रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- फ्लॅटब्रेड पिझ्झा

ही semi homemade रेसिपी आहे. पिझ्झा बेस म्हणून वापरायला वेगवेगळे फ्लॅटब्रेड्स मिळतात. अगदी नान-पिझ्झासुद्धा ऐकला/खाल्ला असेल. तर असा तयार फ्लॅटब्रेड वापरुन हा पिझ्झा करायचा.

आमच्या इथे ब्रुकलीन ब्रेड म्हणून एक whole wheat लांबट आयताकृती फ्लॅटब्रेड मिळतो. त्याच्यावर आवडती टॉपिन्ग्स घालून बनवलेला हा पिझ्झा-

साहित्य-
१ फ्लॅटब्रेड
१ पिवळा बेल पेपर
१ केशरी बेल पेपर
(रंगीत पेपर्सची बॅग मिळते त्यातलय छोट्या वापरल्या तरी चालतील)
१ वाटी अननसाचे तुकडे
१ वांगी वांग्याचे तुकडे (पातळ काप)
रेड पेपर फ्लेक्स
ईटालियन सीजनिन्ग
गार्लिक पावडर
सी सॉल्ट
ऑलिव्ह ऑइल

कृती
मिरच्यांचे उभे तुकडे करुन घ्यायचे. सगळ्या भाज्या, अननस यांच्या तुकड्यांना मीठ आणि ऑलिव्ह ऑइल चोळून त्या ग्रिल करुन घ्यायच्या. मी टोस्टर अव्हनमध्ये केल्या. तव्यावर परतून घेऊ शकता.

ब्रेडवर ज्या भागावर टॉपिन्ग्स लावणार त्यावर हाताने किंवा ब्रशने ऑलिव्ह ऑइल लावावे. त्यावर इटालियन सीजनिन्ग, रेड पेपर फ्लेक्स आणि थोडे सी सॉल्ट भुरभुरावे. मग ग्रिल केलेल्या भाज्या पसराव्यात. सगळ्या प्रकारच्या भाज्या समप्रमाणात सगळीकडे असतील असे पहावे. मग अव्हमनध्ये भाजावा. मी कन्वेक्शन मोडमध्ये ३७५ फॅ. ला १० मिनिटे २ पिझ्झे एकदम भाजले. क्रिस्पी आवडत असल्याने डायरेक्ट रॅकवर ठेवलाय. तसा नको असल्यास पिझ्झा स्टोन, शीट वगैरे वापरु शकता.

हा पिवळा-केशरी-जांभळा रंग असलेल्या भाज्यांचा पिझ्झा. चीज अर्थातच घालू शकता. यात नसले तरी बेसला ऑलिव्ह ऑइल लावल्याने ग्रिल केल्यावर भाज्या बेसवर बसतात.

खाताना वरुन आवडीचे ड्रेसिन्ग, डिपिन्ग सॉस घेऊ शकता.

ग्रिलपूर्व
20160413_185433.jpg
आतमध्ये
20160413_193442.jpg
भाजल्यावर
20160413_195810-1.jpg

हा अजून एक वेगळ्या टॉपिन्ग्जचा-
20160413_190133.jpg

पिझ्झ्याची टॉपिन्ग्ज हा एक स्वतंत्र विषय आहे.

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle