तर उणे १ मार्क, मायनस वन!
ब- हुश्श! सोपंय. चला, मला एक तरी मार्क दिलाय.
मु- किती मान दिलाय मला! तुलापण दिलाय रे, कॅलरी तक्ता न ठेवून. नाहीतर पंचाईतच होती.
ब- बरं आता कामाला लागूदे त्यांना. पुन्हा लिवायच्या शाळेत जाणार आहेत म्हणे! त्याआधी पोटभर एकदम कम्फर्टेबल फूड खाऊदेत.
मु- कम्फर्टेबल? :rollingeyes:
ब- मंग? येकदम येनर्जी आली पायजेल एकदम लिवायला!
-----------
आठवडा ३, रंग- पांढरा, पदार्थ- वडे, पकोडे, वड्या, भजी, कबाब, कटलेट, पॅटीज, कोफ्ते!
पळा, पळा!
तळा तळा
उथळ किंवा
खोल-खोल
भाजा, उकडा
चपटे, बस्के
लांबट आणि
गोल गोल.
दुधी, दोडका
मुळा, बटाटा
नारळ किंवा
नवलकोल
अरबट चरबट?
जपून!
नाहीतर..
खाता खाता जाईल तोल!