शाळेत असल्यापासून कुंभारकामाबद्द्ल,त्यातल्या त्यात चाकावर मडकी बनवायचे एक सुप्त आकर्षण होते. अगदी बारावीतही एखादा क्लास आहे का असा शोध घेतल्याचे आठवते.
पहील्यादी असा चान्स मिळाला तेव्हा २ वर्षाचे एक आंणि २ महीन्याचे एक अशा दोन पोरांना आई व नवर्यावर टाकून थोडे शिकून घेतले. पण चाकाला हात काही लागला नव्हता. एक बिघडलेला मिक्सर पॉटरी व्हील बनवायला ६-७ वर्ष सांभाळला होता. :-)
मायबोलीवर मिनोती आणि रुनी पॉटरचे धागे बघून अजून आग लागली होती. :-)
बँगलोरला आल्यावर शोध चालुच होता. अचानक माती पासून चाकपण विकणारी आणि क्लासपासून सराव होण्यासाठी सभासदत्व देणारी एक कंपनी मिळाली. (भगवान देता है तो छप्पर फाड के :-))
तिथे एक फक्त हाताने वस्तु बनवायचा आणि एक चाकावर भांडी बनवायचे शिकलेय. अजून खुपच प्राथमि़क शिक्षण झाले आहे. अजून बरच पल्ला गाठायचा आहे.ग्लेझिंग शिकायचे आहे.
खाली काही मी बनवलेल्या वस्तु.काही चाकावर तर काही स्लॅब वापरुन