आज पण अगदीच योगायोग ... आज मैत्रिणी आल्या होत्या स्नॅक साठी... तर हे बनवले होते ... ते सगळे गेल्यावर इकडे डोकावले ... बहुतेक फिट होतीये रेसिपी
साहित्य सारण - २ बटाटे उकडून
१/४ वाटी मटार वाफवून
आल हिरवी मिरची, जीर
गरम मसाला
पारीसाठी- घट्ट भिजवलेला मैदा - जिरे पूड आणि मीठ टाकून
तळायला तेल
कृत्ती- थोडे तेल गरम करून जीरे परतून घ्यावे ,
मग त्यातच , आल मिरची वाफवलेले मटार गरम मसाला टाकून परतून घेतले..
मिश्रण खाली उतरवून त्यात मॅश केलेला बटाटा घातला , चवी नुसार मीठ घालून सारण तयार केले
मैद्याची मोठी पोळी लाटून घेतली ,त्यावर सारण पसरवले आणि त्यावर हलक्या हाताने लाटण फिरवले.. जेणेकरून सारण पारीला चांगले चिटकेल...
मग त्याचा रोल केला आणि व उभे छेद दिले .. झालेला एक एक तुकडा हाताने जरा दाबला.. मग ते खाली दिलेल्या चित्राप्रमाणे दिसेल ... पाण्यात एक चमच्चा मैदा कालवून , त्यात हे पिन्व्हील जरासा डोबवून मग तळले..
फोटो काढण्यासाठी एक च शिल्लक होता :)