मु: काय आज सुस्तावलाय... रंगढंग संपले वाटतं!
ब. संपतील कशे? दोनच तर रंग झालेत..
मु: पुढचा रंग द्या की मग.
ब: तेच सांगाय आलोय न्हवं का! आता एक न्हाई एकदम दोन-तीन दिल्यात!
पिवळा-केशरी निळा-जांभळा
मु: अरे वा! रंगीबेरंगी. :ड कच्च्या खायच्या का मग फळं भाज्या?
बः आँ? :thinking: का म्हणून?
मु: नाही म्हटलं, काल सगळ्यांनी इतका स्वयंपाक केलाय, इतका स्वयंपाक केलाय की आता आठवडाभर या बायका काही करतील असं वाटत नाही.
बः दमल्या असतील, पण करतील रे, फ्लॅटब्रेड करा म्हंतायत!
मु: म्हणजे?
बः म्हणजे पराठे, धपाटे, थालिपिठे, ठेपले, पिझ्झा! भाजायचं म्हणे फक्त.. आधी हाताला चटके..
मु: चांगलंय, म्हणजे कालच्या उरलेल्या भाज्या ढकला, कोशिंबीरी ढकला, श्रीखंड ढकला! :ड
बः श्रीखंडाचे धपाटे?? :surprise:
मु: का नाही? उरलेल्या- पाकातल्या आम्रखंडाचे धपाटे! आंबापोळीसारखे लागतील की नाय?
बः प्वाईंट आहे बरं का तुझ्या बोलण्यात. दिलेल्या रंगाचं भाजी फळ असलं म्हंजे झालं!
---------------------------
रंग - पिवळा-केशरी निळा-जांभळा
पदार्थ - पराठे, धपाटे, थालिपिठे, ठेपले, पिझ्झा! उर्फ फ्लॅटब्रेड्स.
नियम-१- जो भाग पदार्थात वापरणार तो दिलेल्या रंगाचा असला पाहिजे. एक किंवा अनेक भाज्या/फळं चालतील. त्यासोबत अजून काहीही वापरु शकता.
नियम-२- त्या भाजी किंवा फळाचा खाण्याचा पदार्थ बनवायचा.
नियम-३- त्याचा फोटो काढायचा.
नियम-४- त्या पदार्थाची कृती लिहायची.
नियम-५- फोटो आणि कृती "मैत्रीण" वर "सृजनाच्या वाटा" मध्ये पोस्ट करायची.
नियम-६-(कडक) कृत्रिम रंग वापरायचा नाही!
------------------
मार्किन्ग शिश्टीम.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. फोटो दिलाय - १ मार्क
३. पारंपारिक रेसिपी - १ मार्क, पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क, नवीन ओरिजनल - ३ मार्क
४. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क. इथला कॅलक्युलेटर वापरु शकता- http://www.myfitnesspal.com/recipe/calculator
नववर्षाची सुरुवात उत्साहाने करा, सुस्तावू नका.