खूप दिवसांपासून ठरवून न झालेला आणि शेवटी मुहूर्त लागलेला हा कलमकारीच्या उरलेल्या कापडाचा अस्तर ( strengthening साठी) आणि झिपर असलेला टॉयलेटरी पाऊच एकदाचा शिवलाय. भाचीसाठी. ट्यूटेरियल्स फार पूर्वी बघून आत्मविश्वासानी आठवेलच म्हणत अनेकदा उसवाउसवी करत, 'हे असं करायला हवं होतं श्या, जाऊ दे पुढच्या वेळी' असं म्हणत जमला शेवटी.
आतमधे कालच्या अयशस्वी block printing प्रयोगातलं कापड वापरलंय लायनिंगसाठी. त्याचं कारण blocks perfect झाले नसले तरी overall look इतका वाईट नव्हता. सो just peeping म्हणून ते fabric चाललं (मला न चालायला काय. पण आमच्या हीरोईनला पण चाललं. ) खूप बेसिक आहे पण मला फार मस्त वाटतंय हे करून. :) सो लग्गेच तुम्हाला दाखवायला आलेय.
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle