आज माझं रायगडच्या केल स्मूदीसारखंच काहीसं झालंय. लेकाला आज शाळेतून आल्यावर पॅटीस हवे होते, त्यामुळे सकाळीच फ्लॉवर आणि बटाटा कूकरला लावून आणि हातात चहाचा कप घेऊन मोबाईलवर मै. उघडले आणि ही घोषणा वाचली. म्हटलं अरे वा, आज काहीच वेगळं नाही कराययंय, फोटो काढण्याशिवाय. त्यामुळे माझी एंट्री लगेच आलीच इथे.
फ्लॉवर बटाटा पॅटीस
पांढर्या रंगाची भाजी - फ्लॉवर आणि बटाटा
साहित्य
१. फ्लॉवर - ७ - ८ तुरे
२. बटाटे -२ किंवा ३
३. मटार - थोडे
४. ओटसचे पीठ - ३ मोठे चमचे (बाईंडर म्हणून). ब्रेड क्रंब्स, रवा, तांदूळ पीठही घेऊ शकता.
५. आले-लसूण पेस्ट - १ लहान चमचा
६. तिखट - २ ते ३ लहान चमचे
७. जीरे- धणे पावडर - २ लहान चमचे
८. किचन किंग मसाला एव्हरेस्टचा - १ लहान चमचा (ऑप्शनल)
९. मीठ - चवीनुसार
१०. कोथिंबीर - बारीक चिरुन थोडीशी
११. तेल - १ मोठा चमचा शॅलो फ्राय करण्यासाठी
कॄती
कूकरमध्ये फ्लॉवर आणि बटाटे लावून ३ शिट्या देणे. थंड झाल्यावर, बटाट्याची साले काढून बटाटा, फ्लॉवर आणि मटारचे दाणे स्मॅश करुन घेणे. त्यात वरील सर्व साहित्य घालून पातळ चपटे पॅटीस थापून तव्यावर थोडे तेल टाकून शॅलो फ्राय करणे.
गरम गरम सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करणे.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - हो १ मार्क
२. १ फोटो - १ मार्क, २ फोटो - २ मार्क इ. इ.. अर्र्र्र, केलाच का वेंधळेपणा, फोटो एकच आहे, नॉट अ प्रॉब्लेम, दुसरा पण देते
३. बटाटा वापरला - १ मार्क
टोटल - ४ मार्क्स
दुसरा फोटो गेल्या आठवड्यात केलेल्या चटणीचा, चालत असेल तर बघा :P पण चटणी चाखू नका हं बायांनो, ताजी नाही आहे म्हणून :winking: