"मिड पॉईन्ट रिव्ह्यू"
परीक्षण, आढावा, रिव्ह्यू..
सृजन म्हणजे निर्मिती, creation! आपल्यातले सृजनत्व जपण्यासाठी नेहमीच लोकांनी निवडलेले मार्ग जाणून घ्यावे लागतात. ते आपण मुद्दाम अभ्यास म्हणून किंवा छंद, करमणूक, गरज म्हणून करतोच. प्रत्येक कलाकृती म्हणजे एक 'प्रॉडक्ट'. तेव्हा यावेळच्या सृजनाच्या वाटांमध्ये आपण या प्रॉडक्ट्सचा रिव्ह्यू करणार आहोत. सिनेमा-नाटक, म्युझिक, शोज, पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं, उपकरण... यांचं परीक्षण करायचं. तुम्हाला आवडलेलं वा न आवडलेलं, दोन्हीही चालेल. यामध्ये 'सर्विसेस' मात्र येणार नाहीत, तेव्हा तुम्ही राहिलेल्या हॉटेल वा रिझॉर्टचा रिव्ह्यू लिहू नका.
आता हा 'मिड पॉईंट रिव्ह्यू' का? तर जूनमध्ये, वर्षाच्या मध्यावर घेतोय म्हणून. वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये एक पुन्हा आढावा घेऊ. तो मात्र फक्त २०१६ मधल्या कला़कॄतींचा! सध्या प्रॉडक्ट नवे-जुनेही चालेल.
करा तर मग सुरुवात! "सृजनाच्या वाटा" मध्ये "मिड पॉईन्ट रिव्ह्यू - प्रॉडक्टचे नाव (प्रकार)" असा नवा धागा तयार करुन लिहा.
उदाहरणार्थ -
"मिड पॉईंट रिव्ह्यू" - श्यामची आई (चित्रपट)
"मिड पॉईंट रिव्ह्यू" - श्यामची आई (पुस्तक)
"मिड पॉईंट रिव्ह्यू" - मोनालिसा (पेंटिंग)
"मिड पॉईंट रिव्ह्यू" - केप्र (लोणची, मसाले)
"मिड पॉईंट रिव्ह्यू" - Samsung Galaxy S7 Edge (स्मार्ट्फोन)
धन्यवाद.