लाल सिमला मिरची ची चटणी
साहित्य:
२ मोठ्या लाल सिमला मिरच्या(मध्यम आकारचे तुकडे करुन घ्यावेत)
१ मोठा टोमॅटो (मध्यम आकारचे तुकडे करुन घ्यावेत)
तेल
१ छोटा चमचा हरभरा डाळ
१ छोटा चमचा उडीद डाळ
२-३ सुक्या लाल मिरच्या(आवडीप्रमाणे कमी/जास्त)
हिंग
मोहरी
जीरे
हळद
मीठ
कृती:
कढई मधे तेल गरम करुन त्या मधे ह.डाळ आणि उडीद डाळ घालावी.
हलका लाल रंग आला की त्या मधे सुक्या लाल मिरच्या,हिंग,मोहरी,जीरे,हळद घालावी.
त्या वर सिमला मिरची चे तुकडे परतावेत.झाकण ठेवुन १ वाफ आणावी.
साधारण मऊ झाली की टोमॅटो चे तुकडे घालून परतावेत.
परत १ वाफ आणावी.
चवीप्रमाणे मीठ घालावे.
उतरवून मिश्रण गार करावे.
आणि नंतर मिक्सर मधून बारीक वाटावे.
फोटो हा एकच होता. डोशाबरोबर खूप छान लागते ही चटणी. हिरवी चटणी आणि ही केली की एकदम कलरफुल दिसते.
मायबोली मधे पण आधी ही रेसिपी दिली होती.
मार्क्स वगैरे घेत नाही त्यामुळे.