'फास्ट ट्रॅक' - पाचक पंच
मागच्या महिनाभर फार रंग उधळून झाले... काय काय नाही हादडले... हिरवे सूप काय स्मुद्या काय... लाल भडक तिखट चटण्या अन पौष्टिक कोशिम्बीरी आणि हो येल्लो येल्लो टेस्टी फेलो - पिझ्झा पण ... आता हे सगळे पचवायला हवे ना.. मग त्यावर हमखास इलाज... 'फास्ट ट्रॅक' घ्या आणि बघा 'क्लब २३' चे लवकरच मेंबर व्हाल :)
साहित्यः
लिंबाचा रस - अर्धी वाटी;
आले - १ इंच तुकडा;
थोडी पुदिन्याची पाने;
साखर - लिंबाचा रस किती आंबट आहे त्यावर अवलंबुन;
कृती:
१. आले किसुन त्याचा रस काढुन घ्यावा;
२. साखर आणि पुदिन्याची पाने खलबत्ता किंवा मिक्सरमधे वाटुन घ्यावीत.
३. लिंबाचा रस, आल्याचा रस आणि साखर-पुदिना मिश्रण आणि मिठ नीट एकत्र करावे. मग गाळणीतुन गाळून घ्यावे.
४. तयार अर्क आता बर्फाच्या रिकाम्या ट्रे मधे घालुन फ्रिझ करावा.
तयार क्युबा...
५. आयत्यावेळेस ग्लासात थंड लेमोनेड ओतावे. त्यात या अर्काच्या १-२ क्युब्ज सोडाव्यात आणि वरतुन थोडा चाट मसाला भुरभुरावा.... थंड गार असे हे 'फास्ट ट्रॅक' भरपेट जेवणानंतर नक्की प्यावे :)
नोटः
ही रेसिपी मी आधी मायबोलीवर 'मसाला' स्पर्धेसाठी "हज'म'स्साला" या नावाने दिलेली आहे.