सकाळचे शार्प ८:००. मी ऑफिसच्या गेटवर उभी आहे.
कसं असेल ऑफिस आता? बदलले असेल? की तसंच जसं मी सोडून गेले होते ४ वर्षांपूर्वी?
मी नक्की कशाचा विचार करतेय?
ऑफिसचा की त्याचा?
तो.. आज भेटणार इतक्या दिवसांनी. एकमेकांसमोर उभे राहणार आम्ही. काय बोलणार माहीत नाही.
ही माझी गोष्ट...
सकाळचे शार्प ८:००. मी ऑफिसच्या गेटवर उभी आहे. कसं असेल ऑफिस आता? बदलले असेल? की तसंच जसं मी सोडून गेले होते ४ वर्षांपूर्वी?
मी नक्की कशाचा विचार करतेय? ऑफिसचा की त्याचा? तो.. आज भेटणार इतक्या दिवसांनी. एकमेकांसमोर उभे राहणार आम्ही. काय बोलणार माहीत नाही.
ही माझी गोष्ट.
मी मीरा.
गोष्टीची सुरुवात होते पुण्यात.
पुण्यातली नावाजलेली आयटी कंपनी.
स्थळः एच आर ऑफिस.
मी माझ्या इंटरव्यूच्या रिझल्टची वाट पाहत होते. सोबत आणखी ६ चेहरे, माझ्यासारखीच वाट पाहणारे. इंटरव्यू बरा गेला होता का? चांगला झाला की, सगळी उत्तरे अगदी व्यवस्थित दिली होती मी. सिलेक्शन होईल बहुतेक असे वाटत होते. बोर झालंय आता, अरे जॉब देणार नसला तर थांबवून का ठेवतात? टाईमपास म्हणून इतरांना न्याहाळायला सुरुवात केली. समोर बसली होती एक मुलगी. फॉर्मल चुडीदार, लांब केस, एकदम "एस क्यूब " टाईप्स - सज्जन, सुंदर, सद्गुणी. हात घट्ट मिटून त्यांच्याकडे बघत होती. तिच्या शेजारी एक मुलगा, तो ही फॉर्मल कपड्यात. गंभीर भाव होते त्याच्या चेहर्यावर.
पलिकडे आणखी एक जण, चेहरा थोडा बेफिकीर. इतका की जशी या जॉबची त्याला गरजच नाही, पण जॉब त्याला मिळणारच आहे असा भाव होता.
माझे ऑबझर्वेशन एच आर च्या हाकेने थांबले . मी सिलेक्ट झाले होते आणि माझ्याबरोबर ते समोरचे तिघेही. मला खूप आनंद झाला होता, अखेर माझ्या पहिल्या जॉबचे अपॉईंट्मेंट लेटर माझ्या हातात होते. एका आठवड्याने मी ती कंपनी जॉईन करणार होते.
एक आठवडा कसा गेला ते कळालंच नाही. आणि तो जॉईनिंगचा दिवस आला. ऑफिसला पोहोचले तर समोर ती एस क्यूब उभी होती.
"हाय, आय अॅम शर्वरी" तिचा आवाज खूप गोड होता. देवा! आधीच एस क्यूब त्यात नाव छान, आवाज गोड! पेढा मधात बुडवून खाल्ला तर कसं होईल तसं.
"हाय, आय अॅम मीरा, नाईस टू मीट यू" मी हसून प्रत्युत्तर दिले. आमच्या दोघींची गेस्ट आयडी कार्ड्स बनवायची चालली होती ती तयार होईपर्यंत बोलत बसलो. शर्वरी मूळची पुण्याचीच. तिला गाण्याची आवड होती, तिने सांगितले की ती शास्त्रीय संगीतसुद्धा शिकली होती.
"खरंतर मला गाण्यातच करीयर करायचे होते" ती सांगत होती.
"इकडे आयटीत कशी वाट चुकलीस मग?"
"बाबांना माझे गाण्यावरचे प्रेम पटत नाही , त्यांचा हट्ट होता की मी इंजिनिअरिंगच करावे. त्यामुळे इकडे आले."
किती सहज तिने माझ्यासारख्या अनोळखी मुलीला मनातली गोष्ट सांगून टाकली होती. किती वेगळी होती ती माझ्यापेक्षा. मला असे मनातले सांगणे या जन्मात तरी शक्य नव्हते. मनातले पटकन बोलून टाकणारा स्वभावच नव्हता माझा.
तिच्याशी बोलताना समोर लक्ष गेले, समोरून एक मुलगा चालत येत होता. अरे हा तर कालचा तो हू केअर्स अॅटिट्यूडवाला आहे. आणि अचानक "थाड!" मोठा आवाज झाला. तो रिसेप्शनच्या काचेला धडकला होता. कुठे बघत चालला होता कोणास ठाऊक? त्याला काच आहे हे लक्षातच आलं नव्हत बहुतेक. आम्ही दोघीही हसलो, मी पाहिलं, हसताना शर्वरीच्या गालावर छान खळी पडते. पण त्याचवेळी हे ही पाहिलं की त्या मुलाचंही लक्ष शर्वरीकडेच आहे.
नंतर त्याच्याशीही ओळख झाली. त्याचे नाव निनाद होते. निनादचे बाबांची स्व्तःच्या मालकीची प्रथितयश कंपनी होती. पण तो म्हणाला त्याला तिथे जॉब करायचा नाहीये. मी मनात म्हटलं, किती अॅटिट्यूड आहे या मुलाला. माझ्या बाबांची अशी कंपनी असती तर मी एका पायावर तयार झाले असते तिथे काम करायला. पण असं काही नव्हतं. अर्थात माझी तक्रार नव्हती याबद्दल. माझ्या आई बाबांनी खूप कष्टाने मला शिकवलं होतं. मला इथे यायला खूप कष्ट घ्यावे लागले होते. पण मी ठरवलं होतं, आई बाबांचे सगळे श्रम दूर करायचे, त्यांना खूप आनंदात ठेवायचं. मी जॉबच्या पहिल्याच दिवशी मनात स्वप्नांचे इमले बांधत होते.
आम्हाला तिघांना एच आर ने काँफरन्स हॉलमध्ये बसायला सांगितले होते. थोड्याच वेळात आमचे ईंडक्शन प्रोग्राम्स सुरू होणार होते. हॉलमध्ये पोहोचलो तर तिथे तो गंभीर आधीच हजर होता. मी घड्याळाकडे नजर टाकली, आम्ही तिघे वेळेत आलो होतो. याचाच अर्थ तो खूपच लवकर आला होता. चलो गुड! कोणितरी असं हवच ग्रुपमध्ये.
इंडक्शन प्रोग्राम सुरू झाला, त्यात तीन तास कसे गेले कळालेच नाही. लंच ब्रेक मध्ये आमच्या चौघांची चांगलीच गट्टी जमली. गंभीरचं नाव मोहित होतं.
मोहित शर्मा. आमच्या ग्रुपमध्ये तो एकटाच नॉर्थ इंडियन, बाकी आम्ही तिघे मराठी होतो. पण त्याचं मराठी अगदी छान होतं.
"तुला इतकं चांगलं मराठी कसं येतं रे?" मी विचारलं.
"मी डिग्री इथेच केली ना, हॉस्टेलवर सगळे मित्र मराठी होते, त्यामुळे ही भाषा बोलता यायला लागली."
"छान आहे. नाहीतर हल्ली मराठी माणसांना पण नीट मराठी बोलता येत नाही " इति शर्वरी.
"तू तुमच्या कॉलेजचा टॉपर होतास का रे?" निनादचा मोहितला प्रश्न.
"हो! तू कसे काय ओळखलेस?"
"अरे काही नाही मित्रा, तुझ्याकडे पाहूनच कोणीही सांगेल की तू नक्की टॉपरच असणार"
"हो का? अरे टॉपर तर मीरा ही होती तिच्या कॉलेजची, तिच्याकडे बघून नाही वाटत का तुला तसं?" शर्वरीचा प्रतिप्रश्न.
निनाद थोडासा हिरमुसला, त्याचा गेस चुकीचा आहे की बरोबर यापेक्षा शर्वरी मोहितची बाजू घेऊन बोलतेय याचं वाईट वाटलं की काय त्याला कोण जाणे.
"अरे अर्धा तास होऊन गेला, आपल्याला जायला हवं आता." शर्वरीने घड्याळाकडे पहात म्हटलं.
"अगं इथे काय कोणी विचारायला नाही येणार तुला. आणि हे कॉलेज नाहीये मॅडम, जाऊ की ५ मिनिटात." मी तिला समजवायचा प्रयत्न केला पण ती काही ऐकेना.
मग मात्र मोहितने तिची बाजू घेतली आणि आम्हाला उठावंच लागलं.
लंचनंतर एका सेशनमधे आम्हाला सांगण्यात आले की इथून पुढे २ महिने आमचे ट्रेनिंग असणार आहे. त्यानंतर पुन्हा आमच्या टेस्ट्स होऊन आम्हाला वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस असाईन होतील. ट्रेनींगची भलीमोठी पुस्तके आम्हाला मिळाली. लॉकर्स मिळाले नसल्यामुळे ती सगळी पुस्तके घरी घेऊन जावे लागणार होते. शर्वरीला ती पुस्तके बघूनच टेंशन आले होते आणि तिने ते बोलूनही दाखवले,
"मीरा, ट्रेनिंगसाठीच इतकी पुस्तके दिली आहेत तर मग जॉब करताना कसं होणार?"
"अगं काळजी करू नकोस, सगळे नीट होईल, चिल!" मी तिला धीर द्यायचा प्रयत्न केला.
"शर्वरी, आपण एकत्र करू ना अभ्यास. डोंट वरी" मोहित म्हणाला.
मी मनात म्हटलं, मदतीला तत्पर...मोहित निरंतर... देवा! हा मोहित जरा जास्तच करतोय नाही? जाऊ दे! निघायला हवं आता म्हणत मी माझी बॅग उचलली.
"चलो, बाय उद्या भेटू" एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही चौघे निघालो.
मी बस स्टॉपवर येऊन बसची वाट पहात थांबले. १० मिनिटे तरी गेली असतील. आणि एक बाईक करकचून ब्रेक लावत माझ्यासमोर थांबली. काय माणूस आहे असा विचार डोक्यात येतोय ना येतोय तोच त्याने हेल्मेट काढलं. तो निनाद होता.
"डू यू वाँट लिफ्ट?" तो विचारत होता.
क्रमशः
"डू यू वाँट लिफ्ट?" निनाद विचारत होता.
"थँक्स. पण माझी बस येईल इतक्यात." मला खरंतर त्याने लिफ्ट हवी का असं विचारणं आवडलं नव्हतं. एका दिवसाच्या ओळखीत त्याच्या बाईकवर लिफ्ट घेणं मला पटणारं नव्हतं.
तो हसला माझ्याकडे पाहून, काहीतरी समजल्यासारखा, आणि आला त्या वेगात निघूनही गेला. मी मात्र तो का हसला असेल यावर घरी पोहोचेपर्यंत विचार करत राहिले.
आई बाबांना मला जॉब मिळाल्याचा खूप आनंद झाला होता. बाबा मला म्हणाले की त्यांच्या कष्टाचे सार्थक झालं असं त्यांना वाटतंय. त्या रात्री मी खूप खुश होते, उद्या माझ्याकडे माझा जॉब असणार होता, माझा पहिला जॉब. रात्री कधी झोप लागली आणि कधी सकाळ झाली ते कळालंच नाही. सकाळी उठून पटकन आवरून ऑफिससाठी तयार झाले. आईने मस्त डबा करून दिला होता. ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी मी लवकर निघून बस स्टॉपवर येऊन थांबले होते. पण बराच वेळ गेला तरी बस आली नाही. आज दुसर्याच दिवशी ऑफिसला उशीर होणार अशी भिती वाटायला लागली. चालत जावं का? चालत ऑफिसला पोहोचायला अर्धा तास तरी लागला असता आणि एव्हढा वेळ शिल्लक नव्हता माझ्याकडे. एव्हढ्यात एक कार समोर येऊन थांबली. एका मध्यमवयीन गृहस्थाने कारचा दरवाजा उघडला. ती व्यक्ती ड्रायव्हर वाटत नव्हती. जरा साशंकतेनेच पाहिलं मी त्याच्याकडे, तोच हाक आली,
"मीरा..."
"अगं शर्वरी तू?! हाय!"
"ये ना. ऑफिसला एकत्र जाऊयात. बाबा मला ऑफिसलाच सोड्णार आहेत". अच्छा, ते शर्वरीचे बाबा होते तर. मी हो म्हटलं आणि तिच्या कारमध्ये बसले. जाताना ती जास्त काही बोलली नाही, फक्त माझी तिच्या बाबांशी ओळख करून दिली तितकच. आम्ही ऑफिसला पोहोचलो आणि आमच्या ट्रेनींग हॉलमध्ये येऊन बसलो.
