वेडींग ड्रेस (कथा)

लेख: 

वेडींग ड्रेस -1

क्रिस, फोनवर अर्जंट ये म्हणालीस, वेडिंग प्रिप्रेशन मध्ये काही प्रॉब्लेम? टेल मी, विल डु एव्हरीथिंग यु निड" जेसीका सोफ्यावर बसत काळजीच्या स्वरात म्हणाली
" रिलॅक्स जे." क्रिस्टन किचन मधून कॉफीचे मग घेऊन हसत हसत बाहेर आली "सगळं काही ठरवल्याप्रमाणे अलमोस्ट झालंय. मी आणि डॅनियल ने हॉल बुक केला आहे, इंविटेशन्स अलरेडी पाठवून झाले आहेत, फुलांची अरेंजमेंट फिक्स झाली आहे, केक ची ऑर्डर देऊन झाली आहे, केटरर, मेन्यू फिक्स झालं आहे. पण हो, आता फक्त माझा वेडिंग ड्रेस तेवढा घ्यायचा बाकी आहे. ते काम मी तर आधीच तुझ्यावर सोपावलंय सो ती तुझी जबाबदारी आहे. आठवतंय ना तुला. अदरवाईज आय अँम डन.." क्रिस्टन एका दमात बोलली.
" धिस वॉज योर अर्जन्सी?? जीजस, आणि काही दिवसांपूर्वी तू हे मला म्हणाली होतीस, बट आर यु सिरीयस?? आय मिन वेडी आहेस का तू? अगं लहानपणापासून स्वतःच्या वेडिंग ड्रेस बद्दल प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं आणि तू खुशाल दुसऱ्याला निवडायला सांगतेस??!!" जेसीका जवळजवळ ओरडत आणि स्वतःचे काळेभोर टपोरे डोळे अजून मोठे करत म्हणाली
"जे, जे, होल्ड ऑन अँड टेक अ डीप ब्रेथ. शॉपिंग वगैरे मध्ये मी खूप बोअर होते, तुला माहितीये ना? वेडींग ड्रेस मध्ये काय वेगळं असतं? एक व्हाईट गाऊन आणि वेल. दॅटस् ऑल. त्यात वेडिंग ड्रेस शॉप्स, तिथल्या त्या नाटकी बायका, यात हे चांगलं तर त्यात ते, पुन्हा प्राईस च्या भानगडी. ओहह गॉड. आणि मला ना या वेडिंग प्लॅन्स मधून जरा ब्रेक हवाय. सो डु मी अ फेवर आज दुकानात जा आणि माझ्यासाठी एक सुंदर, एलीगंट पण जास्त महागडा नसणारा ड्रेस घेऊन टाक. आय ट्रस्ट यु. अँड डोन्ट फरगेट, यु आर माय मेड ऑफ ऑनर, मला लागेल ती मदत तू केलीच पाहीजे" क्रिस्टन जेसीकाचा गालगुच्चा घेत म्हणाली.
" रियली, तुझ्या इतकी विचित्र मुलगी मी पाहीली नाही. मग घेतीयेस तरी कशाला? तुझ्याकडे एव्हनिंग गाऊन असतील, त्यावरच करून टाक लग्न" जेसीकाने कॉफीचा सिप घेतला.
" हा हा, तुला विश्वास बसणार नाही पण माझी खरंच ती ही तयारी आहे. पण डॅनियल म्हणतोय त्याला मला वेडिंग गाऊन मध्ये पहायचंय. फक्त त्याच्यासाठी म्हणून घ्यायला तयार झाले"
"डॅनियल ला माहीत आहे का हे? मला आणायला सांगीतलंएस ते?"
" ऑफ कोर्स ही नोज आणि ही इज अबसोल्युटली फाईन विथ इट" क्रिस्टन दोघींचे मग घेऊन किचन मध्ये जात म्हणाली.
"हह.. एनिवेज, ओके, आज माझी एक दोन कामं आहेत. संध्याकाळ पर्यंत मी कॅरीज मध्ये जाते आणि गरज पडली की तुला कॉल करते." जेसीका तिची ब्लु स्लिंग बॅग उचलत उठून निघाली.
"हे काय निघालीस? ओके तुझं उरकल्यावर आज इथेच राहायला ये ना. संडे एन्जॉय करू, गॉसिप्स, मुव्ही. जस्ट यु अँड मी.. गर्ल्स डे."
"मिस विल्सन, आज मिस्टर जोन्स बिझी आहेत वाटतं. खूप प्रेम उतू जातंय मैत्रिणीवरचं" जेसीका एकच भुवई उंचावत म्हणाली.
"शट अप. फर्स्ट ऑफ ऑल, आय हॅव अल्वेज लव्हड यु मोर दॅन डॅन बिकोज यु केम फर्स्ट इंटू माय लाईफ. सेकंड,.." क्रिस्टन आता स्वतःचा आवेश कमी करत, डोळे बारीक करत हळूच म्हणाली"डॅन दोन दिवस शहराबाहेर आहे."
"ओह दॅट्स व्हाय. लेट्स सी. माझी कामं आणि तुझा ड्रेस मी 7 पर्यंत संपवते. डिनर सोबत करू आणि मुव्ही. रात्री इथेच राहते. "
" सी, दॅटस् व्हाय आय लव्ह यु मोर"
" चल, आता मी निघते. बाय"
जेसीका क्रिस्टन ची जुनी मैत्रीण. क्रिस्टन पुस्तकी किडा, शांत, मितभाषी तर जेसीका प्रचंड बडबडी आणि कायम उत्साही. मूळची आफ्रिकन अमेरिकन असलेली जेसीका वडिलांमुळे इंग्लड मध्ये स्थायिक झाली. जेसीका आर्टिस्ट होती. व्यक्तिचित्रण तिची खासियत होती. क्रिस्टन पक्की ब्रिटिश. नाजूक लंबगोल चेहरा, सडपातळ बांधा, मध्यम उंची, सरळ पण चाफेकळी नाक, ब्लॉन्ड, मध्यम लांब केस. जेसीका सगळ्याच बाबतीत क्रिस्टन च्या विरुद्ध. पण दोघींचं एमकेकींशी छान जमायचं. जेसीकाची सतत उत्साही सोबत तिला आवडायची.
जेसीका गेल्यानंतर क्रिस्टन ला घर अगदी खायला उठलं. हे घरही तिच्या आजोबांचं. दोन बेडरूम, वर स्टोअर रूम, दारात काही फुलझाडं लावता येतील एवढी जागा. घर तसं छोटंसं होतं, तरी एखादं त्रिकोनी कुटुंब राहू शकेल एवढं. क्रिस्टन ची आई एकल पालक होती. वीसेक वर्षांची असताना तिच्याहुन 4 -5 वर्षांनी मोठ्या मुलाच्या प्रेमात पडली. मुलगा त्याचा interest संपल्यावर जो निघून गेला तो कधी परत आलाच नाही. तोपर्यंत तिच्या गर्भात क्रिस्टन आकारास येऊ लागली होती. तिने क्रिस्टन ला जन्म देण्याचा निर्णय घेतला. आज क्रिस्टन जिथे राहतेय तिथेच ती राहीली, नोकरी , लोकांचे तर्हेतर्हेचे जजमेंट्स ऐकत तिने क्रिस्टन ला वाढवले. पण तिची मानसिक स्थिती कधीच पूर्ण सुधारली नाही. प्रेमात झालेला दगाफटका तिच्या जिव्हारी लागला होता. क्रिस्टन आठ वर्षांची असताना तिच्या आईने नैराश्य येऊन आत्महत्या केली. लहान क्रिस्टन ला आजी आजोबांनी आपल्या पंखाखाली घेतले, वाढवले, शिकवले, तिच्या पायावर उभे केले. क्रिस्टन कॉलेज मध्ये गेली तशी तिने मॉल मध्ये पार्ट टाइम नोकरी धरली. पुढे आजी आजोबांना आता तरी मोकळीक मिळावी म्हणून ती या घरात रहायला आली.

