१९७४ मध्ये माझा चुलत भाऊ उच्च शिक्षणासाठी हॉलंडला गेला होता. परत आल्यावर त्याच्याकडून अॅमस्टर डॅम शहराचे वर्णन ऐकले होते. व त्याने बहिणी साठी आणलेल्या बारीक विंडमिलचे डिझाइन असलेल्या नाजून चेन मधील पेंडंट व कानातल्यावर एक नजर फार आसूसून टाकली होते. इथे एकदा जायलाच पाहिजे ते तेव्हा पासून मनात होते. ती सवड आत्ता मिळाली २०१६!!!!
सर्व सोपस्कार आटोपून विमानात बसल्यावर मला खरे वाटेना. आई बाबा, रवी सर्वांची आठवण आली. स्वीटीची पण. विमान सुरू होताना इतेहाद मध्ये एक अरबी प्रार्थना दाखवतात व प्रवासात कायम विमान मक्के पासून किती दूर आहे. व दिशा दाखवतात हे मला खूप आव्डले. अबू धाबी पण नक्की ब्रेक घेण्यालायक आहे. व तिथल्या एअर पोर्ट वर हातातले उरलेले आय एन आर चे युरो करून घेतले. पैसे पुरतील का ही म. म शंका मला होती पण काहीही त्रास झाला नाही. उलटे पैसे उरवून परत आलो. सर्वांसा ठी शॉपिन्ग व भरपूर चॉक लेटे वगैरे खरेदी करता आली.
स्किपोल विमान तळ लै मोठा व भारी आहे. तिथूनच क्युकेन हॉफ गार्डन ला जायला बसेस व ट्रेनं मिळतात. खूप चालावे लागते वगिअरे आहेच. पण मला सर्वच नाविन्याचे होते त्यामुळे उत्साह होता. उन्हाळ्यात गेल्याने एकही स्वेटर लागला नाही. इथे असते तसेच लेगिंग व कॉटन कुर्ता
वर सर्व ट्रिप मजेत पार पडली. उलटे एखादी छत्री व रेनकोटच घ्यावा बरोबर. कारण उन्हे कडक वाटू शकतात.
एक जबरी मर्सिडीज असलेला डायवर आमच्या नावाची पाटी घेउन उभाच होता. तसली मर्क घ्यायचीच असे पुन्नीने नक्की केले आहे. अर्ध्या तासात सिटी सेंटर वर हजर. इबिस मध्येच बुकिन्ग होते. इथे सर्वत्र व्हाउचर सिस्टिम आहे ती फार सोपी व इजी टू मॅनेज आहे.
सामान टाकून फिरायला बाहेर पडलो व सेंट्रल समोरच्या कॅफेज, दुकानांच्या गल्ल्या गल्ल्यातून पाय तुटे परेन्त फिरलो, फोटो काढले व खादाडी केली. क्यूट टिपिकल घरे व कालवे.
अॅमस्टरडॅम म्हणजे कालव्यांचे शहर. हर प्रकारच्या बोटी फिरत राहतात. व त्यात बस्लेले लोक्स वाइन पासून बीअर परेन्त पीत खात राहतात. मी गेले तेव्हा अगदी राइट टाइम होता. सर्वत्र फुले फुललेली. बागा बहरलेल्या आणि सुखी आनंदित मूड मध्ये असलेले सर्व वयाचे लोक. आणि तितकेच जवळपास पेट कुत्रे!!!! मस्त ग्रूम केलेले. मन आनंदित हो गया.
एकटे दुकटे, गॄपने आनंद लुटणा रे लोक सर्वत्र बसलेले होते. व फिरत होते.
दुसृया दिवशी बल्ब फार्म व मग कॅनाल क्रूझ होती. एका मेक्सिकन रेस्टॉ मधे रात्री साडे नौ ला नाचोज, पायेया व वाइन घेतली . छोट्या श्या जागेत त्यांनी सर्व मेक्सिकन कल्चरल वस्तू इथे तिथे मांडलेल्या होत्या ते बघून मौज वाटली. अंधार पडायचे नाव नाही म्हणून थकलेल्या पायाने सावकाश चालत चालत रूम वर आलो व फोटो बघून झोपलो. वाचायला शोध व फोन वर सैराट होतेच सोबतीला. !!!
पह्यले नमन फेसबुक साठी फोटो.
सेंट्रल स्टेशन.
सायकलींचे शहर. : जुन्या पान्या ते नव्या कोर्या. बच्चाभी औ र मा बावा भी चलाते. भयंकर जोरात व अतिशय बेदरकार पणे सायकली हाकतात. रोज २०० सायकली चोरीस जातात. रहिवास्यांपेक्षा सायकलीच जास्त आहेत. सायकलींचे ट्रॅक्स मस्त मेंटेन केलेले आहेत.