"मीरा आय अॅम सॉरी"
"अगं सॉरी का म्हणतेस? काय झालं?"
"अगं कारमध्ये जास्त काही बोललेच नाही तुझ्याशी. तू म्हणशील काय मुलगी आहे, आधी लिफ्ट देते आणि नंतर काही बोलतही नाही."
"ठीक आहे गं, चलता है!"
"तुला खरं सांगू? मला बाबांची थोडी भिती वाटते गं. त्यांना कोणती गोष्ट पटेल न पटेल सांगता येत नाही. म्हणजे असं नाही की त्यांच माझ्यावर किंवा माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये, पण..."
"पण काय?"
"पण आई गेल्यापासून बाबा खूप बदललेत. माझे बाबा आधी असे नव्हते. खूप मस्त होतं आमच्या तिघांचं आयुष्य. मी, बाबा आणि आई. पण आई गेल्यापासून बाबांनी जसं काही बंद करून घेतलं स्व्तःला आतल्या आत. खूप गंभीर झालेत, रागवतातही पटकन. माझ्या अॅडमिशनच्या वेळीही त्यांनी मला निक्षून नाही सांगितलं संगीत शिकण्यासाठी. ए तुला माहित आहे, मला गाण्याची देणगी कोणाकडून मिळालीये? माझ्या आईकडून. तिचा आवाजही खूप गोड होता. पण बाबांना कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणावं वाटत नाही गं मला. आधीच ते खूप एकटे पडलेत, त्यात त्यांच्या मनाविरूद्ध वागून मला त्यांना दुखवायचं नव्हतं."
शर्वरीची आई नाही हे ऐकूनच खूप वाईट वाटलं मला. किती गोड मुलगी आहे ही, का बरे देवाने असे केले असेल तिच्याच बाबतीत?
"शर्वरी मी काय बोलू? मी समजू शकते नाही म्ह्णू शकत गं, कारण आई जवळ नसण्याचा मी विचारही नाही करू शकत. तुझं खरंच कौतुक वाटतं मला. तुझ्या बाबांना किती समजून घेतेयस तू!" आणि ती हसली, तिच्या गालावरच्या खळीसह! तिला माझ्या बोलण्याने बरं वाटतंय हे बघून मला बरं वाटलं.
"हेल्लो गर्ल्स" मागून आवाज आला, आम्ही दोघींनी पाहिलं तर निनाद येत होता.
"हाय निनाद, आज उशिरा आलास?" शर्वरीने त्याला विचारलं.
का कोणास ठाऊक पण मी त्याच्याशी बोलले नाही. ते त्याच्या लक्षात आलं असावं.
"हाय मीरा. लक्ष कुठाय तुझं? की जाणूनबुजून दुर्लक्ष करतेयस?" त्याच्या प्रश्नाचा रोख सरळ होता.
काय??? बरा आहे ना हा? मी कशाला जाणूनबुजून दुर्लक्ष करू? आता काहीही उत्तर दिलं तरी त्याच्याकडे उत्तर तयारच असणार म्हणा. काय करू?
"नाही रे तसं काही नाही. हॅलो! कसा आहेस?"
"मी छान, मस्त, मजेत! तू सांग"
"मीही ओके."
"हे गाईज, हाय, कसे आहात सगळे?" मोहित आला होता. त्याच्या हातात काल मिळालेल्या पुस्तकातली २ पुस्तके होती.
"हाय मोहित. कसा आहेस? अभ्यास सुरूही केलास तू?" शर्वरीला तिच्या पुस्तकांची आठवण येऊन टेंशन आलं.
"अगं हो. काल घरी गेल्यावर एक पुस्तक वाचून काढलं, आता दुसरं वाचतोय" शर्वरी त्याच्याशी बोलण्यात गढून गेली. त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला एक मेंटॉर असाईन केला जाईल आणि दोघांच्या टीम मध्ये आम्ही काम करू. शर्वरीने ठरवून टाकलं होतं की ती मोहितबरोबरच काम करणार आहे. त्यामुळे माझ्याकडे निनादसोबत काम करण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नव्हता. आमच्या मेंटॉरचं नाव रागिणी होतं. ती आम्हाला ४ वर्षे सिनिअर होती. तिचं काम अगदी प्रिसाईझ असायचं, आमच्या शंकांना नेमकी उत्तरे द्यायची ती आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करायला प्रवृत्त करायची.
आमच्या ट्रेनिंगचा एक महिना संपत आला होता.
मोहित शर्वरीबद्दल खूपच कंसर्नड असायचा. त्याचं तिच्याशी वागणं मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे हे मला जाणवत होतं, फक्त ते तसंच निनादलाही जाणवतंय का हे मला निनादला विचारायचं होतं. शर्वरी मात्र जशी निनादबरोबर बोलायची तशीच मोहितबरोबरही.
निनादसोबत काम करताना त्याच्याबद्दल बर्याच गोष्टी नव्याने कळत होत्या मला. जसं की तो जितका बेफिकीर दिसतो किंवा दाखवतो स्वतःला , तितका तो केअरलेस नाही.
निनादची आणि माझी छान मैत्री झाली होती.
त्या दिवशी आम्ही काही असाईनमेंट्स सोडवत होतो, काही प्रोग्रॅम्स लिहायचे होते. माझं डोक खूप दुखत होतं त्या दिवशी, त्यामुळे काम काही उरकतच नव्हतं. त्यात प्रोजेक्ट बडी निनाद! मग तर संपलच! एक तर बोलण्यात त्याचा हात कोणी धरू शकायचं नाही. ऑफिस सुटायची वेळ होत आली होती. आज आमचा प्रोजेक्ट पूर्ण होणं आवश्यक होतं.
"काय गं? काम उरकत नाहीये का? माझा कोड झालाय लिहून, वर्क पण होतोय, पण तुझा कोड म्हणजे माझ्या प्रोग्रॅमचा इन्पुट डेटा आहे तो मिळाल्याशिवाय पूर्ण नाही होणार आपला प्रोजेक्ट!"
"सॉरी निनाद. मी लगेच पूर्ण करते"
"आपला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण नाही होणार असंच आपण काम करत राहिलो तर. आज सगळं कंपाईल, रन करून मगच घरी जाऊ"
"अरे तू कशाला थांबतोस? तू तुझा कोड सेंड कर मला, मी पूर्ण करते माझं काम आणि मगच जाईन घरी."
"हो का? इतकी थकलीयेस, बरं वाटत नाहीये तुला आणि म्हणे मी करते. नाही, मला मान्य आहे तू टॉपर होतीस, तू सगळं काम स्वतः करू शकतेस, पण मी पण ढ नव्हतो गं. मी करू शकतो तुला मदत."
मी काहीच बोलले नाही.
"हं. कळालं मला. तुला मदत नकोय. अशी कशी गं तू? इतकं मानी असू नये." त्याच्या चेहर्यावर मिष्कील भाव होता. तो जणू चेहरे वाचू शकायचा. कोणाच्या मनात काय चाललंय हे त्याला अचूक कळायचं.
"ए गप रे. मानी वगैरे काही नाही. स्वावलंबी म्हणतात याला"
"हो हो! हे स्वावलंबी मुली, तुला पटत असेल तर कॅफेटेरियामधून कॉफी घेऊन येऊया का? तुलाही बरं वाटेल."
"जशी तुझी इच्छा वत्सा " मी त्याच्यासारखेच हातवारे करत म्हणाले आणि आम्ही दोघे खिदळतच कँटीनकडे निघालो.
कॅफेटेरीयात तुरळकच लोक होते, आमच्यासारखे उशीरपर्यंत थांबलेले. निनादचं वॉलेट विसरलं म्हणून तो परत डेस्कवर गेला आणि मी कॉफी घ्यायला गेले. मला स्ट्राँग कॉफी आवडायची, अगदी नावालाच दूध घातलेली, त्यामुळे मी मशिन कॉफी घ्यायचे नाही. कॅफेटेरीयाचा अटेंड्ंट होता, सगळे त्याला अण्णा म्हणायचे, अण्णालाच सांगावं लागायचं.
"अण्णा एक कॉफी"
"कमी दूध, कमी साखर. मेरेको पता है. अभी लाया मैडम" अण्णाची बोलायची ढब साऊथ ईंडियन होती. तो होताही मूळचा तिकडचाच कुठला तरी. मॅडम मधल्या ''म'' चा उच्चार तो मैत्रिण मधल्या मै सारखा करायचा. त्यावरून निनादचं त्याच्याशी खूपदा तात्विक वाजायचं पण ते तेव्हढ्यापुरतंच. अण्णा खूप साधा आणि सरळ माणूस होता, मन लावून आपलं काम करत असायचा. मी हसून मान डोलावली आणि एक खिडकीशेजारचं टेबल पकडून बसले. पुढच्या आठवड्यापासून आमच्या टेस्टस सुरू होणार होत्या, ज्यांच्या रिझल्ट्स वरून आम्हाला प्रॅक्टिसेस मिळणार होत्या. मला कोणती प्रॅक्टीस मिळेल कोणास ठाऊक? मी विचारात हरवून गेले होते.
"मैडम.. आपका कॉफी.." अण्णाच्या आवाजाने मागे वळून पाहिलं, माझी कॉफी तयार होती. निनादचा अजून पत्ता नव्हता. कॉफीचा मग घेऊन मागे वळणार इतक्यात एक आवाज आला,
"अण्णा एक कॉफी. आपली नेहमीचीच"
"येस्सर..." म्ह्णून अण्णा किचनमध्ये गायब झाला.
कोण आहे म्हणून मी मागे नजर फिरवली तर समोर तो उभा होता.
पर्फेक्ट व्हाईट शर्ट, त्याच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या. त्याला साजेसा टाय, थोडासा सैल केलेला.
मी नजर उचलून पाहिलं तर त्याची नजर माझ्यावरच रोखलेली होती.
कशी होती ती नजर? हे नाही सांगू शकणार.
एकच शब्द असावा...
थेट.
समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारी. त्याच्या नजरेतून नजर सोडवून घेणं खूपच अवघड जात होतं मला.
काय हे मीरा?! स्टॉप लुकिंग अॅट हिम! मी मनात स्वतःला बजावत होते पण तशी कृती काही माझ्याकडून घडत नव्हती.
त्याला तरी काय होतय दुसरीकडे नजर वळवायला? तूच का नमतेपणा घ्यायचास? असं एक मन मला सांगत होतं. मग मात्र मी निग्रहाने मान वळवली.
"सर, आपका स्ट्राँग कॉफी" अण्णा त्याची कॉफी घेऊन आला.
मी माझ्या टेबलवर येऊन बसले. तो पलिकडच्याच टेबलपाशी जाऊन बसला.
"काय गं? घेतलीस का कॉफी?" निनाद आला एकदाचा.
"किती वेळ रे? नोटा छापायला गेला होतास की काय?" मला खरंतर राग आला होता निनादचा. का ते माहीत नाही.
"अगं हो हो! किती चिडशील? शर्वरी भेटली, तिला काही क्वेशन्स होते असाईनमेंटबद्दल ते विचारत होती.
"का? मोहित नाही आलाय का आज?" मी त्याला छेडलं. निनादच्या मनात शर्वरीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे खुद्द त्यानंच मला सांगितलं होतं, त्यामुळे जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा मी त्याला तिच्यावरून चांगलंच पिडायचे.
"ए गपे. घेतलीस ना कॉफी? चल आता. तुला माझी मदत नको आहे हे मला माहित आहे पण तुझं काम पूर्ण होईपर्यंत मी थांबणार आहे तुझ्यासोबत" मोहितचा विषय त्याला आवडला नव्हता हे स्पष्ट दिसत होतं त्याच्या चेहर्यावर.
"चल निघू" म्हणत मी उठले आणि निघाले. जाता जाता सहज शेजारच्या टेबलवर माझं लक्ष गेलं, तो अजूनही तिथेच होता.
त्याने एक हलकीशी स्माईल दिली आणि बास! मी ब्लँक झाले होते. एकाच जागेवर थांबले होते, पुन्हा त्याची ती अडकवणारी नजर माझ्यासमोर होती आणि मला पुन्हा हरायचं नव्हतं.
क्रमश:
अगं लक्ष कुठाय तुझं?, चल ना” निनादच्या आवाजाने मी पुढे बघितलं, तो प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत दार उघडून उभा होता. मी झटकन पुढे झाले.
कोण असेल तो?
सिनीअर असेल कोणीतरी. त्याची ती थेट नजर आठवली.
तो विचार बाजूला सारून मी प्रोग्रॅम करायला घेतला, मला लवकरात लवकर काम संपवून निघायला हवं होतं नाहीतर जसा उशीर होईल तसं बसची वाट बघणं मला कंटाळवाणं वाटायचं. भीती वगैरेचा प्रश्न नव्हता पण उगाच आई बाबा काळजी करत बसायचे त्यामुळे मी नेहमीच वेळेत जायचा प्रयत्न करायचे घरी. मी कोडिंग उरकलं आणि निनादला टेस्ट करून कोड सेंड केला. त्याचा program हि नीट रन होतोय हे चेक केल्यावर आम्ही निघायचं ठरवलं. निनादला बाय म्हणून मी निघणार इतक्यात तोच म्हणाला, “मीरा, उशीर झालाय ग, मी सोडू का तुला घरी?”
मी हसून त्याच्याकडे पाहिलं. तो ऐकणार नाही हे एव्हाना मला कळून चुकलं होत तरीही मी म्हणाले,
“जाईन रे मी बसने. मला सवय आहे”
“अगं पण खूप उशीर झालाय. मी येतो तुला सोडायला. इतक्या उशिरा तुला एकटीला जाऊ देणं मला बरोबर वाटत नाहीये. मी घरी येऊन काका काकूंना भेटून मगच जाईन.”
मी किती नाही म्हटलं पण ऐकेल तो निनाद कसला.
”आता पुरे हं मीरा, तू माझ्या बरोबर येतेयस. मला माहित आहेत तुझी तत्व, स्वावलंबी मुली! पण आत्ता माझं ऐक” असं म्हणून तो लिफ्टकडे निघालासुद्धा. आम्ही पार्किंगमध्ये गेलो आणि मी त्याला आधीच बजावलं,
“ए, नीट चालव बाईक, असाही तुझ्या बाईक चा स्पीड खूप असतो.”
“तू कधी बघितलास ग माझ्या बाईकचा स्पीड?” न समजून निनाद.
“अरे आपल्या induction च्या पहिल्या दिवशी नाही का तू मला विचारलं होतास, डू यू वॉन्ट लिफ्ट? तेंव्हा पाहिलं होत मी”
“फार लक्षात असतं ग तुझ्या, पण काळजी करू नकोस, तुला नीट सोडेन घरी” निनाद म्हणाला आणि खरच त्याने मला घरी छान आणून सोडलं. घरी पोहोचलो तर आई बाबा माझी वाटच पाहत होते.
“काय ग आज इतका उशीर?” इति आई.
“अग हो आई, आज खूप काम होत त्यामुळे वेळ झाला, अजून उशीर झाला असता पण ऑफिस मधल्या मित्राने सोडलं मला घरी”
“मीच तो मित्र. नमस्कार काका, नमस्कार काकू” निनाद हसत आत येत म्हणाला.
“तुम्हाला मी थोडा आगाऊ वाटण्याची शक्यता आहे, की असा कसा डायरेक्ट घरी सोडायला आला आमच्या मुलीला? पण इतक्या उशिरा तिला एकटीला बसने येऊन देणं मला बरोबर वाटलं नाही. म्हटलं तुमचीही भेट होईल, आणि असंही मीराने कधी मला स्वत:हून घरी बोलावलच नसतं. सो काकू आता जेवूनच जातो, घरी आईला सांगितलंय मी तसं”
निनाद म्हणजे ना.. इतकं मनमोकळं कसं काय असू शकत कोणी? मला हे सात जन्मात जमलं नसतं.
निनाद जेवण करून गेला आणि मी अभ्यास करत बसायचं ठरवलं. आई मागे लागली होती झोप म्हणून पण पुढच्या आठवड्यातल्या टेस्ट ची तयारी तर करायला हवी ना.
सो मी तीचं न ऐकता वाचत बसले. एक तासभर वाचलं असेल नसेल तोवर अचानक मला असं वाटलं कि कोणीतरी पहातंय माझ्याकडे, एकटक. आणि मी झटकन मागे पाहिलं... मागे तो होता... तसाच थेट बघत उभा.. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हसू होत. मी स्वप्न बघतेय का?? हा माझ्या घरात काय करतोय??? दोन मिनिटं मला काही कळायचंच बंद झालं. अचानक कसलातरी आवाज आला म्हणून मी इकडे तिकडे पाहिलं तर तो नव्हताच! अरे देवा! काय आहे हे? मला तो घरी आल्याचा भास झाला होता... चला मीरा मॅडम खूप झोप आलीये तुम्हाला Happy असं म्हणत मी स्वतःशीच खिदळले आणि झोपी गेले.
टेस्ट्स च्या तयारीत आणि टेस्ट्स देण्यात १५ दिवस कसे गेले ते आम्हा चौघांनाही कळलंच नाही. शेवटची टेस्ट झाल्यावर चौघेही कॅफेटेरियात जमलो.
“मला एकदम भारी वाटतंय, झाल्या एकदाच्या टेस्ट्स..” निनाद खुश होता.
“ए पण रिझल्टचं काय? मला खूप टेन्शन आलंय आत्तापासूनच” आमच्या एस क्यूबची चिंता....
“अग रिझल्टचं काय tension घेतेस? तुझे रिझल्ट छान असणार नाहीत तर कोणाचे असणार?” इति मोहित.
यावर मी हळूच एका डोळ्याने निनादकडे पाहून घेतलं, त्याला ते लक्षात आल्यावर लगेच त्याने डोळ्यांनीच मला काय चाललंय म्हणून दटावलं.
“चलो, निघते मी, उद्या भेटू” म्हणून मी निघाले. कॉरिडॉर मध्ये रागिणी भेटली.
“हाय, कशा झाल्या टेस्ट्स?”
“चांगल्या होत्या” माझं सावधपणाचं उत्तर.
“ग्रेट! आता नेक्स्ट वीक मध्ये प्रॅक्टिसेस assign होतील तुम्हाला. ऑल द बेस्ट”
“रा... कॉफी?”
हा कोणाचा आवाज म्हणून मी मागे बघितलं तर तो! रागिणीला कॉफी घ्यायला येतेस का म्हणून विचारत उभा. हा “रा” म्हणतो हिला? माझ्या मनाचे प्रश्न.
ती हो म्हणाली आणि ते दोघे निघाले. मीही निघाले घरी.
अचानक रागिणीला काय आठवलं कोणास ठाऊक, तिने मला हाक मारून पुन्हा बोलावलं,
मीरा, meet अनिरुद्ध. हा आपल्या कंपनीच्या core प्रॅक्टिसेस पैकी एका practice चा manager आहे. कुठली ते तुला उद्या कळेलच. आणि if you are the lucky one तर तो तुझा मॅनेजर ही असू शकेल”
“रा..” त्याने रागिणीकडे किती बोलतेस अस पाहिलं.
“अनिरुद्ध, ही मीरा” रागिणीने ओळख करून दिली.
“हाय. अनिरुद्ध” म्हणत त्याने हात पुढे केला. तसाच थेट बघत आणि काल रात्रीसारखं हसत.
“हॅलो, मी मीरा” म्हणून मी त्याच्या हातात हात दिला. आणखी काहीतरी बोलायला हवं हे मला कळत होतं पण शब्दच सुचत नव्हते. एक क्षण आमची नजरानजर झाली आणि पुढच्याच क्षणी रागिणी म्हणाली,
“चल, कॉफी घ्यायला जायचंय ना? बाय मीरा.”
“Bye. See you tomorrow”. असं म्हणून तोही वळला.
“बाय” म्हणून मीही निघाले.
सगळ्या प्रॅक्टिसेस च्या मॅनेजर्स नि आपापल्या ओळखी करून दिल्या. मग आले भागवत सर. पन्नाशी सहज ओलांडली असेल त्यांनी. इतका experienced माणूस, आमच्या ऑफिस चा डायरेक्टर, पण अगदी down to earth! भागवत सर त्यांच्या मृदू बोलण्याने, knowledge ने सर्वांच्यात उठून दिसायचे. आमच्या induction नंतर एक दिवस ते आमच्याशी बोलले होते. ते म्हणाले होते, We are investing in you. Work hard and make us proud. You are the first batch of trainees we are hiring”.
मग त्यांनी त्याची, सर्वात यंग आणि bright मॅनेजर म्हणून ओळख करून दिली. ते म्हणाले, “अभि कल कि हि बात लगती है जब मैने अनिरुद्ध को hire किया था. Now he is hiring his own people. I wish him to get the best, as I got”.
मग तो उठला, आपली ओळख करून दिली आणि वर हेही सांगितलं की त्याच्या प्रॅक्टिस मध्ये एकच जागा आहे. तो म्हणाला “आम्ही फ्रेशर्स ना आजपर्यंत घेततेलं नाही आमच्या टीम मध्ये, but you never know”. Maybe तुमच्यापैकी कोणी एक माझ्या टीम मध्ये असू शकतं”. त्याच्या प्रॅक्टिस मध्ये असलेले सगळे core developers होते. ती टीम सगळ्या teams चा अर्क होती. मी मनात म्हटलं छे, या टीम मध्ये कसलं होतंय आपल्या कोणाचं selection.
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच धाकधूक होती, कुठली प्रॅक्टिस मिळतेय याची. शर्वरी आणि मोहितला एकच प्रॅक्टिस मिळाली होती. त्यामुळे निनादला हवी ती प्रॅक्टिस मिळूनही फार काही आनंद झाला नव्हता. आणि माझ्या इनबॉक्स मध्ये नवीन मेलचा पॉपअप आला.
मला त्याची practice assign झाली होती.
आता तो माझा बॉस असणार होता. अनिरुद्ध.
थोड्याच वेळात दुसरा मेल आला. ती meeting request होती. त्याने टाकलेली. one on one. संध्याकाळी ४ ला meeting होती. निनाद आणि मी कॉफी घ्यायला लवकरच गेलो.
“काय मग खुश ना? तुला हवी ती प्रॅक्टिस मिळाली.” मी निनादला विचारलं.
“हम्म” निनाद कसल्यातरी विचारात होता.
“काय झालं निनाद? लक्ष कुठाय तुझं?”
“काही नाही गं.”अजूनही त्याचं लक्ष नव्हतं.
“मला माहित आहे काय झालंय ते. तू तुझ्या आवडत्या प्रॅक्टिसमध्ये पण तुझा जीव मात्र दुसऱ्या प्रॅक्टिसमध्ये अडकलाय. मग कसा असणार तू खुश!” मी त्याला उगाच डिवचलं.
त्याला ते काही जास्त आवडलं नाही. खरंच त्याला वाईट वाटलं होतं. आमची एस-क्यूब मोहितला जास्तच भाव देत होती आणि मोहितचा स्वभाव हे attention नक्कीच encash करणारा होता. मला जाणवलं कि निनाद शर्वरीकडे ओढला गेलाय. तो हे मान्य करत नसला तरी त्याला तिच्या प्रत्येक शब्दाचा फरक पडायचा.
मी कॉफी संपवून जागेवर आले. पावणेचारलाच मी meeting रूम मध्ये जायचं ठरवलं. उगाच उशीर नको.
मी एका हातात लॅपटॉप आणि एका हातात माझी नोटबुक घेऊन मीटिंग रूमचा दार उघडलं आणि माझ्या लक्षात आलं, आधीच आत कोणीतरी आहे. मी न बघताच sorry sorry म्हणत परत दार लावणार इतक्यात ती व्यक्ती म्हणाली,
“हाय मीरा, प्लीज कम इन” आणि मी पाहिलं, तो अनिरुद्ध होता.
“ओह्ह... आय ॲम सॉरी.. May I come in?” मी पुन्हा मूर्खासारखं विचारलं.
त्यावर तो हसला, म्हणाला, “Yes please.”
मी आत गेले. त्याने समोरच्या खुर्चीकडे हात दाखवून बैस म्हणून सांगितलं.
मला खूप टेन्शन आलं होतं. आजपर्यंत ऑफिसचं काम म्हणजे जणू कॉलेजचं extension होतं. ऑफिसला येऊन आम्ही फक्त टेस्ट्सचा अभ्यास करायचो आणि घरी जायचो. किरकोळ कोडिंग करायचो. आता आम्हाला बॉसेस असणार होते, आमचं काम खऱ्या अर्थाने सुरु होणार होतं.
“Thank you sir “ म्हणत मी बसले.
“अनिरुद्ध. Call me अनिरुद्ध. Ok, First thing is, here, in our company, we all call each other by their first name only.” मग त्याने टीमचं working समजावून सांगितलं. टीम मध्ये मी सोडून पाच जण होते. सगळे माझ्यापेक्षा experienced आणि core developers होते. मी त्यांच्यासमोर अगदीच लिंबूटिंबू होते. आणि दुसरं म्हणजे टीम मध्ये मी एकटीच मुलगी असणार होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझं डेस्क चेंज झालं. मी माझ्या टीम मध्ये बसायला जाणार होते. या आधी आम्ही चौघे एकाच क्युबिकल मध्ये बसायचो, आता मात्र आम्ही चार दिशांना असणार होतो. अर्थात मोहित आणि शर्वरी एकत्रच असणार होते. पण मला मात्र निनाद बरोबर हाकेसरशी बोलता येणार नाही याचं वाईट वाटलं. मग टीम मधल्या सर्वांशी formal ओळख झाली. रवी आणि कुमार दोघे साऊथ इंडियन होते. विराज आणि शेखर दोघे नॉर्थ इंडियन.
“चलो, आता अनिरुद्धला पार्टनर मिळाला” कुमार म्हणाला.
“मिळाला नाही रे, मिळाली” रवीने त्याची चूक दुरुस्त करत म्हटलं “आधी तो एकटाच मराठी होता ना टीम मध्ये” मला उगाचंच धडधडल्यासारखं झालं.
आमचं काम सुरु झालं. एक नवीन प्रोजेक्ट सुरु होणार होता. त्यात रवी आणि मी काम करणार होतो. रवीने मला बऱ्यापैकी बेसिक गोष्टी समजावून सांगितल्या आणि वर हेही सांगितलं की, कोणालाही विचार काही प्रश्न असतील तर, सगळे मदत करणारे आहेत.
मी नवीन गोष्टी शिकत होते, त्या apply करत होते. मस्त होतं हे सगळं. आपण कॉलेजमध्ये शिकतो त्यापेक्षा कितीतरी वेगळं. शिकणे आणि प्रॅक्टिकल कोडींग करणे यात खरंच खूप अंतर आहे हे मला कळायला लागलं होतं.
मी टीम जॉईन करून दोन महिने होऊन गेले होते. आताशा आम्ही चौघे एकत्र खूप कमी वेळा भेटायचो. निनाद आणि मीच एकमेकांना फोन करून coffee घ्यायला जायचो इतकंच.
त्या दिवशी मी निनाद आणि मी कॉफी घेत होतो, मला जाणवलं ह्याचं काहीतरी बिनसलंय. मी काही विचारणार इतक्यात त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली.
“मीरा, मला असं वाटतंय कि मी शर्वरीच्या प्रेमात पडलोय”
“क्काय?” मला जे इतके दिवस त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत ते निनादने finally मान्य केलं होतं.
“हो. मी खूप विचार केला या गोष्टीवर.”
“हो का? काय पण विचार करणारा! मित्रा, तुझ्या चेहऱ्यावर ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून लिहिलेलं होत कि ती तुला आवडते. तुला ते कळायला वेळ लागलाय इतकंच”
मी उगाचच त्याला पिडत म्हटलं.
“मग काय? शेहनाईयाँ कब सुनवा रहे हो?”
“ए गप्पे... शेहनाईयाँ काय लगेच? मी अजून तिला सांगितलेलं नाहीये. तिलाही माझ्याबद्दल तसंच वाटतं का हे मला माहित नाहीये अजून. तू उगाच सूतावरून स्वर्ग गाठू नकोस” आणि आम्ही खिदळलो.
म्हटलं चला, मला अगदी पहिल्यापासून तो मोहित शर्वरीच्या मागेपुढे करायचा ते अज्जीबात आवडलं नव्हतं. त्याचा स्वभावच थोडा क्लिष्ट होता. शर्वरीसारख्या गोड मुलीसाठी मनमोकळा निनादच योग्य होता.
मी आनंदातच डेस्कवर परत आले. तेव्हढ्यात रवी आला. त्याला विचारलं तर तो म्हणाला मी स्टेटस द्यायला चाललोय. मी म्हटलं इतक्यात? आम्ही रोज संध्याकाळी स्टेटस मेल्स पाठवायचो. आज अजून चारही वाजले नव्हते.
“अगं ऑनसाईट नाही. अनिरुद्धला स्टेटस द्यायचंय” रवी म्हणाला.
पण मेल्स मध्ये अनिरुद्धही cc त असायचाच की.
मी असा विचार करतेय हे बहुतेक त्याला कळलं असावं.
“कामाचं नाही. काम करणारे कसे काम करतायत त्याचं स्टेटस देतो मी त्याला” असं म्हणून हसून रवी निघून गेला.
काम करणाऱ्यांचं स्टेटस? मी आणि रवी एकत्र काम करत होतो. रवीच्या कामाबद्दल काही प्रश्नच नव्हता. तो आणि अनिरुद्ध दोघे एकमेकांचे जिवलग मित्र होते. त्या दोघांनीच हि टीम सुरु केली होती. मग कोणाचं स्टेटस देतो हा? माझ्या कामाचं? अरे देवा! मी हा विचारच केला नव्हता. रवीचा स्वभाव खूप चांगला होता. मला आलेल्या असंख्य शंकांना तो नेहमीच उत्तर द्यायचा. आणि त्याच्या वागण्यात कुठेही मी इतका experienced आहे आणि हि काल आलेली मुलगी असा अविर्भाव नसायचा.
गेल्या दोन महिन्यात माझं आणि अनिरुद्धचं एकदाही हाय हॅलो पलिकडे बोलणं झालं नव्हतं. पण ज्या अर्थी रवी असं म्हणाला त्या अर्थी माझ्या कामाबद्दल त्याला सगळं कळत होतं.
एखादि कोडिंगची शंका असली, काही वर्क होत नसलं तर सगळे आधी एकमेकांना विचारायचे. काही नवीन functions असली तर ती discuss व्हायची. टीम मधले सगळे जण आपापले certifications up to date ठेवायचे. पण काहीही सुटत नसलं, समजत नसलं तर सर्वांचा ultimate उपाय असायचा अनिरुद्ध. त्याच्याकडे एखादी गोष्ट गेली आणि त्याच सोल्युशन मिळालं नाही असं कधीच व्हायचं नाही. सगळ्या टीमचा अर्क होता तो जणू. आम्ही सगळे यायच्या आधी तो ऑफिसला आलेला असायचा आणि आम्ही सगळे निघाल्यावरच निघायचा. त्याला टीमचा खूप अभिमान होता. असा कुठलाच कोड नाही जो माझी टीम करू शकत नाही असं म्हणायचं तो. तो नुसता विंगमध्ये असला तरी आम्हाला सगळ्यांना सगळं under control आहे असं वाटायचं.
दोन दिवसात project release होती त्यामुळे कामातून डोकं वर काढायलासुद्धा वेळ झाला नाही. अखेर release च्या दिवशी काम उरकेपर्यंत खूपच उशीर झाला. मी आणि रवी सोडलो तर आमच्या विंगमध्ये सगळे घरी गेले होते. निनादने सुद्धा दोनदा फोन करून अखेर मला घरी सोडायचा विचार सोडून दिला होता. अर्ध्या तासापूर्वीच तो घरी निघून गेला होता.
Finally सगळं काम उरकल्यावर रवीने मला विचारलं
“मीरा, तू घरी कशी जातेस?”
“मी? बसने.” मी उत्तर दिलं.
“अरे बापरे. मी तुला आधीच जा म्हणून सांगायला हवं होतं मग. मी सोडतो असंही नाही म्हणू शकत कारण मीच आज गाडी घेऊन नाही आलो, गाडीचा काहीतरी घोटाळा झालाय. मी चालत आलोय आज. तुला रिक्षाने सोडायला येऊ का?” रवीच्या आवाजात काळजी होती.
“नाही मी जाईन बसने, don't worry “ असं मी त्याला म्हणाले खरं पण आता बस मिळणं अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना होती.
“Great job guys! pack your bags... चला मी सोडतो तुम्हाला दोघांना घरी” अचानक अनिरुद्ध आला होता. तो ऑफिसमध्ये आहे? इतका उशीर झाला तरी? Maybe meeting room मध्ये असेल, मी मनाशीच म्हटलं.
“मी जाईन बसने” मी पुटपुटले. मला का काय माहित त्याच्याबद्दल एक प्रकारची आदरयुक्त भीती वाटायची कधी कधी.
“चल. मी सोडतोय तुला” त्याने माझ्याकडे पाहत म्हटलं आणि मी पटकन bag पाठीला अडकवली, जणू नाही म्हणणं हा माझ्यासाठी option च नव्हता.
रवीच घर जास्त लांब नव्हतं. रवी उतरला.
“बाय मीरा. बाय अनिरुद्ध, भेटू उद्या” म्हणून रवी गेला. रवी जाऊन दोन-तीन मिनिट झाले तरी अनिरुद्ध गाडीच चालू करेना. काही प्रॉब्लेम आहे का असं मी विचारणार इतक्यातच त्याने मागे पाहिलं.
“मीरा, प्लीज पुढे येऊन बैस. मी driver नाहीये.” रवी उतरल्यावर पुढची सीट रिकामी झाली होती. मला कळालंच नाही, हो म्हणू कि नाही. हो म्हणावं तर तो मलाच आगाऊपणा वाटत होता आणि नाही म्हणावं तर आढ्यता.
त्याने पुन्हा मागे पाहिलं आरशातून. आणि यावेळी त्याने आपली नजर हटवली नाही. मला उतरावंच लागलं. मी पुढे जाऊन बसले. मनात कसंतरी वाटत होतं. मी आजतागायत कोणाच्याही कारमध्ये front seat वर बसले नव्हते. त्याने माझा पत्ता आधीच विचारला होता त्यामुळे घरी जाईपर्यंतचा वेळ आम्ही दोघेही एकमेकांशी काहीच बोललो नाही. घराजवळ उतरल्यानंतर त्याला कसबसं बाय म्हणून मी घरात गेले.
घरी गेल्यावर पाहिलं तर आई बाबा जेवायचे थांबले होते. मग जेवून आई बाबांना गुड नाईट म्हणून माझ्या खोलीत आले. अचानक माझा फोन वाजायला लागला. इतक्या उशिरा फोन? कोणाचा म्हणून बघितला तर स्क्रीनवर नाव होतं अनिरुद्ध. मी जॉईन झाल्यावर त्यानेच सगळ्यांचे पर्सनल नंबर्स मला दिले होते, long work hours मध्ये लागतील म्हणून. माझं काही विसरलं का काय त्याच्या कारमध्ये म्हणून मी थोडं घाबरतच फोन उचलला.
“हॅलो”
“हॅलो मीरा, अनिरुद्ध बोलतोय”
“हो. बोला” अचानक माझ्या तोंडातून आदरार्थी शब्द गेले.
तो हसला, म्हणाला, “पोहोचलीस ना नीट?”
मला काही कळेचना. यानेच मगाशी सोडलं ना मला घरी?! मग आता असं का विचारतोय?
“हो.. मगाशीच” मी म्हटलं.
“ओके. मी निघतो मग. see you tomorrow. Bye.” असं म्हणून त्याने फोन ठेवला.
म्हणजे तो आत्तापर्यंत घराबाहेर थांबलाय? मी धावतच खिडकीपाशी गेले. खाली रस्त्यावर त्याची गाडी निघून जात होती.
- क्रमश:
मी बघतच राहिले. तो इतका वेळ बाहेर थांबला होता! का? मी मेसेज करायला हवा होता का घरात आल्यावर? पण काय म्हणून? त्याच विचारात मला झोप लागली.
नंतरचा एक आठवडा थोडा निवांत होता. बरोबर एका आठवड्याने आमच्या ऑनसाईट टीमकडून मेल आला. रवी आणि माझ्या कामाचं त्यांनी कौतुक केलं होतं. माझ्या आयुष्यातला पहिला appreciation मेल! खूप मस्त वाटत होतं. त्या मेलला अनिरुद्धने रिप्लाय केला, ज्यात त्याने आमच्या दोघांच्या sincerity आणि हार्डवर्कचं
कौतुक केलं होतं. लगेचच त्याचा दुसरा मेल आला. आज टीम dinner होतं, to celebrate our team’s hardwork.
मी घरी फोन करून सांगितलं कि मला उशीर होईल. आई बाबांनी जपून ये, काळजी घे म्हणून सांगितलं. आम्ही venue ला पोहोचलो. ते एक मोठं इटालियन रेस्टॉरंट होतं. आधी drinks menu आला. सर्वांनी आपापली ऑर्डर दिली. मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. एकतर मी इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आधी कधीच आले नव्हते आणि दुसरं म्हणजे मी सांगणार काय होते? Drinks घेणं मला या जन्मात जमणार नव्हतं, मग सांगू काय? पाणी? त्याने माझं हसं होईल का? काय करू? अनिरुद्धने अजून ऑर्डर दिली नव्हती. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं, मी आधीच बावचळले होते त्यात अजून भर पडली. त्याची ती थेट नजर. मी उगाचच मेन्यूत डोकं खुपसलं. आणि त्याने ऑर्डर दिली.
“Diet coke. Two. मीरा, तुला diet coke चालेल ना?” त्याने विचारलं आणि माझा जीव भांड्यात पडला. माझा प्रश्न त्याने चुटकीसरशी सोडवला होता. मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच त्याच्याकडे पाहिलं, मला thank you म्हणायचं होतं. त्याने ते ओळखलं आणि तो छान हसला. Dinner नंतर आम्ही सगळे निघालो. रवी, विराज आणि शेखर एकत्र आले होते, ते एकत्रच जाणार होते. कुमार त्याच्या two wheeler वरून जाणार होता. मी सर्वांना बाय म्हणून निघणार इतक्यात अनिरुद्ध म्हणाला,
“मीरा, थांब. मी सोडतो तुला”
"Thank you पण मी जाईन बसने” मी बोलायचा प्रयत्न केला, त्यावर तो माझ्याकडे बघत फक्त हसला, म्हणाला “चल. इतक्या उशिरा मी तुला बसने जाऊ देणार नाही”
आम्ही निघालो.
“Thank you“ मी म्हटलं.
“Thanks कशासाठी?” त्याने न समजून विचारलं.
“मगाशी मला काय ऑर्डर द्यायची ते कळतच नव्हतं. तुम्ही ऑर्डर दिलीत म्हणून. माझं उगाच हसं झालं नाही.”
आणि तो खळखळून हसला.
“पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नाही तू! मी तुझ्यापेक्षा ४ वर्षांनी मोठा आहे फक्त, सो तुम्ही वगैरे म्हणायची गरज नाही. आणि हसं? ते का बरं झालं असतं? उलट तू एकटी मुलगी आहेस ग्रुपमध्ये त्यामुळे सगळे अगदी जपून वागत होते आज, त्यांचं हसं होऊ नये म्हणून. इतके कॉन्शस तर सगळे काम करतानाही नसतात.”
यावर उत्तरादाखल मी नुसतीच हसले.
“मीरा, your work was really commendable . I must say, you have worked like our teams level of perfection. And that’s great!
मी जेंव्हा तुला हायर केलं होतं तेंव्हा टीम मध्ये बरीच चर्चा झाली होती या गोष्टीवरून, फ्रेशरला घ्यावं कि नको. But you have proved my decision right “
मला काय बोलावं तेच कळत नव्हतं. मला कधी वाटलंच नव्हतं कि या टीममध्ये माझं सिलेक्शन होईल. आत्ता माझ्या कामाचं अनिरुद्ध कौतुक करत होता. माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता तो. मी त्याला thank you म्हटलं. मला घरी पोहोचल्यावर झोपेपर्यंत त्याचे शब्द आठवत होते. मी अजून मन लावून काम करायचं ठरवलं. इतर कोणी कौतुक केलं असतं तर मला इतकाच आनंद झाला असता का? कि अनिरुद्धने कौतुक केल्यामुळे मला आनंद झालाय? या प्रश्नाशी खेळत मी झोपी गेले.
पुढच्याच दिवशी मला नेक्स्ट प्रोजेक्ट assign झाला. मी आणि कुमार त्यात एकत्र काम करणार होतो. कुमार फारसा बोलका नव्हता. आम्ही एकत्र काम सुरु केलं, मला काही गोष्टी नवीन होत्या. काही शंका विचारली कि तो मला म्हणायचा तुझं तू उत्तर शोध. त्याचंहि बरोबरच आहे म्हणा, किती दिवस मी इतरांना शंका विचारणार होते. मग मी शंकासमाधानासाठी धडपडायचे. काही प्रश्नांची उत्तरं मिळायची काहींची नाही. पण मी मन लावून काम करणं सोडलं नाही.
त्या दिवशी बरंच काम संपवायचं होतं. माझा कोड लिहून झाला होता. रन ही होत होता व्यवस्थित पण काहीतरी छोटीशी चूक होती. Output format मला हवा तसा येत नव्हता. मी बऱ्याच गोष्टी करून बघितल्या पण जमेना. शेवटी मी कुमार ला विचारलं कि यात मदत करशील का? पण त्याने माझ्या मेसेजला काहीच उत्तर दिल नाही. मला लगेच त्याच्या डेस्ककडे जाऊन विचारणं योग्य वाटेना. त्यात आज रवी पण आला नव्हता, नाहीतर मी रवीला विचारलं असतं. लंच ब्रेक पर्यंत प्रयत्न करू नाहीतर परत कुमारला विचारू असं ठरवून मी पुन्हा कोडमध्ये चेंजेस केले. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मी माझ्या desired output पर्यंत पोहोचले होते. अजून थोडं काम बाकी होतं. तेव्हढ्यात निनादने कॉफी साठी फोन केला. तो आणि मी जाऊन कॉफी पिऊन आलो. मग परत मी कामाला सुरुवात केली. मेलबॉक्स मध्ये नवीन मेल चा पॉपअप आला.तो कुमार चा मेल होता. त्याने सव्वाचारलाच स्टेटस पाठवून दिलं होतं. आणि त्यात मी करत असलेलं काम incomplete आहे असं लिहिलं होतं कि ज्याचं स्टेटस मी पाठवेन. मला काही कळेचना, एकतर इतक्या आधी त्याने स्टेटस का पाठवलं? आणि पाठवायच्या आधी त्याने माझ्या कामाचं स्टेटस माहित करून न घेताच मेल पाठवला होता. या आधीच्या प्रोजेक्टमध्ये रवी आणि मी आमचं झालेलं काम डिस्कस करायचो आणि मगच स्टेटस पाठवायचो. त्यामुळे मला कुमारचं हे वागणं जरा वेगळंच वाटलं. मी त्याच्या डेस्ककडे जाऊन पाहिलं तर तो निघून गेला होता. आता मात्र मी ठरवलं, काहीही झालं तरी काम पूर्ण करून स्टेटस पाठवून मगच घरी जायचं. पुन्हा कोडमध्ये डोकं खुपसलं. एव्हाना बराच उशीर झाला होता. अखेर माझा कोड पूर्ण वर्क झाला, आउटपुट मला जसं हवं होतं तसं मिळालं आणि मी “येस्स!!!” म्हणून जवळजवळ ओरडलेच. ”काय हे मीरा? ऑफिस मध्ये आहेस तू! विसरलीस का काय?” असं स्वतःशीच बडबडत मी हसले.
“सो... झाला का कोड वर्क?” मी दचकलेच. मागे अनिरुद्ध उभा होता.
“ओह्ह... I’m sorry...” माझा मगाशी केलेला दंगा याने पाहिला असणार. छे! इतके कसे बावळट आपण? माझ्या मनात विचार आला.
“Sorry? कशाबद्दल? काम छान झालं म्हणून तुला आनंद झाला ना? मग त्याबद्दल माफी का मागतेस? It’s good that you are enjoying your work. In fact it’s great! Keep it up ” असं म्हणून तो त्याच्या डेस्कवर निघून गेला.
मी स्टेटस मेल पाठवला आणि घड्याळात पाहिलं तर ८ वाजले होते. निघायला हवं होतं. कामाच्या नादात खूप उशीर झाला होता, पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले होते. कॅफेटेरियात कॉफी घेऊन घरी जावं का असा विचार करत असतानाच मागून आवाज आला,
“मीरा...कॉफी?” अनिरुद्ध विचारत होता.
मी मानेनेच हो म्हटलं आणि आम्ही कॅफेटेरियात निघालो.
अण्णाला कॉफी सांगून एका टेबलापाशी येऊन बसलो. मला उगाचच awkward वाटत होतं. ते अनिरुद्धने ओळखलं असावं. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. घरी कोण आहे, कुठले काय वगैरे. तो आणि त्याचे बाबा दोघेच राहायचे. त्याची आई काही वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती.
पहिल्यांदाच आम्ही इतका वेळ बोलत होतो. त्याची ती समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारी नजर पाहून प्रत्येकवेळी मला अडखळल्यासारखं होत होतं. तिच्यात मी अडकायचे आणि सुटणं अवघड होऊन बसायचं. परत तर त्यालाही ते लक्षात आलं बहुतेक. मग त्याच्या नजरेची धार आणखीनच तीव्र झाली. आणि एक मिष्कीलपणाही आला तिच्यात. मग मात्र मी निग्रहाने खिडकीबाहेर नजर खिळवून बोलायला सुरुवात केली.
“काही सापडलं तर मलाही सांग” तो म्हणाला.
“काय?” न कळून मी विचारलं.
“मगापासून काहीतरी शोधतेयस ना खिडकीबाहेर?” त्याच्या बोलण्यातली खोच कळली मला. पण माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. मी त्याच्याकडे पाहिलं शेवटी. मी पुन्हा हरले होते... खरंतर स्वतःला त्याच्यासमोर हरू
देणं मला आवडायला लागलं होतं.. आणि त्याला जिंकताना बघणंही :)
क्रमश:
या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maitrin.com/node/3254
तुझमे तेरा क्या है -२
https://www.maitrin.com/node/3257
तुझमे तेरा क्या है -३
https://www.maitrin.com/node/3289
तुझमे तेरा क्या है -४
https://www.maitrin.com/node/3306
तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maitrin.com/node/3318
पुढे चालू
मी त्याच्याकडे ओढली जातेय. हे मला प्रकर्षाने जाणवत होतं. अनिरुद्ध तुझा बाॅस आहे मीरा. काम आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेवलं पाहिजे हे मला कळत होतं पण वळत नव्हतं.
माझ्या प्रोजेक्टचं ढीगभर काम येऊन पडलं होतं. वेळ कसा जात होता कळतच नव्हतं. सकाळी येऊन मी जे कामात डोकं खुपसायचे ते जेवणापुरतंच उठायला मिळायचं मला. निनादबरोबरही जास्त बोलणं व्हायचं नाही. एकदोनदा तर तो वैतागलाच. म्हणाला, “काय गं काम काम? किती काम करशील? आजूबाजूला काय चाललंय तुला माहिती तरी आहे का?” त्याचा वैताग मी समजू शकत होते. माझं खरंच दुसऱ्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नव्हतं. हा प्रोजेक्ट अगदी डिमांडिंग होता आणि मी स्वतःला झोकून देऊन काम करत होते. एक दिवस आॅनसाईट टीमचा मेल आला कि आम्ही काही फंक्शन्स पाठवतोय आणि ती एन्ड ऑफ द डे पर्यंत कोड करून हवी आहेत. मेलची ॲटॅचमेंट उघडली तर त्यात अक्षरश य फंक्शन्स होती. मी ५-१० मिनिटं कुमारच्या मेलची वाट बघितली. म्हटलं आता टास्क्स असाईन करेल मग करेल पण नाही. अर्धा तास झाला तरी त्याचा मेल आला नाही. मग मात्र मी उठून त्याच्या डेस्ककडे गेले. बघितलं तर तो आलाच नव्हता. मी परत माझ्या जागी आले. आता काय करावं असा विचार करत असतानाच अनिरुद्ध आला. तो माझ्या डेस्कपाशी आल्या आल्या मी माझ्याही नकळत उठून उभी राहिले. त्याने सांगितलं आज कुमार येणार नाही, काहीतरी अर्जंट काम आहे त्याचं, त्यामुळे त्याने लिव्ह घेतली आहे. सो, अनिरुद्ध माझ्याबरोबर काम करणार होता.
“फंक्शन्स खूप आहेत. यू विल नीड हेल्प. तू टास्क्स असाईन कर.” असं म्हणून तो गेला. मी टास्क्स असाईन केले आणि कामाला सुरुवात केली. दुपारचे २ वाजले होते. मी जेवायलासुद्धा उठले नव्हते. का काय माहित पण झपाटल्यासारखं काम करत होते मी. मला माझं काम मनापासून आवडायला लागलं होत. अखेर दुपारी ३ ला निनादचा फोन आला, त्याने “कॅफेटेरियात ये, आत्ताच्या आत्ता” इतकंच बोलून त्याने फोन कट केला. मला खरंतर काम लवकरात लवकर पूर्ण करायचं होतं पण निनादचा आवाज मला जरा वेगळाच वाटला म्हणून मी उठले.
कॅफेटेरियात गेले तर निनाद डोकं पकडून बसला होता.
“काय रे काय झालं?” मी विचारलं.
“मीरा....” त्याचे डोळे पाण्याने भरले होते.
“निनाद आर यू ओके?” मला काही कळेचना काय झालंय.
“शर्वरी... शर्वरीला मोहितनं प्रपोज केलंय” त्याच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत होतं.
“अरे मेरे शेर.... प्रपोजच केलंय ना?! त्यात काय मग? दुल्हन तो वो तेरीही बनेगी!” मी त्याचा मूड हलका व्हावा म्हणून म्हटलं.
“मीरा प्लीज... ती हो म्हणालीये त्याला” आणि त्याने मान फिरवून खिडकीबाहेर बघायला सुरूवात केली.
आणि मी? मी अवाक् झाले होते. शर्वरी?!
ती?? आमची एस क्यूब??!
तिने मोहीतला हो म्हटलंय?! का?
कधी झालं हे सगळं?
मी कुठे होते तेंव्हा? मला काहीच कळत नव्हतं. जणू मी त्या मुलीला ओळखत असूनही अजून अनोळखीच होती ती. निनाद तिच्यावर जीव ओवाळून टाकतो हे तिला एकदाही कळलं नसेल? का कळूनही ती अशी वागतेय? नाही नाही! शर्वरी अशी नाही. ती मुद्दाम असं काही करणार नाही. तिला निनादला तिच्याबद्दल काय वाटतंय हे कळायला हवं..
“मीरा...” निनाद मला विचारात गढलेली पाहून अस्वस्थ झाला होता.
“निनाद मी निघते” म्हणून मी तिथून उठले. मला शर्वरी बरोबर बोलायला हवं होतं. ती असं कसं काय वागू शकते? इज शी आऊट आॅफ हर माईंड? निनादचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला कसं काय कळत नाहीये? मागून येणाऱ्या निनादच्या हाका पाठीमागे टाकत मी शर्वरीच्या डेस्ककडे निघाले. तिथे जाऊन बघितलं तर शर्वरी आणि मोहित काहीतरी बोलत होते. माझे पाय जागच्या जागी थांबले. त्या माणसाची मला चीड यायला लागली होती.
“शर्वरी, मला तुझ्याशी बोलायचंय” मी म्हटलं.
“बोल ना” तिने मोहितसमोर बोलू शकतेस अशा अविर्भावात माझ्याकडे पाहिलं.
“मला तुझ्याशी एकटीशी बोलायचं आहे. प्लिज माझ्याबरोबर चल” मला काहीतरी सोक्षमोक्ष लावायचाच होता या मोहित प्रकरणाचा. शर्वरीला घेऊन मी पुन्हा कॅफेटेरियात गेले तर निनाद अजून तिथेच होता. मला आणि शर्वरीला एकत्र बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झर्रकन बदलले. तो पुढे आला,
“मीरा, जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी.” म्हणून त्याने माझ्या मनगटाला धरून जवळ जवळ ओढलंच. आम्ही कॅफेटेरियाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन उभे राहिलो. मी वैतागलेच. असा कसा हा?
“निनाद, प्लिज..” त्याने लगेच माझा सोडला.
“सॉरी मीरा. रियली सॉरी. पण मला माहित आहे तू काय करणार होतीस ते. शर्वरीला जाब विचारणार होतीस ना?” त्याने अचूक ओळखलं होतं मी काय करणार ते.
“तो मी विचारणारच आहे आणि तू मला थांबवू शकत नाहीस, कळलं? तिच्या डोक्यात काय चाललंय ते मला कळायलाच हवं.” मीही असाच हा विषय सोडणार नव्हते. माझ्या मित्राच्या आयुष्याचा प्रश्न होता हा.
“मीरा प्लिज... डोन्ट ट्राय टू बी अ सेंट. तू माझी मैत्रीण आहेस ना? मग प्लिज, मला आणखी काही त्रास नको वाटत असेल तर असं काही करू नकोस.तू जर तिच्याशी या विषयावर बोलणार असलीस तर आपली मैत्री त्याच दिवशी संपेल. आणि मला तुला गमवायचं नाहीये” माझी मैत्रीण या शब्दांवर जोर देत निनाद म्हणाला. मी थांबले. मागे वळून शर्वरीला आपण नंतर बोलू अशी खूण केली, तिने खांदे उडवले, हे काय असं म्हणून आणि ती निघून गेली. थँक यू म्हणून निनादही निघून गेला. माझं डोकं दुखायला लागलं होतं. काय आहे हे? शर्वरी आणि मोहितचा इतका का राग येतोय मला? तिला ज्याला हवं त्याला हो म्हणण्याचा अधिकार आहेच की. मी कोण ठरवणारी तिने कोणाला हो आणि कोणाला नाही म्हणावं? निनादला वाईट वाटलं कि मला त्याचा त्रास का होतो? त्याच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स त्याने मला सांगितलेच पाहिजेत आणि ते मीच सोडवले पाहिजेत असं का वाटत मला?
अण्णाच्या हातची कॉफी घेतल्यावर जरा बरं वाटायला लागलं. मी परत माझ्या डेस्कवर आले, सगळं काम पूर्ण करून स्टेटस अनिरुद्धला पाठवलं आणि ऑफिसमधून निघाले.
दोन महिने असेच गेले. प्रोजेक्टचं काम प्रचंड होतं. या दोन महिन्यात मी निनाद किंवा शर्वरी दोघांशीही हाय हॅलो पलीकडे काहीच बोलू शकले नव्हते. या दोन महिन्यात झालेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे कुमारने स्वतः सांगून हा प्रोजेक्ट सोडला होता आणि अनिरुद्ध आणि मी या प्रोजेक्टवर काम करायला लागलो होतो. आम्ही दोघे रोज सकाळी टास्क्स ठरवायचो आणि दिवसभर अगदी मान दुखेपर्यंत काम करायचो.
फायनली प्रोजेक्ट संपला. आता लगेचच कुठला नवीन प्रोजेक्ट लाईन मध्ये नव्हता. ऑफिसमध्ये दिवाळीच्या सेलिब्रेशनची धामधूम होती. देऊन देऊन ऑफिसवाले एकच दिवस सुट्टी देणार होते आम्हाला. माझा मूड जरा खट्टू झाला होता त्यामुळे. दिवाळी खूप आवडती असल्याने आणि या वर्षी ती साजरी करायला घरी राहता येणार नसल्याने उगाचच कसंतरी वाटत होतं.
आमची दिवाळी खूप साधी असायची. मी आई आणि बाबा छान तयार व्हायचो. मी दारात रांगोळी काढायचे, बाबा लायटिंगच्या माळा नीट करण्यात गुंतलेले असायचे. आई आमचं औक्षण करायची. मग आईने केलेल्या मस्त फराळावर ताव मारायचो आम्ही. मी घरभर पणत्यांच्या ओळी लावायचे. त्यांच्या ज्योतींकडे पाहायला आवडायचं मला.
काहीबाही गेम्स वगैरे झाल्यावर दिवाळीच्या आधीचा दिवस ट्रॅडिशनल डे असेल असा मेल आला. त्याच खरंतर टेन्शनच आलं मला. एकतर मी आत्तापर्यंत साडी क्वचितच नेसली होती. आणि दुसरं म्हणजे साडी नेसून ऑफिसला यायचं म्हणजे बसने यावं लागणार होतं. सिक लिव्ह सांगावी का त्या दिवशी उठून, असा विचार करत होते मी. घरी गेल्यावर आईला सांगितलं तर आई खूप खुश झाली, म्हणाली अशी काही तू मनाने साडी नेसणार नाहीस, बरं झालं.
बघता बघता आलाही ट्रॅडिशनल डे. आईने मला तिनेच आणलेली साडी छान नेसवून दिली होती. मला बसमधून जायचं टेन्शन आलं होतं, तेव्हढ्यात शर्वरीचा फोन आला. ती म्हणाली मी तुला घ्यायला येतेय. मी नाही म्हटलं पण ती काही ऐकेना. शर्वरी आली आणि आम्ही तिच्या कारमधून निघालो. मला काय बोलावं सुचत नव्हतं. त्या दिवशीचा निनादचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता.
“मीरा, खूप छान दिसतेयस तू आज” शर्वरी म्हणाली.
“थँक्स” मी तुटकच बोलले.
“रागावलीयेस का माझ्यावर?” तिचा प्रश्न.
“नाही. मी रागावण्यासारखं काही केलंयस का तू?” मी पुन्हा बॉल तिच्या कोर्टमधे ढकलला. मला तिच्याकडूनच ऐकायचं होतं काय झालंय ते.
आणि त्यानंतर ती जे बोलली ते ऐकल्यावर मात्र मला ही मुलगी पूर्ण वेडी आहे यावर विश्वास बसला होता.
शर्वरीचं असं म्हणणं होतं कि निनाद तिला ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून आवडतो. आणि तिला हेही माहित आहे कि निनादलाही ती खूप आवडते. ती मोहीतला हो म्हणाली ते निनादने स्वतः येऊन सांगावं म्हणून. आणि हे सगळं मोहीतला माहिती होतं.
मी जे ऐकतेय ते खरंय ना? कि काहीतरी चुकीचं ऐकतेय मी?
“कसली ड्रामा क्वीन आहेस तू? हे असलं सगळं मी टीव्हीवरच्या मालिकांमध्येच बघितलंय. निनादला काय वाटलं असेल? त्याने कसा घालवला असेल हा वेळ?” मला राग, आश्चर्य, उत्साह सगळं एकत्रच वाटत होतं.
“मी निनादला आज सगळं सांगणार आहे. त्याला प्रपोज करणार आहे मी” तिने पुढचा बाउंसर टाकला.
काय? मी जवळजवळ ओरडलेच!
होय मीरा. मी आज निनादला प्रपोज करणार आहे आणि त्याला हे सगळं खरंही सांगणार आहे.
दिवसभर मला त्या दोघांनाही पुन्हा भेटता आलं नाही कारण लंच ब्रेक मध्ये मी पाहिलं तर दोघेही ऑफिसमध्ये नव्हतेच. रवीने त्याच्या बायकोने केलेले लाडू आणले होते. अप्रतिम होते चवीला. सगळ्या ऑफिसमध्ये लोक मस्त फिरत होते, एकमेकांशी बोलत, अघोषित सुट्टी असल्यासारखे. पण मला ज्याच्याशी बोलायचं होतं तो कुठे नव्हताच. अनिरूद्ध. सकाळी साडी नेसल्यापासून मला असं वाटत होतं कि त्यानं मला पहावं पण त्याचा कुठे पत्ताच नव्हता. त्याच्या डेस्ककडे उगाचच एक चक्कर मारली मी, मीटिंगमध्ये असतो तेंव्हा त्याची बॅग तरी डेस्कजवळ असायची, आज तीही नव्हती. म्हणजे हा ऑफिसला आलाच नाहीये का काय? बहुतेक उशिरा येणार असेल म्हणून मी वाट पाहायचं ठरवलं. जणू तो भेटला नाही तर माझी दिवाळी चांगलीच जाणार नव्हती.
शेवटी ऑफिस सुटलं. मी तरीही थांबले होते, मगाशी रवी आणि कुमार बोलताना मी ऐकलं होतं की अनिरूद्ध आलाय. पण तब्बल तासाभरानेही तो डेस्कवर आला नाही म्हटल्यावर मी निघायचं ठरवलं. सकाळी मला शर्वरीने सोडलं होतं पण आत्ता तिचाच कुठे पत्ता नव्हता त्यामुळे मला बसने जावं लागणार होतं. माझ्या डेस्कपासून ऑफिसच्या रिसेप्शनपर्यंत जायला एका कॉरिडॉरमधून जावं लागायचं. मी निघाले, साडी सावरत, घड्याळाकडे बघत आपल्याच विचारात चालत असताना अचानक मला तो दिसला. कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाहून तो चालत येत होता. नेव्ही ब्लू कुर्ता, मोतिया रंगाची सुरवार. मला काय करू असं झालं होतं. मला झालेला आनंद त्याला दिसू नये याची पराकाष्ठा करत मी जमिनीवर नजर खिळवली.
पर नजरे कहाॅं किसीकी सुनती हैं? डोळ्यांनी माझा घात केलाच! त्याच्याकडे पाहिलं तर तो थेट माझ्याकडे पाहत येत होता. मला माझ्या हृदयाचे ठोके जाणवत होते. तो आला आणि म्हणाला,
“हाय मीरा”
“हाय अनिरुद्ध. हाऊ आर यू?” मी शक्य तितका नॉर्मल आवाज ठेवत म्हणाले.
“घरी निघालीस?”
“हो. निघालेय.” आधी दिवसभर गायब व्हायचं आणि ऐनवेळी उगवून असं काहीतरी विचारायचं. जाऊदे! याला काही पडलेलंच नाहीये कोणी आपली वाट बघतंय याचं.
“चलो, बाय... हॅपी दिवाली” असं म्हणून मी निघणार इतक्यात तो म्हणाला,
“थांब. एक मिनिट. हॅपी दिवाली. हे तुझ्यासाठी” म्हणत त्याने एक गिफ्ट बॉक्स माझ्या समोर धरलं.
“मी? हे?!”
“अगं कंपनी गिफ्ट आहे. सगळ्या टीमला दिलं होतं, तुलाच द्यायचं राहील होतं.”
“ओह्ह! थँक यू” म्हणून मी ते बॉक्स घेतलं आणि निघणार एव्हढ्यात, त्याने हाताने माझा रस्ता अडवला. तो असं काही करेल असं माझ्या गावीही नव्हतं त्यामुळे मी गोंधळले होते.
“मीरा... एक विचारू? खरं सांगशील?” तो म्हणाला.
“काय?” मी.
“का?”
“काय का?”
“आॅफिस सुटून एक तास झालाय मीरा. का थांबलीस?” माझ्याकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी त्याचा हात बाजूला सारला आणि निघणार इतक्यात त्याच्या हाताची पकड माझ्या हातावर बसली. मी शहारले. मी हात सोडवून घ्यायचा फुका प्रयत्न केला. त्याने हसून माझा हात सोडला.
“खूप सुंदर दिसतेयस तू” तो म्हणाला आणि मी मागे न बघता तडक तिथून निघाले.
क्रमश:
या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maitrin.com/node/3254
तुझमे तेरा क्या है -२
https://www.maitrin.com/node/3257
तुझमे तेरा क्या है -३
https://www.maitrin.com/node/3289
तुझमे तेरा क्या है -४
https://www.maitrin.com/node/3306
तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maitrin.com/node/3318
तुझमे तेरा क्या है - ६
https://www.maitrin.com/node/3460
पुढे चालू
माझ्या दिवाळीची सुरुवात खूप मस्त झाली होती. आई बाबा आणि मी पहाटे उठलो. अभ्यंगस्नान आवरून आईने केलेला फराळ खाऊन मस्त गप्पा मारत बसलो होतो. मस्त वाटत होतं. कालचे साडीवरचे फोटोज शर्वरीने पाठवले होते. निनादने आमच्या तिघांचं ग्रुप चॅट सुरु केलं होतं. कालची इथ्यंभूत माहिती दोघांनी मिळून दिली होती मला. शेवटी माझे मित्र आणि मैत्रीण एकमेकांचे जिवलग झाले होते. त्यांना यथेच्छ चिडवून झाल्यावर मी फोन खाली ठेवला तर काही अनरिड मेसेजेस होते मोबाईलमध्ये. एक दोन ऑफिसच्या अजून कलिग्जचे, एकदोन नातेवाईकांचे. त्यांना रिप्लाइज केले आणि माझा हात त्या मेसेजवर थबकला. तो अनिरुद्धचा मेसेज होता. पहाटे आलेला.
मीरा,
दिवाळीच्या खूप शुभेच्छा. हि दिवाळी तुझ्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि सुख घेऊन येवो.
-अनिरुद्ध.
मी त्या मेसेजची अक्षरश: पारायण केली. त्याने मेसेज केलाय, इतक्या पहाटे? मेसेजची वेळ होती ४:००. तेंव्हा मी उठलेही नव्हते. बाबांनी मला उठवायला हाक मारली ४:३० ला. तेंव्हा उठल्यावर आज आपण सवयीप्रमाणे मेसेजेस का नाहीत बघितले याचा मला पश्चात्ताप झाला. आता दुपारचे १२ वाजत आले होते. आणि मी आता त्याला रिप्लाय केला तर त्याला काय वाटेल? काय मुलगी आहे ही? पण रिप्लाय न करणंही... त्याला काय वाटेल यापेक्षा मलाच कसंतरी वाटेल रिप्लाय नाही केला तर.
मी रिप्लाय लिहिला.
अनिरुद्ध, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हि दिवाळी तुला खूप आनंदाची जावो.
मीरा.
मग त्याला माझा मेसेज वाचून काय वाटलं असेल असा विचार करत बसले. संध्याकाळी आम्ही तिघे बाहेर जेवायला गेलो. मला आठवतंय तेंव्हापासून हा बाबांचा शिरस्ता होता. दिवाळीच्या पहिल्या दिवशी रात्री बाहेर जेवायला जायचं. ते म्हणायचे दिवाळीचे ईतके पदार्थ करून आई दमलेली असते, तिचीही हि दिवाळीच आहे ना, तिलाही अाराम नको का एखादा दिवस? तसाही बाबा फराळ करतानाही आणि एरव्हीही आईला घरकामात मदत करायचे. त्यांचं म्हणणं होत तुझं काम माझं काम असं काही नसतं घरात. हे घर आपलं आहे तसं कामही आपल्या सर्वांचं आहे. मला खूप आवडायचा बाबांचा हा विचार.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं अगदी जीवावर आलं होतं माझ्या. अगदी आवरल्यानंतर मी सरळ मेल केला अनिरुद्धला आणि सिक लिव्ह टाकली. आई आणि मी बाजारात जाऊन ताज्या भाज्या घेऊन आलो. मला आवडते म्हणून बाबा स्वतः कांदाभजी करणार होते. मी मस्त सोफ्यावर माझी आवडती शाल गुंडाळून बसले होते पुस्तक वाचत. आणि बेल वाजली. कोण आलं म्हणून मी दार उघडलं तर दारात निनाद. मी आनंदाने उडीच मारायची राहिले होते.
“तू? अाली का मैत्रिणीची आठवण? लडकी मिल गयी तो यार को भूल गये?” मी उगाच त्याला छेडलं.
“ए चल... पुरे हां नाटक. काका काकू मी आलोय” दारातूनच वर्दी देत निनाद आत आला.
“काय मग? काल कुठं होतात म्हणायचं पाव्हणं?” मी त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हते.
“अरे वा! भजीचा वास येतोय. क्या बात है? काकू मला पण भजी...” असं म्हणत तो आत स्वयंपाकघरात गेला. बाहेर आला तब्बल १० मिनिटांनी.
“ए बास हां आता. गप सांगणारेस का” मी पण वैतागले.
“अगं होहो! किती चिडशील” म्हणत त्याने कालचा सगळा वृत्तांत त्याच्या शैलीत पुन्हा सांगितला.
मी खूप खुश होते कारण निनाद खुश होता. शर्वरी आणि निनाद... क्या बात है! आम्ही दोघांनी मस्त कांदा भजींवर ताव मारला आणि निनाद पुन्हा ऑफिसला निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला आले. लॉगिन केल्या केल्या पहिली मीटिंग रिक्वेस्ट अाली. अनिरुद्धने मीटिंग सेट केली होती. मी मीटिंग रूममध्ये गेले तर तो आधीच तिथे होता. त्याच्या समोर जाताना मला उगाच अवघडल्यासारखं झालं होतं.
“हाय. गुड मॉर्निंग” मी म्हटलं.
“गुड मॉर्निंग मीरा. हाऊ आर यू? आॅल वेल?”
“आय आम फाईन. थॅंक्यू.” देवा! कालची सिक लिव्ह होती.
“मीरा वी गॉट द अकाउंट! आपण काम केलेल्या प्रोजेक्टच्या ऑनसाईट टीमचा मेल आलाय. काॅंग्रॅज्युलेशन्स टू यू अँड वेल डन फॉर युअर हार्ड वर्क. वी डिड इट!” तो खूप खुश होता.
त्याने त्याच्याच लॅपटॉपवर मेल मला दाखवला. त्यात ऑनसाईट टीमने आमच्या कामाचं खूप कौतुक केलं होतं. त्यांनी लिहिलं होत दिस इज द बेस्ट टीम वी एव्हर हॅड!
द बेस्ट टीम!
आम्ही दोघे!
मला कसं वाटत होतं ते सांगायला शब्द नव्हते. मी माझ्या कामात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं आणि हे त्याचे रिझल्टस होते. आय वाॅज सो हॅपी!
थोड्या वेळाने भागवत सरांचा मेल आला. टू मध्ये आम्ही दोघे होतो आणि सीसी मध्ये आमची पूर्ण प्रॅक्टिस. त्यांनी आमच्या दोघांच्या कामाचं खूप कौतुक केलं होतं. त्यांच्या मेलमधलं एक वाक्य माझ्या लक्षात राहिलं.
इट लुक्स लाईक अनिरुद्ध हॅव सक्सीडेड इन प्रीपेअरिंग हिज ओन सक्सेसर!
ते मला अनिरुद्धची सक्सेसर म्हणत होते.
निनाद आणि शर्वरी दुपारी कॅफेटेरिया मध्ये भेटले तेंव्हा दोघांनी त्यांना सांगितल्यावर एकच कल्ला केला. दिवस खूप मस्त गेला होता. त्या नंतरचा एक आठवडा अक्षरश: काहीच काम नव्हतं. मी सरळ कंपनी लायब्ररीत जाऊन बसायचे वाचत. कुठलाच प्रोजेक्ट नसणं खरंतर कंटाळवाणं वाटत होतं. मला जणू कामाची सवय झाली होती. निनाद म्हणालाही, त्या टीम मध्ये जाऊन त्या माणसांसारखीच व्हायला लागलीयेस.
अनिरुद्ध गेला आठवडा कुठे तरी गायब झाला होता. त्याने आऊट ऑफ ऑफिस ठेवला होता, आॅन लिव्ह म्हणून. पण का लिव्ह? तीही इतके दिवस? रवीला विचारावं का? मी एकदोनदा रवीच्या डेस्कपर्यंत जाता जाता स्वतःला थांबवलं. रवी त्याच्या अनुपस्थितीत प्रॅक्टिसचा कॉन्टॅक्ट पॉईंट होता. एक नवीन प्रोजेक्ट सुरु झाला होता आणि रवीने मेल केला होता कि मी तो लीड करेन आणि टीममध्ये अजून २ जण मला असिस्ट करतील. मी सातवे अास्मानपर होते. माझा प्रोजेक्ट. इथे मी लीड असणार होते. रवी आणि शेखर माझ्याबरोबर काम करणार होते. काम सुरु झालं आणि पुन्हा वर बघायलाही बरेच दिवस फुरसत मिळणार नाही असं दिसायला लागलं. मला रोजचा स्टेटस काॅल अटेंड करावा लागणार होता ऑफिस सुटल्यावर. कारण अर्थात बिईंग लीड, या टीमचा कॉन्टॅक्ट पाॅईंट मी असणार होते. काम बघता बघता एका आठवड्यातच पळायला लागलं. दिवसातला आमचा बराच वेळ मीटिंग रूममध्ये जायचा, कारण बरंच काम होतं जे डिस्कस न करता होऊ शकलं नसतं. शेखर घरी गेला तरी मी आणि रवी काम करत राहायचो. तब्बल १५ दिवसांनी अनिरुद्ध ऑफिसला आला. म्हणजे तो आलाय असं मला कळलं. त्यानंतरही २-३ दिवस तो मला भेटलाच नव्हता. त्या दिवशी स्टेटस कॉल झाल्यावर मी आणि रवी डेस्कवर परत आलो, सामान घेऊन घरी जायला, तर समोर तो.
“हाय अनिरुद्ध, अरे कुठायस तू?” रवीने पुढे जाऊन त्याला विचारलं.
“अरे... हाय... बाबा.. यु नो इट राईट? त्यांच्याबरोबरच गेलो होतो सुट्टीला” अनिरुद्ध म्हणाला.
म्हणजे हा त्याच्या बाबांबरोबर सुट्टीला गेला होता. ओह्ह.. पण त्यात मला सांगण्यासारखं काहीच नाही ना? जाऊदे! मी त्याने मला सांगावं अशी अपेक्षा का करतेय पण? मी नुसतीच स्माईल देऊन डेस्क आवरायला लागले.
“काय रे इतके बिझी झालेत सगळे हल्ली. मी ऑफिसला येऊन ३ दिवस झाले पण माणसं दिसायला मागत नाहीत” मी किंचित रागवूनच वर पाहिलं. तो बोलत रवीबरोबर असला तरी पहात माझ्याकडे होता.
दिसायला मागत नाहीत म्हणे. ह्याला वेळ आहे का समोरच्याशी बोलायला? नव्हे साधं सांगायला कि १५ दिवस येणार नाहीये! माझा राग दिसला असावा त्याला डोळ्यात.
मी सरळ बॅग उचलली आणि रवीला बाय म्हणून निघाले. निघताना त्याच्याकडे पाहिलं तर तो मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होता. मी लिफ्टपाशी आल्यावर माझा मोबाईल वाजला. अनिरुद्धचाच मेसेज होता.
“इस सादगी पे कौन ना मर जाये ऐ खुदा
लडते हैं और हाथमें तलवार भी नहीं...”
क्रमश:
या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maitrin.com/node/3254
तुझमे तेरा क्या है -२
https://www.maitrin.com/node/3257
तुझमे तेरा क्या है -३
https://www.maitrin.com/node/3289
तुझमे तेरा क्या है -४
https://www.maitrin.com/node/3306
तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maitrin.com/node/3318
तुझमे तेरा क्या है - ६
https://www.maitrin.com/node/3460
तुझमे तेरा क्या है - ७
https://www.maitrin.com/node/3522
पुढे चालू
हा प्रोजेक्ट खूप डिमांडिंग होता. दिवसभर काम करकरून थकून जायचे मी. दिलासा एकच कि रवी माझ्यासोबत होता, जरी प्रोजेक्ट मी लीड करत असले तरी बरेचदा मी त्याला प्रश्न विचारायचे, तोही कुठलाच आव न अाणता मदत करायचा. आणि एके दिवशी सकाळी तो मेल आला, आमच्या डिलीव्हर्ड कोडमध्ये काहीतरी चूक झाली होती त्यामुळे एन्ड आऊटपुट्स चुकत होती. यावेळचा ऑनसाईट कोओर्डीनेटर जरा गरम डोक्याचा माणूस होता, त्याने हे एवढं साधं कोडिंग कसं काय चुकू शकतं असं लिहून पाठवलं होतं. मी त्याला रिप्लाय लिहिला कि माझ्या टीमच्या वतीने मी माफी मागते आणि आम्ही हा कोड उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करेक्ट करून रिप्लेस करू.
