किल्ला
किल्ला रिलीज झाला तेव्हा अगदी बघायचाच होता .एक तर त्याच्या प्रोमोज मुळे आणि चित्रपटातल्या गुहागरच्या शुटींग मुळे. गुहागर हे माझ आजोळ असल्याने आणि लहानपणापासून "मे" महिन्याच्या सुट्टीत दरवर्षी गुहागरला जात असल्याने गुहागर मोठ्या पडद्यावर कस दिसेल ते बघण्याची ओढ जबरदस्त होती :)
तर आत्ता चित्रपटाविषयी :
चित्रपटाच घोषवाक्य आहे "तुमच्या मुलाच्या मनातल तुम्ही ओळखता का ?"खर तर कोणतेही आई -वडील आपल्या मुलाच्या मनातल ओळखतच असतात. पण मुलांच्या मनातल ओळखून त्या प्रमाणे कृती करण त्यांना शक्य असत का/जमत का? किव्वा त्यांच्या ते आवाक्यात असत का? हा कळीचा प्रश्न आहे.
चित्रपटाची नायिका अनघा काळे हिची ( जी एक विधवा आहे)पुण्यासारख्या मोठ्या शहरातून "गुहागर" सारख्या छोट्या गावात बदली होते आणि तिला तिच्या एकुलत्या एक मुलाला घेऊन गुहागरात कामाकरता याव लागत. नाईलाज असतो तिचा. खर तर तीच कशी बशी नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायला बघत असते आणि तिला ते कठीण पण जात असत. तिला जिथे नव्या वातावरणाशी जुळवून घेण कठीण जात असत तिथे तिच्या सातवीतल्या मुलाला ते किती कठीण जाईल ? नव्हे ते त्याला कठीण जातच असत. .
नवीन गाव.नवीन वातावरण.नवीन मित्र. बर तो मुलगा पण पटकन कोणात मिक्स न होणारा. त्याचा तो स्वभाव आहे.समोर जी परिस्थिती येईल तिच्या शी चटकन जुळवून घेण त्याला जमत नसत.त्यामुळेच खर तर गावातल्या मुलांशी जमवून घेण त्याला खूप "त्रासदायक" ठरत असत. त्याला त्याच्या मामे भावाची सतत आठवण येत असते पण नाईलाज म्हणून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालूच असतो. इलाज असतोच कुठे ? हळू हळू तो वातावरणात रूळतोही पण अगदी तितक्यातच आईच्या ऑफिस मध्ये एक प्रोब्लेम येतो. तिला तिच्या तत्वांच्या विरुद्ध /नियमाच्या विरुद्ध वागाव लागत आणि तिची परत सातार्याला बदली होते. तिला स्वताला तो फार मोठा धक्का असतोच पण आत्ता मुलाची काय प्रतिक्रिया असेल याचंही टेन्शन येत. मुलाचा मूड बघून तिच्या नवीन बदलीची बातमी ती मुलाला देते आणि त्याची रिअक्शन बघते पण पण आता तो निवळलेला असतो. ळू हळू समोर येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीत तो आलेला असतो त्यामुळेच त्याला जास्त त्रास होत नाही.आईला एकदा फक्त तो विचारून बघतो ( आधीच्या सारखच ) "आई तुला "ट्रान्सफर' क्यान्सल करता येणार नाही का ग ?" पण" नाही" हे उत्तर ऐकल्यावर मात्र तो म्हणतो नो प्रोब्लेम . आणि आईला सामानाची आवरा आवरी करण्यात निमुटपणे सहभागी होतो.
खर तर तुमच्या मुलाच्या मनातल तुम्ही ओळखत का अशी जरी चित्रपटाची "ट्याग लाइन" असली तरी आईच्या मनातलं ओळखणार मात्र कोणीच नसत ना मुलगा ना नवरा. मुलगा अडनिड्या वयाचा म्हणून आणि नवरा वारलेला म्हणून. आईने काय कराव.?