जेसीका गेल्यावर तिने थोड्यावेळ टीव्ही वर चॅनल बदलून पाहिले, आधी कधीतरी सुरू केलेली कादंबरी पुढे वाचण्याचा प्रयत्न केला, जेसीकाने आणून ठेवलेले दोन तीन ब्राइड्स स्पेशल मॅगझीन चाळण्याचा प्रयत्न केला. पण आज तिचं कशातच लक्ष लागेना. वास्तविक तिला एकटं राहण्याची सवय होती. रादर तिला एकटं रहायला आवडत असे. तरीही आज तिला घर अचानक भकास वाटू लागलं. कदाचित इतके दिवस मी कामात खूप व्यस्त आहे आणि आज एकदम मोकळी म्हणून जरा विचित्र वाटत असेल. " असा विचार तिच्या मनात आला.
तिने डॅनियल ला कॉल करायचे ठरवले.

डॅनियल आर्किटेक्ट आणि क्रिस्टन इतिहासाची प्राध्यापिका. तिच्या कॉलेज मध्ये एकदा इतिहास विभागाकडून डॅनियल ला हिस्टोरीकल स्ट्रक्चर्स वर बोलण्यासाठी गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं. उंचापुरा, शिडशिडीत पण योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात मसल्स असलेला, युरोपियन वारसा सांगणारं लांब, सरळ नाक, दाट, अगदी हलके ब्राऊन आणि जेल लावून वन साईड पार्टिशन करून बसवलेले केस, केसांच्या रंगाशी बऱ्यापैकी मॅच होणारे डोळे, लहान पण भेदक. त्या दिवशी तो आकाशी रंगाच्या व्ही नेक टी शर्टवर काळं ब्लेझर आणि तशीच काळी ट्राउझर घालून आला होता. जवळजवळ 50 मिनिटे त्याने इंग्लंड मधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण रचना खूप तांत्रिक गोष्टीत न शिरता, विद्यार्थ्यांना कळेल अशा भाषेत समजावून सांगितल्या. सांगताना त्या त्या शैलीचा , जागेचा थोडक्यात इतिहास तो सांगत होता. त्यावरून क्रिस्टन ने तो इतिहासाचाही अभ्यासक असावा असे ताडले. बहुतांश विद्यार्थी मन लावून ऐकताहेत की त्याला बघताहेत, काही कळायला मार्ग नव्हता असा विचार येऊन क्रिस्टन ला मजा वाटली.
लेक्चर नंतर विभागाच्या प्रोफेसर्स कडून त्याला लंच साठीचे आमंत्रण होते. जेवताना क्रिस्टन आणि तो नेमके शेजारी शेजारी आले.
"लेक्चर फार छान झालं, मी खूप एन्जॉय केलं" क्रिस्टन ने औपचारिकता दाखवली.
"थँक यु. मी तेवढं एन्जॉय केलं नाही"
" का ?"
" पूर्ण वेळ एखाद्या मुलाला डुलकी येत नाहीये ना या बाबतीत मी जास्त concerned होतो."
क्रिस्टन हसल्यानंतर तिचे ब्लॉन्ड केस अधिक चमकदार आहेत की तिची शुभ्र दंतपंक्ती यावर त्याचा निर्णय होईना. आपण कॉलेज च्या इतर स्टाफ बरोबर आहोत याचं भान राखत ती पुन्हा स्थिर झाली
" सॉरी. बट रियली, आय कॅन टोटली रिलेट."
"यु मस्ट बी हिस्ट्री प्रोफेसर"
"येस, मला वाटतं त्यामुळेच मी आज इथे बसून मी लंच करतेय. नाहीतर कुठेतरी जाऊन डुलक्या घेत असते.
डॅनियल मनमोकळा हसला.
" आय अँम जस्ट किडींग. जास्तीत जास्त मुलं मन लावून ऐकताना दिसले. कमीतकमी टेक साईड आणि भरपूर उदाहरणं मुलांना आवडतात. यु नो टिचिंग टॅक्टिस्. "
"थँक्स, मला शिकवायला आवडतं"
"आणि एवढं सगळं करून बोअर झालंच असेल तरी त्यांनी डोळे नक्कीच मिटले नसावेत याची तरी मी खात्री देऊ शकते." क्रिस्टन काट्याने तिच्या डिश मधून एक बाईट उचलत म्हणाली.
तिच्या बोलण्यातला गर्भितार्थ त्याच्या लक्षात आला. तो फक्त हसला.
मघाशी स्टेजवर कॉन्फिडन्टली, फर्म आवाजात लेक्चर देणारा आणि एरव्ही मितभाषी, चारचौघात कॅज्युअली बोलताना काहीसा अकवर्ड असे डॅनियल चे टोकाचे विरुद्ध आणि टिपिकल नर्डी गुण तिला आवडले. क्रिस्टन चा अंदाज खरा ठरला. त्यालाही इतिहासाची आवड होती. दोघांमध्ये मैत्री होण्यास एवढं कारण पुरेसं होतं. तो त्यावेळी जास्त शहराबाहेर असल्याने त्यांचं फोनवर संभाषण अधिक होत. दोघे स्थिर बुद्धीचे. अवघ्या सहा महिन्यात क्रिस्टन ने इनफ इज इनफ म्हणत स्वतःहून डॅनियल ला "डु यु हॅव फिलिंग्ज फॉर मी" विचारत त्याच्यावर बॉम्ब टाकला. डॅनियल ने आढेवेढे घेण्याचा विषयच नव्हता. एक दोन महिन्यांनी दोघांनी लग्न करायचे ठरवले.

क्रिस्टन ने स्पीड डायल प्रेस केलं, रिंग वाजली. तिसऱ्या रिंग ला डॅनियल ने रिसिव्ह केला.
"हेय क्रिस" डॅनीयल चा खर्जातला, शांत , गंभीर पण गोड आवाज ऐकून तिला खूप बरं वाटलं.
जास्त काळ फोनवरूनच बोलण्यामुळे क्रिस्टन दिसण्यापेक्षा त्याच्या आवाजाच्या जास्त प्रेमात होती. तो आवाज ती तासनतास ऐकु शकत होती.
"हॅलो क्रिस, यु देअर"? क्रिस्टन भानावर आली.
"अअम्.. येस डॅन, सॉरी, बिझी आहेस?"
"येस,. 10 मिनिटात मिटिंग आहे. नव्या साईटच्या डिझाइन बाबत क्लाएंट बरोबर डिस्कस करणार आहोत. सगळं ठीक आहे ना? आवाज जरा खोल का वाटतोय?"
" येस एव्हरीथिंग इज ऑल राईट. मला जरा बोअर होतंय इतकंच."
"ओह, सॉरी क्रिस, आता मी जास्त वेळ बोलू शकणार नाही, पण मिटिंग आटोपली की लगेच कॉल करतो. आर यु शोर यु ओके?"
"येस आय अँम, डोन्ट वरी. यु कॅरी ऑन. तुला जमेल तेव्हा कर. नो प्रॉब्लेम"
" ओके, देन. आय रियली हॅव टू गो, विल कॉल यु. बाय, टेक केअर"
"यु टू, बाय"

हा पण बिझी आहे .. हम्म. क्रिस्टन ने उसासा टाकला. दुपारचा 1 वाजला होता. मार्च महिना असल्याने वसंताची नुकतीच सुरुवात होती. कधी नव्हे ते सूर्याने दर्शन दिले होते त्यामुळे बाहेर स्वच्छ उजेड पडला होता. वातावरण मोकळं, तजेलदार होतं. तरीही आज एकाएकी एवढं अस्वस्थ वाटण्याचं काय कारण असावं हेच तिला कळेना. खरंतर ती जेसीकाला ड्रेस बद्दल फोनवरच सांगू शकली असती. पण तिला आज सोबतीची गरज होती.जेसीका आल्यावर तिचा मुड बदलेल म्हणून तिने तिला काही न सांगता बोलवून घेतले. पण तिलाही वेळ नव्हता. एरव्ही तीही सगळ्या वर्किंग सोल्स सारखी आतुरतेने रविवारची वाट पहात असे. त्या एका दिवसात डॅनियल, ग्रँडमा- ग्रँडपा, जेसीका, नोट्स या सगळ्यातुन स्लिप, रिडींग, मुव्हीज आणि मी टाइम यांसाठी वेळ काढता काढता तिच्या नाकी नऊ येत. आज नशिबाने काहीही न करता तिला तो वेळ मिळाला तरीही ती त्याचा आनंद घेऊ शकत नव्हती.
क्रमशः...

लेख: 

वेडींग ड्रेस - 2

"कदाचित एवढे दिवस या वेडिंग प्लॅनिंगच्या जास्तीच्या भारामुळे मुळे मी थकलेय. मला आरामाची गरज आहे" या विचारावर शिक्कामोर्तब करत क्रिस्टन तिच्या बेडरूम मध्ये गेली. मोबाईल सायलेंट करणार तेवढ्यात आठवलं डॅनियल किंवा जेसीकाचा कॉल येऊ शकतो, म्हणून तो विचार तिने डाववला. कानात इयरफोन्स अडकवले. प्लेलिस्ट शफल केली, खिडकीचे दार आणि पडदे ओढत खोलीत अंधार केला, केसांची पोनी सैल केली आणि तिच्या मऊसूत बेडवर आडवी झाली.
अगदी पाच मिनिटात गाण्यांनी तिच्या मेंदूशी सूर जुळवले आणि तिचा डोळा लागला.
..........

दुतर्फा दाट हिरव्यागार झाडीतून जाणारा अरुंद, काही ठिकाणी सपाट, काही ठिकाणी खाचखळगे असणारा रस्ता.... लाकडी गेट आणि मेलबॉक्स ...आत शिरल्यावर, छोटासा पण टुमदार बंगला.... प्रशस्त हॉल.. त्याच्या मुख्य दारातून प्रवेश करताच समोरच्या भिंतीवर फुलीच्या आकारात अडकवलेल्या तलवारी... जवळच तशीच अडकवलेली एक रायफल.. डावीकडच्या भिंतीवर काळविटाचे प्रिसर्व्ह केलेले भेसूर डोळ्यांचे मुंडके... उजवीकडे स्टडी रूम मध्ये घेऊन जाणारे दार, रूम मध्ये प्रवेश करताच समोरच्या भिंतीत छताला लागणारे काचेचे कपाट, त्यात ठेवलेली जाडजूड पुस्तके....कपाटापासून थोडेसे अंतर सोडून मांडलेला भला मोठा आयताकृती टेबल, त्यावर एक मोठासा, पिवळट ,जूनकट, नकाशा.... टेबल च्या एका बाजूला अंगात लाल सोनेरी युनिफॉर्म घातलेला, कम्बरेला पट्टा आणि पिस्टल होल्डर, त्यातून डोकावणारी पिस्तूलाची मूठ...गोरापान, सोनेरी-पांढरे केस, करड्या डोळ्यात जरब, ओठांवर केसांच्या कल्ल्याना जाऊन मिळणाऱ्या भरघोस सोनेरी मिशा, साधारण पन्नाशीच्या आसपास असणारा पण अंगकाठीने मजबूत मनुष्य ..नकाशाकडे निर्देश करत कुठलेसे नियोजन करणारा, टेबलाच्या इतर बाजुंना त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकताना त्याच रंगातले गणवेषधारी....
.पुन्हा स्टडी च्या बाहेर... तोच प्रशस्त हॉल .. डावीकडे एका कोपऱ्यातून वर जाणाऱ्या नागमोडी पायऱ्या, मध्यम आकाराची बेडरूम.. डाव्या बाजूला भिंतीला लागून लाकडी, सुंदर कोरीवकाम केलेला ड्रेसिंग टेबल.. मध्यभागी हलके निळसर, रेशमी बेडशीट अंथरलेला बेड.. जांभळ्या रंगाच्या तशाच रेशमी अभ्र पांघरलेल्या गुबगुबीत उशा.....
बेड वर बसलेली, उंची आणि तलम रेशमाचा गर्द हिरव्या रंगाचा आणि जांभळ्या फुलांचे नाजूक भरतकाम असलेला ड्रेस घातलेली, हातात पांढरे पीस लावलेले बोरू घेऊन कागदावर काहीतरी लिहीत बसलेली आणि लिहिता लिहिता मध्ये मध्ये काहीतरी आठवण्यासाठी मान वर करून बघणारी मुलगी... चेहऱ्यावर हलकेसे गोड हसू, समोरच्या उघड्या खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक तिच्या लांबसडक, मोकळ्या, रेशमी, सोनेरी केसांवर लाटा निर्माण करतेय.. लिहिण्यात मग्न...
तेवढ्यात कसलीशी चाहूल लागल्यासारखी ती आता मान सरळ करून डावीकडे बघतेय, हसू एकदम मावळलेलं, चेहरा गंभीर.. तिचे डोळे सुंदर आहेत की भीतीदायक.. निळसर, पण थंड, बर्फासारखे, अतिथंडाव्यामुळे चटका लावणारे, बधिर करणारे!!
क्रिस्टन चे डोळे खाडकन उघडले तेव्हा ती घामाने चिंब झाली होती, हृदयाची धडधड कानांना स्पष्ट ऐकू येत होती. काही क्षण तिला स्वतःची रुम ही ओळखु येईना. घड्याळ पाहते तर झोपून केवळ अर्धा तास झाला होता. काय होते ते .. ते घर, ती मुलगी... कोण होती? क्रिस्टन चे डोके प्रचंड जड झाले..

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस-3

क्रिस्टन ने मोबाईल चेक केला. डॅनियल चा मेसेज येऊन पडला होता. " सॉरी, टू बिझी.. विल कॉल यु वन्स आय गेट अ चान्स" नेहमीप्रमाणे डॅनियल चे शब्द वाचून तिचा मूड बदलला आणि ती प्लेफुल मोड मध्ये गेली.
स्वप्नाचे विचार बाजूला सारत तिने मेसेज केला. "नो प्रॉब्लम, वॉज हॅविंग नॅप. विल वेट फॉर इट. बाय द वे मे बी आय विल गेट माय वेडींग ड्रेस बाय इव्हनिंग :)
डॅनियल चा तात्काळ रिप्लाय "आर यु गोइंग फॉर शॉपिंग टूडे?? "
"नो, जे इज डुईंग मी फेव्हर, थँक गॉड.."
" विल यु सेंड मी अ पिक्चर?"
"नो, इट्स अंगेंस्ट ट्रेडिशन यु नो, ग्रुम इज नॉट सपोस्ड तू सी द ड्रेस बीफोर वेडींग .. अँड आय थॉट यु आर बिझी!!!"
"आय अँम इन अ प्रेझेन्टेशन, इट्स टू बोरिंग... सीन्स वेन यु आर धिस ट्रॅडिशनल :0 ?"
" सीन्स अल्वेज. व्हॉट एल्स यु डोन्ट नो अबाउट द पर्सन यु आर गोइंग टू मॅरी इन टू वीक्स :/? "
" वेल, मेनी थिंग्ज.. फ्रॉम व्हेअर यु वॉन्ट मी टू स्टार्ट ;)"
" लेट मी थिंक, व्हॉट अबाउट पेयींग अटेंशन टू मिटिंग टू स्टार्ट विथ : D"
"हाऊ कॅन आय नाऊ? Wink . वेल, यु स्टॉप टेक्सटिंग फर्स्ट. विल कॉल यु लेटर. बाय नाऊ.. :D
" Stopped टेक्सटिंग.. बाय :D " क्रिस्टीन ने स्वतःशीच खिदळत शेवटचा मेसेज केला. डॅनियल शी बोलून तिला बरंच मोकळं वाटलं. स्थिर डोक्याने ती तिला पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्दल विचार करू लागली. खरंच ते स्वप्न होतं? सगळी दृश्य, सगळ्या घटना अगदी समोर घडून गेल्या असं तिला वाटून गेलं. ती मुलगी, तो चेहरा आजवर तिने कुठे पाहिल्याचं तिला आठवेना, तो मनुष्य ही पूर्ण अनोळखीच. बराच विचार करून तिला माग लागेना. शेवटी केवळ स्वप्न होतं आणि त्याबद्दल विसरायला हवं असं ठरवून ती किचन कडे कॉफी बनवायला निघाली. तेवढ्यात मोबाईल खणखणला. जेसीका चा फोन.
"हेय जे"
" क्रिस, आज ड्रेस मिळू शकणार नाही. मला जो ड्रेस आवडला त्यात तुझा साईझ नाही. तीन दिवसांनी मिळेल असं ओनर म्हणाला"
" जे, काही गरज आहे का? दुसरा बघ मग, हरकत नाही"
" नो.. तू माझ्यावर सोपवलयस ना, तू आता तू काहीही म्हणायचं नाहीस. इतकं अर्जंट ही नाहीये. मी तुला कॅटलॉग वरचा फोटो पाठवते"
" ओके ऍज योर विश. तू आज येणार आहेस ना?" क्रिस्टन ला आज रात्री एकटीने झोपायची इच्छा होईना.
" हो येते. मी आधी शॉप मध्ये गेले होते त्यामुळे माझी सगळी कामं पेंडींग आहेत, ते झाले की येते, ओके बाय नाऊ"
"थँक्स, बाय"
जेसीका येईपर्यंत कदाचित संध्याकाळ उलटून जाईल असा अंदाज आल्यावर तिने थोडा वेळ तिच्या आजी आजोबांकडे घालवण्याचे ठरवले. डोक्यातून स्वप्नांचे विचार घालवण्यासाठी तिला तो पर्याय योग्य वाटला. तडक उठली, आवरून, घराला कुलूप लावून, गाडी काढून ती निघाली. घर जवळच होते, ती 10 मिनिटात पोहोचली देखील. रविवारच्या दिवशी क्रिस्टन भेट देऊन जाते हे त्यांना ठाऊक असते आणि क्रिस्टलाही आजी आजोबांचे रुटीन ठाऊक असते त्यामुळे आजी आजोबांना आधी कळवायची गरज तिला वाटली नाही.
आजीकडे गेली की दरवेळी तिचा काहीना काही छान खाद्यपदार्थ तयार असतो. आज आजीने कुकीज केल्या होत्या. नेहमीप्रमाणे खाणं पिणं गप्पा, टप्पा सुरू झाल्या. आजी आजोबा एक गोड, समाधानी आणि कायम हसतमुख कपल होते. स्वतःची मुलगी गमावल्यानंतरही सावरून त्यांनी आपले पूर्ण लक्ष क्रिस्टन वर केंद्रित केले. त्यांनी क्रिस्टनला माया लावली. क्रिस्टन स्वतःला खूप नशीबवान समजत. ते नसते तिचं काय झालं असतं या हा विचारही तिला नकोसा होत. तिचे आजी आजोबा तिला सगळ्यात जास्त प्रिय होते. कदाचित डॅनियल ही त्यांच्यापेक्षा एक पायरी खाली होता. गप्पाच्या ओघात क्रिस्टनने आजीकडे आजोबांनी या आठवड्यात किती वेळा जंक फूड मागवून खाल्लं याचा हिशोब मागितला आणि आजोबांना लेक्चर द्यायला सुरुवात केली.
" यु नो ग्रेस, ही मुलगी दरवेळी प्रुव्ह करते दॅट वी हॅव मिलिटरी ब्लड इन अवर व्हेन्स" आजोबा आजी कडं तक्रार करत म्हणाले.
क्रिस्टन चमकली.
"मिलिटरी ब्लड?"
"माझे वडील, माझे आजोबा मिलिटरी मध्ये अधिकारी होते, तुला सांगितलं होतं मी हे , हो ना? "
क्रिस्टीनच्या डोक्यात तिला दुपारी पडलेल्या स्वप्नाचा विचार तरळून गेला. तिची उत्सुकता वाढली.
" ओह येस पा.. पा, तुमचे आजोबा, त्यांच्याबद्दल अजून काही सांगू शकाल? "
" नो डिअर, माझा जन्म होण्यापूर्वीच ते गेले होते. त्यांचं नाव तेवढं लक्षात आहे. मेजर ओलिव्हर विल्सन. "
"पा, डु यु हॅव एनी पिक्चर ऑफ हिम?"
" नो डिअर"
" हाऊ मेनी किड्स ही हॅड? "
" टू,.. माय फादर अँड अ गर्ल, मिन्स माय आंट. माय फादर वॉज अ यंगर चाईल्ड. क्रिस्टीन आज अचानक तुला एवढे प्रश्न का पडताहेत?
"अम् म् नो, जस्ट क्युरियस, नथिंग एल्स" क्रिस्टीन तिच्या मनातले विचार लपवत म्हणाली.
" ओहह, वन्स माय फादर टोल्ड मी दॅट फॉर सम रिजन द गर्ल, माय आंट लेफ्ट होम , अँड नेव्हर केम बॅक. शी व्हॉज लिविंग अँज मेड बीफोर शी डाईड. ही नेव्हर talked मच अबाउट हर."
आजोबांनी बोलता बोलता उसासा टाकला.
क्रिस्टन अजून काही प्रश्न विचारणार तेवढ्यात आजी दोघांवर वैतागली.
" वुड यु तू स्टॉप डिस्कसिंग डेड पीपल अँड कम बॅक टू लिविंग वन?" आजोबा आणि क्रिस्टन ने आजीचा रागरंग ओळखून तात्काळ तो विषय बदलला.
तेवढ्यात डॅनियल चा कॉल आला. त्याच्याशी बोलताना ही तिने स्वप्नाचा उल्लेख टाळला.वरवर क्रिस्टन सगळ्यांमध्ये मिसळत असल्याचं दाखवत असली तरी तिच्या डोक्यातुन आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी जात नव्हत्या. अ मेड? व्हाय? क्रिस्टीनला स्वप्नात दिसलेल्या मुलीचे थंड डोळे आठवले. तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 4

क्रिस्टन तिच्या घरी परतलली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. क्रिस्टन ने मोबाईल चेक केला. "ओह शूट. वेडींग ड्रेस पिक्चर!" जेसीकाने तिला आजी आजोबांकडेच असताना ड्रेस चा फोटो पाठवला होता. पण दुपारी पडलेले अगम्य स्वप्न, आजोबांनी सांगितलेल्या माहितीने त्याच्या वियर्डनेस् मध्ये घातलेली भर या सगळ्या विचारांच्या गोंधळात ती ते ओपन करून पाहायचं पूर्ण विसरली. तिने फोटो डाउनलोड केला. ओपन केला. उंच, सुडौल बांध्याच्या, कमरेवर हात देऊन उभा असलेल्या मॉडेल ने वेडींग ऐवजी रॅम्प वर वॉक करायला निघाली आहे अशा थाटात तो ड्रेस घालून पोज दिली होती. तिला क्षणभर हसू आले. पण ड्रेस च्या ती प्रेमातच पडली. क्रिस्टन ने जेसीका ला बजावले होते तसा साधा, सुंदर एलिगंट ड्रेस होता तो. शॉर्ट लेसी स्लीव्ह्ज, वाईड स्वेअर नेक, घेर नसलेला आणि कमरेच्या आकारानुसार खाली रुळत जाणार, पांढरा शुभ्र गाऊन. अप्पर हाफ मध्ये नाजूक व्हाईट फ्लावरी एम्ब्रॉयडरी.खाली पूर्ण प्लेन . बॅक नेक ही डीप स्क्वेअर आणि लेसी. " गुड जॉब जे अँड वर्थ वेटिंग" ती मनाशीच म्हणाली. तिने जेसीका चा स्पीड डायल नंबर प्रेस केला.
"हॅलो जे"
"हे क्रिस, तुलाच कॉल करणार होते"
"आय नो, सॉरी. पा आणि मा कडे गेले होते, तिथे गप्पात एवढी रमले की फोटो पहायचं लक्षातच राहिलं नाही. बाय द वे, दॅट ड्रेस, इस मोर दॅन लव्हली, थँक्यु जे"
"आय न्यू यु आर गोइंग टू लव्ह इट. बाय द वे, आय अक्चुली कॉल्ड यु टू लेट यु नो, दॅट आय कॅन नॉट मेक इट टू योर प्लेस टूनाईट.. सॉरी क्रिस."
"व्हाय, व्हॉट हॅप्न्ड" ओह नो, क्रिस्टन मनात म्हणाली.
"मॉम इज सफरिंग फ्रॉम फिव्हर, शी वज अक्चुली नॉट फिलिंग वेल सीन्स मॉर्निंग. इट्स नॉट रियली मच, बट, वॉन्ट टू स्टे, टू टेक केअर ऑफ हर"
" ओह, ओके. प्लिज लेट मी नो इफ एनीथिंग निड्स ओके? "
" श्योर अँड डोन्ट वरी, शी विल बी फाईन इन कपल ऑफ डेज"
"ओके, टेक केअर"
"यु टू, बाय"
क्रिस्टन ने उसासा सोडला. स्वप्न आणि त्याच्या संदर्भातल्या गोष्टी तिच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हत्या. आजची रात्र एकटीने काढायचे तिच्या जीवावर आले होते. तिने विचार केला . कदाचित आपण नको इतका विचार करत आहोत. काहीतरी कामात मन गुंतवले पाहीजे असा विचार करून तिने शेल्फ मधून रेफरन्स बुक काढले. उद्याच्या लेक्चरसाठी तिच्या नोट्स रेडी होत्या, पण एक्स्ट्रा काढून ठेवल्या म्हणजे नंतर चे लेक्चरही कव्हर होतील आणि थोडंसं distraction मिळेल म्हणून तीने बेडरूम मधली चेअर ओढली, समोरच्या टेबल वर बुक, पेन, पेन्सिल, पेपर्स घेऊन बसली.

ही ट्रिक कामाला आली, घडाळ्यात पाहिले तर नऊ वाजले होते. तिने जेवण उरकले. टीव्हीवर एखादा चांगला मुव्ही लागला तर बघावं म्हणून चॅनल सर्फ करू लागली. एका ठिकाणी "जेनिफर्स बॉडी" लागला होता. एरव्ही हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल हे तिच्या आवडचे genre होते, पण आज तिला शांत झोपेची आवश्यकता होती. तिने पुढे सर्फिंग चालू ठेवले.एका चॅनल वर "आईस एज 3" लागलेला पाहून ती स्थिर झाली आणि त्यात रमली. दहा वाजून गेले तसे तिला जांभया येऊ लागल्या. तिला दिवसभरात बराच मानसिक ताण आलेला होता आणि उद्या कॉलेज मध्ये सर्वाईव्ह करायचे म्हणजे शांत झोपेची गरज होती. तिने सगळी दारं, खिडक्या, लाईट्स व्यवस्थित चेक केले आणि बेडरूम मध्ये जाऊन बेडवर पडली. पाच दहा मिनिटात ती झोपेच्या अधिन झाली!

....
हँडल फिरवून तिने तो छोटासा दरवाजा उघडला. वर जाण्यासाठी अरुंद पण प्रचंड अंधारा जिना होता. इथे बल्ब बसवला पाहिजे होता असा विचार करत , वैतागत, चाचपडत, ती जिना चढू लागली. वर छोटयाशा खोलीत तिने हळूच पाय टाकला.तिथेही अंधार भरून राहिला होता. आजूबाजूला काही जुनाट सामान, मोडके, वापरात नसलेले फर्निचर, बॉक्स पडून होते. चालता चालता ती कुठल्याशा वस्तूला धडकली. शीट! एक जुनी लाकडी चेअर आडवी पडली होती. तिने ती उचलून तिथल्या रॅक ला टेकून उभी केली. हवा, प्रकाश येण्यासाठी एकच झडप होती पण तीही कायम बंद असल्याने कोंदटपणा दाटला होता. बराच काळ एकाच जागी पडून राहिल्याने तिथल्या वस्तुंना एक विशिष्ट दर्प येत होता, असह्य नव्हता पण कोंदट, लाकडी, ग्रीसी... इथे एक बल्ब असावा कदाचित. असं म्हणत तिने वर पाहिले. थोडसं पुढे कुठल्याशा फटीतून कवडसा येत होता. त्याच्या अंधुक प्रकाशात तिला लोम्बकळणारी एक दोरी दिसली. काळजीपूर्वक पावलं टाकत ती पुढे झाली आणि ती दोरी ओढली. बल्ब लागेना. दोनदा, तीनदा, चौथ्यांना ओढल्यावर, चर्रर्र चर्रर्र आवाज होत तो बल्ब अखेर बळच लागला. त्या अंधुक उजेडात तिने आजूबाजूला पाहून घेतले. थोडी अजून पुढे जाणार तोच पायाला कुठल्याशा जड वस्तू चा धक्का लागून ती ठेचकाळली. तोंडातल्या तोंडात स्स्स्स् आवाज करत, दुसऱ्यांदा ठेच लागल्यामुळे मनातल्या मनात शिव्याशाप देत, हे मधेच काय ठेवलंय म्हणत तिने चिडून खाली पाहिले. ती एक मध्यम आकाराची आयताकृती लाकडी पेटी होती. तिच्या झाकणाच्या चारी बाजुंना बारीक, दाट पण रेखीव कोरीव काम केल्यामुळे तिला विंटेज लूक आलेला होता. पुढच्या बाजूला छोटी पण मजबूत पितळी कडी होती. त्या कडीवरही तशीच कोरीव नक्षी होती. या सगळ्या सामानात ती पेटी काहीशी आगंतुक, अनोळखी वाटत होती. तिच्या मनात कुतूहल जागे झाले. ती खाली गुडघ्यावर बसली. पेटीचे व्यवस्थित निरीक्षण केल्यावर तिने कडी उघडायला घेतली. बराच काळ बंद असावी कदाचित. तिने अजून थोडासा जोर लावला. कडीच्या वर असलेला आडवा भरीव दांडा, बाजूच्या दोन मोठी छिद्र आलेल्या गोलांत घासला जाऊन आवाज झाला. कडी वर झाली तेव्हा तिला दिसले की तिच्या खाली सुरेख करसिव्ह वळणात कोरलेला एक 'V' आहे. व्ही? म्हणजे काय असावं याचा अंदाज लावण्यासाठी तिने डोक्यावर जोर देऊन पाहीला, पण व्यर्थ. तिने आता कडी पूर्ण वर केली, दोन्ही हातानी झाकण वर करून ते उचलले. पुन्हा हलकासा लाकडी बिजागऱ्या घासल्याचा आवाज झाला. आत एक अत्यन्त तलम असे मोती रंगाचे रेशमाचे कापड होते. ते कापड तिने उलगडले. त्यात शुभ्र, त्या कापडापेक्षाही तलम, नीटशी घडी घालून काहीतरी ठेवले होते. तिने ते हातात उचचले, उलगडले. ती उभा राहिली. त्याच्या दोन्ही शोल्डर्स ला पकडून तिने स्वतःचे हात लांब करून पाहीले. तो एक वेडींग ड्रेस होता!!

क्रिस्टन तोंडातून मोठ्ठ्याने श्वास टाकत बेडवर उठून बसली तेव्हा सकाळचे 6 वाजले होते.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस -5

"स्टोअर रूम..." मिनीटभरानंतर व्यवस्थित जाग आल्यानंतर तिने थोडासा विचार केला आणि तडक उठली. बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर उजवीकडे वळून हॉलवे मधून चालू लागली. तिच्या मनात आता भीती, कुतूहल अशा संमिश्र भावना तयार होत होत्या. उजवीकडेच फारशा वापरात नसल्या दुसऱ्या बेडरूम चा दरवाजा ओलांडून ती पुढे गेली. थोडंसंच पुढे एका लहान दरवाज्यासमोर येऊन थबकली. स्वप्नात दिसलेला दरवाजा हाच होता आणि ती मुलगीही ती स्वतःच होती!
तिने हँडल फिरवून दरवाजा उघडला. अंधारा, अरुंद जिना.. उजेडाला कुठूनही जागा नसल्याने दिवसाही तिथे अंधारच, पण दिवसा किमान पायऱ्या तरी नीट दिसत होत्या. जिन्याच्या पहिल्या पायरीवर टाकण्यासाठी पाय उचलला पण लगेच तसाच मागे घेतला. झपाझप पावलं टाकत ती पुन्हा तिच्या बेडरूम मध्ये आली, मोबाईल उचलुन तिच्या स्वेट पॅन्ट च्या खिशात घातला आणि पुन्हा जिन्यापाशी आली. सावकाश पाय टाकत शरीराबरोबर मनाचा तोल सांभाळत ती जीना चढू लागली. स्टोअर रूम मध्ये पाय ठेवण्याआधी तिने शेवटच्या पायरीवरून सगळी रूम निरखून घेतली. हृदयाची धडधड आता कानांपर्यंत पोहचत होती. आत गेली. थोडंसं पुढे चालल्यावर तिने आधी खाली पाहिले, धडकण्यापूर्वीच तिने खाली पडलेली लाकडी खुर्ची बाजूला केली. समोर वरती तिला तशीच लोम्बकळणारी दोरी दिसली . पण आता बल्ब ची गरज भासत नव्हती. अजून पुढे गेली आणि खाली पाहिले. कालच्याच जागी ती सुंदर, मजबूत लाकडी पेटी पडून होती. पडून म्हणण्यापेक्षा कोणीतरी मुद्दामहून ती तिथे ठेवल्यासारखी वाटत होती. क्रिस्टन भान हरपल्यासारखे तिच्याकडं बघत राहिली, तिला डोळ्यांवर विश्वासच बसेना.
तशाच अवस्थेत ती गुडघ्यावर बसली. पेटीला निरखून घेतले. आत काय आहे हे तिला आता माहीत होते तरीही कडी वर उचचली. खाली कोरलेल्या V वर हलकेच तर्जनीने स्पर्श केला. अचानक कुठूनतरी थंडगार, गोठवणारा झोत अंगावर आल्यासारखा भास झाला. तिला तिथे थांबावेसे वाटेना.पुन्हा कडी लावत तिने ती पेटी उचलली आणि तडक उठली. जिना उतरत थेट स्वतःच्या बेडरूम मध्ये आली.
पेटी बेडवर ठेऊन उघडावी की नको अशा अवस्थेत ती काही मिनिटं तशीच बसून राहीली. "आय डोन्ट वॉन्ट टू डील विथ धिस राईट नाऊ" असं मनाशी म्हणत ती उठली, घड्याळाकडे पाहीले. 7 वाजून गेले होते. तिने पेटी उचलून टेबलवर ठेवली आणि किचन मध्ये गेली. फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून तोंडाला लावली. गटागट पाणी पिऊन तिने घशाची कोरड शमवली.