बरंच काही चेंज करावं लागणार होतं. डिग अप करताना मला कळलं कि शेखरने केलेलं कोडिंग चुकलं होत आणि तो कोड नीट टेस्ट न करता त्याने डिप्लॉय केला होता, त्या कोडवर बाकीचे फंक्शन्स अवलंबून असल्यामुळे आमचीही आऊटपुट्स चुकत होती. शेखरच्या डेस्कवर जाऊन पाहिलं तर तो निघून गेला होता. मला वेळ घालावणं परवडणार नव्हतं. उद्याची डेट कमिट केली होती मी, त्यामुळे मीच त्या कोडवर काम सुरु केलं. कोड बराच मोठा होता आणि पुअरली कन्व्हर्टेड होता. मला सुरुवातीपासून सगळा कोड पुन्हा करावा लागणार होता. बहुतेक आजची रात्र यातच जाईल त्यामुळे मी घरी कळवून टाकलं कि मी ऑफिसमधेच थांबेन. आमच्या काही टीम्स रात्री काम करायच्या त्यामुळे एकटीच कशी थांबणार असा काही प्रश्न नव्हता. निनाद विचारून गेला कि मी तुझ्याबरोबर थांबतो पण मला उगाचच त्याला असं थांबू देणं योग्य वाटेना मग त्याला अरे बाबा मी राहीन नीट आणि तसच काही वाटलं तर तुला फोन करेन असं म्हटल्यावर गेला.
“यु प्रोटेक्टड युअर टीम. झालेल्या चुकीची जबाबदारी ॲज अ टीम लीड म्हणून घेतलीस, रिअली अॅप्रिशिएटेड. पण त्याचा अर्थ असं नाही कि ती चूक तूच दुरुस्त करावीस.” एकाच वेळेस कौतुक कसं करावं आणि कानपिचक्या कशा घ्याव्यात हे अनिरुद्धकडून शिकावं.
“पण मी उद्याची डेट कमिट केलीये” मी कोडवरून लक्ष हटवत म्हटलं. आणि तो हसला.
“हे बघ मीरा. रवी आणि शेखरला फोन कर, त्यांना सांग काय झालंय ते, असाईन टास्क्स टू देम अँड रिमेम्बर टू असाईन युअरसेल्फ लेस टास्क्स. आफ्टरऑल कोऑर्डिनेशन हेच सर्वात मोठं टास्क आहे. कोड कंन्व्हर्ट झाला कि रिगरस टेस्टिंग करायला सांग आणि एकदा तूही रिव्ह्यू करून घे अँड देन सेंड इट” त्याच्याकडे सगळ्याच प्रश्नच कसं काय परफेक्ट उत्तर असायचं काय माहित. आमच्या टीमला घडवण्यात खरंच त्याचा खूप महत्वाचा हात होता. हा आणि असे अनेक धडे त्याने आम्हाला सर्वांना सहज बोलता बोलता दिले होते. मी टास्क्स असाईन केले आणि काम सुरु केलं. रवी, मी आणि शेखर काम करता करता एकमेकांना ऑफिस मेससेंजरवर अपडेट्स देत होतो. अल्मोस्ट रात्री एकला माझं घड्याळाकडे लक्ष गेलं. कामाच्या नादात जेवायचं लक्षातच राहिलं नव्हतं. मी कधीच इतक्या रात्रीपर्यंत थांबले नव्हते ऑफिसमध्ये, त्यामुळे आता काय करायचं अशी माझी अवस्था झाली होती. कॅफेटेरियात गेले तर आमचे डिबीएज जमले होते रात्रीच्या कॉफीला. त्यांच्यातल्या कोणाशी माझी ओळख नव्हती. ते निघून गेल्यावर मी मशिनची कॉफी घेतली आणि विंडो टेबल पकडून बसले.
“सँडविच?” अनिरुद्ध आला होता.
“सँडविच? डबा?” मी त्याला डबा घेऊन येतोस कि काय अशा स्वरात विचारलं. ती खोच अर्थातच त्याच्या नजरेतून सुटली नाही.
“हो. डबा घेऊन येतो मी. रोजच. कारण लवकर घरी जाणं होणार नसेल तर काहीतरी खायला हवं ना सोबत?”
मी अक्षरश: तुटून पडले त्या सँडविच वर. एकतर प्रचंड भूक लागली होती आणि ते सँडविच खूप टेस्टी होतं. रेड पेपर्स, कॉर्न, कॅरट्स आणि
ग्रिल्ड चीज.
“देवा!” नकळत माझ्या तोंडून उद्गार गेला.
“काय गं? देवाला बोलावतेयस? इतकं वाईट बनवलंय का मी सँडविच?” त्याने विचारलं.
“अम्म... नाही. उलट अप्रतिम झालंय. थॅंक्यू” तोंडात घास असतानाच मी म्हटलं.
“ओके ओके. खा मग” तो म्हणाला. त्याच्या डब्यातली तिन्ही सँडविचेस संपल्यावर मग माझ्या लक्षात आलं कि आपण त्याला काहीच ठेवलं नाहीये. मीरा! कशी तू अशी? इतकी बुद्धू? इतकी बावळट! काय म्हणाला असेल तो? कसली खादाड मुलगी आहे ही. आता? मी ओशाळले.
“आय ॲम सॉरी अनिरुद्ध. मी... तुला काहीच शिल्लक ठेवलं नाही”
“पोट भरलं माझं” तो माझ्याकडे बघत हसून म्हणाला. “चलो, बॅक टू वर्क.”
“घरी नाही जाणार का?” मी विचारलं. आजकाल त्याला तुम्ही म्हणावं कि तू याचा मला नेहमीच प्रश्न पडायचा. त्याचा कामातला अनुभव, त्याची लोकांना हाताळायची पद्दत, त्याचं नॉलेज या सगळ्यांमुळे त्याला तुम्ही म्हणावं कि त्याच्याबद्दल वाटणाऱ्या त्या अनामिक ओढीने तू म्हणावं हेच कळायचं नाही. पहिल्या भेटीतच त्याने माझं मन मोहून घेतलं होतं पण त्याच रूपांतर त्याच्याबद्दल वाटणाऱ्या ओढीत कधी आणि कसं झालं काही कळलंच नाही. मला त्याच्याविषयी जे वाटतं ती फक्त मैत्री निश्चितच नव्हती. मैत्रीहूनही जास्त आणि खास काहीतरी वाटत होतं मला त्याच्याबद्दल. ऑफिसला आल्यावर पहिल्यांदा माझी नजर त्याला शोधायची. तो नाही दिसला कि जणू माझा दिवसच नीट सुरु व्हायचा नाही. मी केलेल्या कामाला त्याने अॅप्रिशिएट केलं कि मला स्वतःचा अभिमान वाटायचा. असं वाटायचं कि आमच्या प्रॅक्टिसचं सगळं काम मीच करावं. त्यालाही माझ्याबद्दल मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळं वाटतंय हे मला कळत होतं. त्याच्या डोळ्यातून जाणवायचं ते कधी कधी. पण त्याच्या नजरेला नजर भिडवताना माझाच श्वास अडकायचा त्यामुळे तो समोर असला की मीच नजर चुकवायचे.
मला आमच्या प्रॅक्टिसची सवय लागायला लागली होती. मी वर्कोहोलिक बनत चालले होते. निनाद आणि शर्वरीचं मस्त चाललं होतं. दोघे एकत्र ऑफिसला यायचे. शर्वरी माझ्याकडे येते म्हणून घरून लवकर निघायची आणि निनाद आणि ती एकत्र यायची. माझं आजकाल त्यांच्याशी फार बोलणं व्हायचं नाही.
आणि तो दिवस उजाडला. आम्ही ऑफिस जॉईन करून अाॅलमोस्ट दीड वर्ष होऊन गेलं होतं. सगळे जण आपापल्या कामात स्थिरावले होते. या दीड वर्षात मी आमच्या प्रॅक्टिसचे तीन प्रोजेक्ट्स लीड केले होते. लीडरशिपमधले अनेक बारकावे अनिरुद्धनेच मला शिकवले होते. बेस्ट टीम तर आम्ही होतोच पण आता बऱ्याचदा आम्हाला काम करताना एकमेकांना सांगावंही लागायचं नाही. हे कर ते कर असं. काम असेल आणि आम्ही दोघे ते करत असलो कि अगदी दिलसे फाईन ट्युनिंग असल्यासारखं ते पूर्ण व्हायचं. मला प्रमोशन मिळणार अशी कुणकुण होती. काम करणं माझ्यासाठी आनंदाचा भाग होताच पण त्याही पलीकडे ते अनिरुद्ध बरोबर होतं त्यामुळे मी जास्त आनंदी होते. मला जे काही येत होतं ते त्यानेच मला शिकवलेलं होतं.
त्याच्या आणि रवीच्या अबसेन्समध्ये एकदोनदा मी प्रॅक्टिसच काम सांभाळलं होतं.
एके दिवशी नेहमीचं काम करताना मला अचानक भागवत सरांचा मेल आला. त्यांनी अर्जंट मीटिंग ठेवली होती. मला काही कळेनाच कि माझं काही चुकलंय का? अचानक मीटिंग कशी काय?
मी मीटिंगला गेले नि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून उडालेच. आमच्या एका सक्सेसफुल प्रोजेक्टनंतर आम्हाला एक मोठं स्विस अकाउंट मिळणार होतं. त्याच्या प्रायमरी मिटींग्स आणि सेटअपसाठी मला स्वित्झर्लंडला लुझानला जावं लागेल असं भागवत सरांनी सांगितलं. मी हवेत होते! स्वित्झर्लंड?! ते पुढे काय म्हणाले ते माझ्या डोक्यात शिरलंच नाही. माझी पहिली परदेशवारी! आणि तीही स्वित्झर्लंडला! योहो!!!!
मी निनाद आणि शर्वरीला सांगितलं तर दोघेही पार्टी पार्टी म्हणून दंगा करायला लागले.
मग तिघे मिळून ऑफिस सुटल्यावर ऑफिसजवळच जेवायला गेलो.
तिथे गेलो तर दोघेही गप्प. उगाच मी बोलू तू बोल चाललं होत दोघांचं.
“काय चाललंय?” मी जरा वैतागूनच विचारलं. “मगाशी मारे पार्टी पार्टी करून नाचला आणि आता का गप्प बसलाय?”
“काही नाही गं” निनादने बाजू सावरायचा प्रयत्न केला.
“निनाद, क्या छुपा रहे तुम? खरं बोल... शर्वरी...” काहीतरी आहे जे हे दोघे मला संगत नाहीयेत एव्हढं मी ताडलं होतं.
एव्हढ्यात शर्वरीने तिचा हात पुढे केला. मी खुर्चीतून पडायचेच राहिले होते. तिच्या हातात अंगठी होती.
“ओ माय गॉड! म्हणजे तू? म्हणजे तुम्ही?”
“येस माय डिअर फ्रेंड! मी लग्नाची मागणी घातली शर्वरीला काल.” निनाद हसत म्हणाला.
“आणि मी हो म्हटलं” शर्वरी तर आनंदाने वेडीच झाली होती.
आणि मी? माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्या दोघांना एकत्र घट्ट मिठी मारली.
“ब्लेस यू मेरे प्रेम के पंछीज” त्यानंतर मस्त जेवण झालं.
पुढचे दोन महिने विसा, तिकीट्स आणि बुकिंग्स मध्ये निघून गेले.
पुढच्या आठवड्यात मला निघायचं होतं.
“काय गं? तुझ्या बरोबर कोणी येणार नाही का?” निनादची नेहमीचीच काळजी.
“वत्सा... हि शाळेची ट्रिप नाही रे मित्रमैत्रिणींबरोबर जायला. आणि असंही मी आता काय लहान नाहीये. जाऊ शकते मी एकटी.”
“बरं. मला वाटलं तुझा बॉस येणार असेल” निनाद का काय माहित अनिरुद्धचं नाव घ्यायचा नाही. माझ्याशी बोलताना तो तुझा बॉस असाच म्हणायचा.
“त्याला नाव आहे निनाद.” माझा नेहमीसारखाच असफल प्रयत्न.
“हम्म. तो येणार नाही का?”
“नाही.”
आमचं बोलणं तिथेच थांबलं.
मी काहीतरी काम करत असताना अनिरुद्धचा मेल आला माझ्या फ्लाईट डिटेल्स मागायला. मी डिटेल्स सेंड केल्या.
थोड्या वेळाने त्याचा पुन्हा मेल आला, त्याने सेम फ्लाईटची टिकेट्स बुक केली होती. तो लुझानला येणार होता.
क्रमश