पण उद्या जर अशी वेळ आली की, मानवाने मेंदूचा, बुद्धीचा वापर करणं सोडून दिलं.. तर काय वेळ येईल?? इडियॉक्रसी बघितल्यावर समजतं काय होईल...!
Joe या अत्यंत ऍव्हरेज अशा यु.एस आर्मी लायब्ररीयनला आणि Rita या प्रॉस्टीट्युटला मिलिट्रीच्या human hibernation project मधे सामिल करून घेतात.. प्रयोग असा की १वर्ष त्या दोघांना फ्रीझ करून ठेवायचं.. थोडक्यात रिसोर्सेस जपून ठेवण्याच्या दृष्टीने चाललेला हा प्रयोग..!
पण होतं भलतंच.. २००५ साली फ्रीझ करून ठेवलेले ते दोघं जागे होतात २५०५ साली! ते सुद्धा ’Great Garbage Avalanche of 2505' वर..! सुमारे ५०० वर्षांत मानवामधे इतका फरक पडलेला असतो, की त्याला साध्या बेसिक गरजाही पूर्ण करता येत नाहीत. सगळ्या समाजाचा आय.क्यु. जवळजवळ ० ला जाऊन पोचलेला असतो!! सगळीकडे स्टुपिड आणि इडियट्सचा भरणा झालेला असतो..
Joe उठतो तोच मुळी कचर्याच्या ढीगार्यावरून.. पूर्णपणे डिसओरिएंटेड असल्यामुळे काय चाललंय काही कळत नाही.. कोणाशी बोलायला जावं तर सगळे आजुबाजुला स्लॅंग बोलणारी जनता याच्या सभ्य इंग्लिशला हसतात.. टॉयलेट सोडलं तर पाणी कुठे नाहीच! सगळीकडे प्यायलाही स्पोर्ट्स ड्रींक.. सगळी माणसं स्टुपिड झाली आहेत! साधी वाक्यं डोक्यात शिरायला ५-एक मिनिटं वेळ घेणार, मग २+३ किती हा तर फारच भला मोठा प्रश्न झाला!
२५०५ साली आवश्यक असणारा बारकोड टॅटू Joe च्या हातावर नसल्यामुळे त्याला Unscannable घोषित केलं जातं.. 2505 साली Unscannable माणूस दिसणं म्हणजे आत्ता २००८ साली डायनॉसॉर दिसणं, इतकं दुर्मिळ..!
न्यायव्यवस्था नुसतीच आंधळी नाही, तर Retarded झालेली.! Joe ला जेल मधे टाकण्यात येतं.. तिथून तो पळूनही जाऊ शकतो. मात्र तुरूंगात असताना झालेल्या एका महा-अवघड प्रश्नाचं उत्तर त्याला आल्यामुळे , त्याच्या अतिप्रचंड आयक्यु मुळे त्याला व्हाईट हाऊस मधे बोलवलं जाते..
[अती अवघड प्रश्न हाच, की एका बादलीत २ गॅलन पाणी आहे, आणि दुसर्या बादलीत ५ गॅलन, तर माझ्याकडे बादल्या किती!! ]
असो.. इथे काही सगळी स्टोरी नाही लिहीत मी.. ती सगळी मजा पिक्चरमधेच बघितली पाहीजे!! ४-५ वेळेला तर Rofl होईल इतकी हसले मी!!
पण हा काही कॉमेडी पिक्चर नाही.. ही तर झाली ब्लॅक कॉमेडी.. ! माणसाने बुद्धी गहाण टाकली तर अशी वेळ येईल.. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीचा , मेंदूचा वापर केला नाही तर अशी वेळ येऊही शकेल..! ही वॉर्निंग नक्कीच मिळते या पिक्चरमधून!!