....
कॉलेजच्या पार्किंग लॉट मध्ये गाडी लावून काहीशी तंद्रीतच ती स्टाफ रूम मध्ये येऊन बसली. दहा मिनिटांनी नोट्स आणि बुक घेऊन ती क्लास मध्ये आली. मुलांना गुड मॉर्निंग विश करत तीने बोर्ड कडे वळून आजच्या टॉपिक चे हेडर लिहिले. पुन्हा मुलांकडे वळून तिने बोलायला सुरुवात केली. कशीबशी 10 मिनिटे जातात न जाताच तोच तिच्या डोळ्यांसमोर अचानक वीज चमकल्यासारखे त्या दिवशी स्वप्नात थंड, भेदक डोळ्यांनी पाहणाऱ्या मुलीचा चेहरा चमकून गेला. ती गडबडली आणि बोलायची थांबली. ऐकता ऐकता नोट्स घेणाऱ्या मुलांनी एकदम वर बघितले. ती त्यांच्याकडे बघत भानावर आली.डोके एकदोनदा जोरजोरात हलवत तिने तो विचार झटकून टाकला." एक पॉज घेऊन "अम म, सॉरी फॉर दॅट.., ऍज आय वज सेयीन" म्हणत तिने बोलणे कँटीन्यू केले. मिनिटभरातच पुन्हा तीच मुलगी, बरोबर असलेल्या एका मुलाच्या हातात हात घालून, हसत हसत नदीकिनारी चालतानाचे दृश्य तिच्या डोळ्यांसमोर चमकून गेले. ती पुन्हा गडबडून थांबली. यावेळी अजून पॉज न घेता तिने लक्ष केंद्रित करत बोलणे चालू ठेवले. नंतरची चाळीस मिनिटे मात्र नॉर्मल गेली. पण आता तिला राहवेना. बेल वाजताच ती बुक्स, नोट्स उचलुन तडक स्टाफ रूम मध्ये गेली. तिच्या कलीग मिसेस स्वान तिथे बसून काहीतरी वाचत होत्या. त्यांच्याजवळ घाईघाईने "लिविंग फॉर सम इमर्जन्सी, प्लिज इंफॉर्म मिस्टर टेनिसन" असा निरोप ठेवत पार्किंग लॉट मध्ये येऊन, गाडी घेतली अणि थेट घरी पोहोचली.
बेडरूम मध्ये येऊन ती पेटी ती बेडवर घेऊन बसली. कडी उघडली. आतमधले रेशमी कापड उघडून त्यातल्या ड्रेस ची तशीच घडी तिने हातात घेतली. त्याचा वास घेऊन पाहीला. नुकत्याच दुकानातून आणलेल्या नव्या वस्त्राला जसा विशिष्ट, ताजा फील असतो, अगदी तसाच तिला जाणवला. तो ठेवणीतला किंवा वापरलेला वाटेना.थोड्यावेळ तिने तो ड्रेस कोणाचा असावा ते आठवण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईचे लग्न झाले नव्हते. आजीचा असणे शक्य नव्हते. सध्याच्या तिच्या कुटुंबात 'व्ही' कोणाचेही इनिशीयल नव्हते. तिने उभा राहून तो ड्रेस उलगडला. ते अतिशय उंची सिल्क होते. त्याच्या लॉंग स्लीव्ह्ज ट्रान्सपरंट कापडाच्या होत्या. गळ्यापासून सुरू होणारी हेवी सोनेरी फ्लावरी डिझाइन लॉंग स्लीव्ह्ज वरून थेट मनगटापर्यंत आली होती. स्लीव्ह्ज वर मध्येमध्ये हातांची स्किन दिसावी म्हणून काही जागा प्लेन ठेवण्यात आली होती. अप्पर हाफ चा, बस्ट वरचा थोडासा गोलाकार भाग सोडला तर सगळीकडे सम्पूर्ण सोनेरी सिल्कच्या धाग्यांची एम्ब्रॉयडरी होती. ड्रेस चा घेर कमरेपासून खाली प्रमाणात वाढत गेला होता. तिने ड्रेस उलटून धरला. मागे रुंद त्रिकोणी गळा खोल , पाठीच्या अर्ध्या भागापर्यंत जात होताना. मागेही सगळीकडे तेवढीच दाट कलाकुसर. त्यामुळे तो ड्रेस तिच्या हातांना भलताच जड लागत होता.
क्रिस्टन तसाच तो ड्रेस घेऊन ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर गेली. आरशात बघत तिने तो ड्रेस स्वतःच्या अंगाला लावून पाहीला. ती जणू त्या ड्रेस ने झपाटून गेली. तिला तो ड्रेस घालून बघण्याची प्रचंड इच्छा झाली. ताबडतोब तिने अंगावरचा प्लेन, लाईट ब्लु फॉर्मल शर्ट आणि स्कर्ट काढून टाकला. ड्रेस च्या मागच्या गळ्याच्या खाली असलेले हुक्स काढले. "हु कॅन युज हुक्स नाऊ अ डेज इन्स्टेड ऑफ झिप्स" असा विचार मनात आला. ड्रेस खाली धरून दोन्ही पाय तिने त्यात घातले. वरपर्यंत चढवून मागे हातांनी कसेबसे हुक्स अडकवले आणि ती आरशात पाहण्यासाठी मागे वळाली. खालपासून सुरवात करत तिची नजर हळूहळू वर येऊ लागली. ती आता स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचे हसरे, उत्साही भाव आता नाहीसे होऊन गंभीर झाले. निळ्या डोळ्यांत आता एक वेगळी चमक आली होती.. आणि नजर थंड, गोठवून टाकणारी!!

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस- 6

.....…......चार दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतल्यानंतर व्हिक्टोरिया ब्रेकफास्ट ला डायनिंग हॉल मध्ये येण्यास तयार झाली. मेजर विल्यम्सने तिच्या आणि हेन्री च्या लग्नाला असलेला विरोध काढून घेतला होता. हेन्री शहरातल्या गरीब वस्तीत आपल्या आईबरोबर राहणारा, वडील नसलेला, दुसऱ्यांच्या शेतीत राबून कष्ट करणारा मुलगा. तो एक उत्तम शिल्पकार होता. शिल्पकलेच्या विद्यालयात शिकून व्यावसायिक शिल्पकार होण्याचे त्याचे स्वप्न होते. पण शिक्षणासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी त्याने शेतकामे सुरू केली. लवकरात लवकर पुरेसे पैसे जमा करण्यासाठी तो दुप्पट कष्ट करत असे. त्याची आई तेरेसा हेन्री लहान असल्यापासून विल्यम्स कडे पूर्ण वेळ घरकामासाठी असे. हेन्री मोठा होईपर्यंत आईबरोबर विल्यम्स कडे येत आणि दिवसभर तिथेच थांबत. विल्यम्स चा बंगला गावापासून जरा बाजूला पडत असल्याने व्हिक्टोरियाचा हेन्री हाच एकमेव मित्र झाला. नाही म्हणायला व्हिक्टोरियाला एक लहान भाऊ होता. दोघांत 10 वर्षांचे अंतर. त्याच्या जन्माच्या वेळी व्हिक्टोरिया ची आई गेल्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी त्याला दुसऱ्या गावी त्याच्या आजीकडे ठेवण्यात आले होते. हेन्री आणि व्हिक्टोरिया तरुण वयात येऊ लागले तसे त्याच्यात मैत्रीच्या पुढचे नाते तयार होऊ लागले. गडद करड्या डोळ्यांचा, उंचापुरा, शेतीची कामे करून मजबूत अंगकाठी कमावलेला हेन्री रुबाबदार दिसु लागला होता. एक दिवस हेन्री ने व्हिक्टोरियाला तिचेच एक छोटेसे सुरेख बस्ट स्कल्पर भेट देऊन तिला आपल्या प्रेमाची कबुली दिली. व्हिक्टोरिया मिनिभराचा विलंब ही न लावता त्याला होकार दिला. सोळा वर्षांच्या व्हिक्टोरियाच्या लग्नासाठी घरात वर संशोधनाची चर्चा होऊ लागताच तिने वडिलांना हेन्री बद्दल सुचवले. विल्यम्सला एखाद्या भणंग मुलाबरोबर आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न लावून देण्याची कल्पना ही सहन होईना. विल्यम्स ने संतापून 'श्रीमंत मुलीला फसवून माय लेकाचा आपल्या संपत्तीवर डोळा आहे' असे आणि अजून नाही नाही नाही ते आरोप तेरेसावर लादले. स्वाभिमानी हेन्री ला सगळ्यांसमोर आपल्या आईचा झालेला अपमान सहन झाला नाही. त्याला कळताच तो दुसऱ्याच दिवशी आईबरोबर आला आणि 'आजपासून माझी आई तुमच्याकडे काम करणार नाही' म्हणून आईला घेऊन गेला. तसेच व्हिक्टोरियाशी असलेले सगळे संबंध तोडण्याचे वचन दिले. बाप लेकीत खटके उडण्यासाठी हे निमित्त ठरले. दोघातला संवाद संपून त्याची जागा वाद, भांडणांनी घेतली. विल्यम्स् पुढे काही चालेना हे पाहून अखेर व्हिक्टोरिया ने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि अन्न पाणी त्यागले. तिच्या खोलीचे दार तोडून तिला बळच खाऊ घालण्याचा प्रयत्न केला गेला. शेवटी तिने स्वतःचा जीव देण्याची धमकी दिली तेव्हा विल्यम्स ने माघार घेऊन अखेर तिच्याबरोबर चर्चा करण्यास तयारी दाखवली.
व्हिक्टोरियाचा आनंद गगनात मावेना. हेन्री च्या घरी जाऊन तिने त्याच्या आईची माफी मागितली आणि लग्नाच्या चर्चेसाठी वडिलांकडून आमंत्रण असल्याचा निरोप ठेवला. विल्यम्स ने दोघांचा यथोचित सन्मान करून पुढच्या महिन्यातला एक रविवार लग्नासाठी ठरवला. लग्नाची तयारी सुरू झाली. व्हिक्टोरिया च्या वेडींग ड्रेस च्या निवडीची वेळ आली. विल्यम्सने आपल्या ओळखीचा वापर करून लंडन वरून खास उंची सिल्कचा व्यापार करणाऱ्यांनाकडून कापड मागवून घेतले. त्यांच्याच शहरात एका गुणी टेलर कडे व्हिक्टोरियाने ड्रेस शिवायला टाकला. ड्रेस वर सोन्याचे पाणी चढवलेल्या धाग्यांचे हाताने नक्षीकाम होणार होते... व्हिक्टोरिया हरखून गेली होती....