चित्रपटाच नाव "किल्ला" का असाव ? हा प्रश्न चित्रपट पाहून आल्यावर खर तर बराच वेळ माझ्या मनात रेंगाळत होता पण कदाचित तो थोडा फार मला समजलाय अस आत्ता वाटतय. चित्रपटात चिन्मय ( कथेचा छोटा नायक ) त्याच्या मित्रांबरोबर सायकलची रेस लावत एका जवळच्या किल्यात जातो. तिथे मुल मुल बोलता बोलता बोलतात "अरे या किल्याच्या एका भिंतीशी जरी कुजबुजल आणि दुसर्या भिंतीला जरी कान लावला तरी तुम्हाला ऐकू जात" त्या प्रमाणे मुलं गमती गमतीत कुजबुजण /कान लावण करतातही पण प्रत्यक्षात मात्र त्यावेळी चिन्मय च्या मनात चाललेलं "वादळ" त्याच्या मित्रांना बिलकुल ऐकू येत नाही . कुजबुजण तर सोडाच पण वादळाचाही पत्ता लागत नाही. त्याच्या बोलण्यातून त्याच्या मित्रांना काहीच पत्ता लागत नाही. त्यामुळे दुखावून म्हणा किव्वा आणखीन काही कारणाने म्हणा तो थोडासा मित्रांपासून दूर काय जातो आणि मित्र त्याला न घेताच त्याला त्तिथेच त्या किल्यात पावसापाण्याच सोडून निघून जातात . तो कोसळणारा पाउस म्हणजे त्याच्या मनातल वादळ कोणालाच ऐकायला येत नाही. तो वादळी पाऊस म्हणजे त्याच्या आजूबाजूची परिस्थिती जी सहन करण त्या लहानग्या जीवाला त्या वेळी ( हा शब्द खूप महत्वाचा आहे ) तरी जड जात. त्याच वेळी मित्र त्याला तसेच सोडून जातात. त्याला मित्रांचा प्रचंड राग येतो पण नंतर हळू हळू तो ती परिस्थिती हाताळू शकण्याच्या मनस्थितीत येतो/ प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीत येतो आणि चित्रपटाच्या शेवटी (आईची दुसर्या ठिकाणी बदलीची ऑर्डर आल्यावर ) तो त्याच्या मित्रांना म्हणतो ही "आत्ता परत एकदा मला तुमच्या बरोबर त्या किल्यावर जायचंय" .
चित्रपटाच्या शेवटी तो मित्रांबरोबर किल्यावर आलेला दाखवलायही पण आत्ता त्याच्या मनातल वादळ शांत झालेलं असत .आजूबाजूची प्राप्त परिस्थिती सहन करण्याची त्याच्या अंगात क्षमता निर्माण झालेली असते त्यामुळेच मित्र त्याच्यापासून कितीही लांब दूरवर जरी खेळत असले तरी आता त्याने त्याच्या "अंतर्मनातल्या वादळावर" विजय मिळवलेला असतो.आहे त्या परिस्थिती ला सामोर जायला सज्ज झालेला असतो त्यामुळेच मित्रांपासून तो कितीही लांब असला किव्वा मित्र त्याच्या पासून कितीही दूर असले तरी तो मात्र शांत असतो . एकदम शांत . मित्रांपासून थोडासा दूर राहूनही तो मस्त उर भरून मोकळ्या जगाची हवा मनात साठवून घेतो आणि एक विजयी हास्य देतो .जिंकल्याच."हो हो मी जिंकलोय . माझ्या मनातल्या वादळाशी दोन हात करण्याची शक्ती मला मिळाल्येय मित्रानो तुम्ही कितीही माझ्या पासून दूर असलात तरी" याचच/ फक्त याचच ते विजयी हास्य असत आणि चित्रपट संपतो .
चित्रपटाचा जीव छोटा असला तरी चित्रपटाला काही तरी कथा आहे जी कुठल्याही चित्रपटाला आवश्यक आहे हे माझ वैयक्तित मत . बाकी अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झाल तर चित्रपटाच्या प्रमुख पात्रांचा अभिनय सुरेखच आहे. मुख्य छोटा नायक आणि त्याची दोस्त कंपनी यांच्या स्वाभाविक किव्वा नैसर्गिक अभिनयाला तोड नाही. बंड्याच्या पात्राला जास्त फुटेज आहे आणि ज्या छोट्यानी तो साकारलाय त्याच कौतुक कराव तितक कमीच . चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार वाला त्यामुळे त्यात गाणी अशी अपेक्षित नाहीतच पण थोडी जरी प्रत्येक प्रसंगाला पार्श्वसंगीताची जोड मिळाली असती तर चित्रपट जास्त उठावदार झाला असता अस वाटत राहत . पार्श्वसंगीत अतिशय जुजबी आहे. त्यामुळे छोट्या चिन्मयच्या मनातल वादळ तितकस पटकन मनाला भिडत नाही. :)