Keywords: 

वेडींग ड्रेस - 7

पुढचा भाग टाकायला खूपच उशीर करतेय त्याबद्दल बिग सॉरी....!
लिंक लागण्यासाठी आधीचे भाग पटकन वाचायचे असतील तर ही लिंक!

https://www.maitrin.com/node/3733

मेजर विल्यम्सने ने लग्नाला मान्यता दिली पण हेन्री पुढे एक प्रस्ताव ही मांडला. हेन्री ला तो गावातल्या सरकारी कार्यालयात छोटीशी नोकरी मिळवून देऊ शकत होता. जेणेकरून त्यांना महिन्याला स्टेबल रक्कम मिळून दोघांचा संसार व्यवस्थित चालेल आणि मुलीला त्यातल्या त्यात सुखात राहता येईल. हेन्री ला अशी रोजचा ठराविक वेळ घेणारी नोकरी नको होती. त्याला त्याच्या शिल्पकलेच्या सरावाला वेळ मिळणार नाही म्हणून त्याने शेतकाम पत्करले होते. ठराविक सिजन मध्ये जास्तीची कामे झाली की नंतर त्याला बराच वेळ मिळत असे. तसेच तो शिकलेला असल्याने त्याला शेतकामाऐवजी इतर मजुरांच्या कामावर लक्ष ठेवणे, हिशेब ठेवणे अशी कामे दिली जाऊ लागली होती. पण विल्यम्स सारख्या हट्टी, हेकेखोर माणसाने नमतं घेतलंय तर आपणही विकी साठी , दोघांसाठी काहीतरी तडजोड केली पाहिजे असा विचार करून त्याने तो प्रस्ताव मान्य केला. व्हिक्टोरियाला हेन्रीने आपल्यासाठी ही तडजोड करायला नको होते, तिने हेन्रीला पुन्हा त्यावर विचार करण्यास सांगितले. पण हेन्रीचा निर्णय झाला होता. व्हिक्टोरियाला आता आपल्या बाबांबरोबर आपण खूप आततायीपणाने वागलो म्हणून वाईट वाटू लागले.. तिने त्यांची माफी मागितलीच पण इथून पुढे त्यांना त्यांच्याशी ती असे कधीही वागणार नाही असे वचन दिले.
एक दोन दिवसातच नावापुरता इंटरव्ह्यू देऊन हेन्री ऑफिसात रुजू झाला. त्याच्या नोकरीचे तास संपले की तो आणि विकी रोज गावातल्या नदीकिनारी जात असत. हिरवेगार कुरण, आजूबाजूला उंच, घनदाट, रांगेत उभारलेले ओक वृक्ष, लांबवर दिसणाऱ्या निळसर टेकड्या आणि त्याला टेकलेले ढगांचे , मावळतीच्या वेळी केशरी होत जाणारे पुंजके असे सुंदर दृश्य असे. उंचसखल कुरणाच्या कडेकडेने जांभळ्या रंगाच्या छोट्या छोट्या रानटी फुलांची झुडपं होती. अधून मधून पावसाचे शिडकावे चालूच असल्याने कुरणं, झाडं टवटवीत दिसत असत. तिथल्या गवताला सुंदर गंध येत असे. गाव छोटंसं असल्याने आपल्याकडची थोडीफार जनावरं चरायला घेऊन तिथं माणसं येत असत, पण संध्याकाळच्या वेळेला केवळ पानांची, गवताची सळसळ , पाखरांचे आवाज नि नदीच्या प्रवाह यांच्या अस्तित्वाने तो एकांत भरलेला असे. नदी अरुंद होती आणि पलीकडे जाण्यासाठी एक जुनाट लाकडी पण भक्कम पूल होता. बऱ्याचदा दोघे त्या पुलावर पाय खाली सोडून बसत आणि अंधार होइपर्यंत गप्पा मारत असत. गर्द झाडीमुळे तिथे लवकरच अंधार जाणवत असे. लग्न ठरल्यापूर्वी कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून दोघे इथल्या पुलावर कधीच येत नसत. कुठल्यातरी दाट झाडयांच्या मध्ये उभ्याउभ्या , गडबडीत त्यांच्या भेटी होत असे. आता मात्र तो लाकडी पूल ही त्यांची ठरलेली जागा झाली होती.
असेच दोन आठवडे निघून गेले. व्हिक्टोरियाला त्या दिवशी सकाळी जोरदार पावसाच्या रौरवानेच जाग आली. तिच्या रूम च्या खिडकीतुन बाहेरचा रस्ता दिसत असे. आज पावसाच्या धारांमुळे पलीकडचं अंधुक दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं झोडपून निघत होती. बाथरूम मध्ये जाऊन तिने गरम पाण्याचे शॉवर घेतले. गर्द हिरव्या रंगाचा , रेशमी आणि त्यावर जांभळ्या फुलांचे नक्षीकाम असलेला ड्रेस चढवला. लांबसडक फिक्कट ब्लॉन्ड केस कोरडे होण्यासाठी तसेच मोकळे ठेवले.तेवढ्यात दारावर दोनदा नॉक करून तिची मेड चहाचा ट्रे घेऊन आत आली.
" गुडमॉर्निंग मॅम"
" गुडमॉर्निंग डेझी"
डेझी चहा बनवून कप बशी व्हिक्टोरिया च्या हातात देऊन जाऊ लागली तितक्यात तिला काहीतरी आठवले. चटकन मागे वळून तिने तिच्या ड्रेस च्या खिशातून एक पाकीट बाहेर काढले.
"आय एम सो सॉरी मॅम. थोड्यावेळापूर्वीच तुमच्यासाठी एक लेटर आलं आहे."
" ओह, थँक्यु डेझी"
व्हिक्टोरिया ने तिच्या हातातून पाकीट घेताच डेझी निघून गेली. पाकिटाच्या कोपऱ्यात सरकारी स्टॅम्प होता. तिला विशेष वाटले. पाकीट उघडून पत्र बाहेर काढताच तिला खाली काही छोटी जांभळी फुलं दिसली. ते रोज भेटतात तिथल्या झुडपाला येतात तीच होती ती.पत्र हेन्री चे आहे हे तिच्या ताबडतोब लक्षात आले. कुतूहलाने त्यातला कागद घेऊन ती बेडवर खाली पाय सोडून बसली.
"डियर विकी,
मला ऑफिसच्या कामासाठी आज सकाळीच 4 दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागत आहे. मलाही खूप अचानक निरोप मिळाला. बुधवारी संध्याकाळी नेहमीच्या वेळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटुयात. मी वाट पाहीन "
लव,
हेन्री

PS: तुला फुलं मिळालीच असतील.

"
बुधवारचा दिवस उजाडला. आज ती दोन कारणांमुळे खूप एक्साईटेड होती. एक म्हणजे चार दिवसांनी हेन्री परत येणार होता नि दुसरं म्हणजे आज तिच्या ड्रेस ची डिलिव्हरी मिळणार होती. दिवस पटापट पुढे सरकला. तिने आपल्या रेशमी ब्लाँड केसांची साईड ब्रेड घातली. ऑफ व्हाईट रंगाचा सिल्क चा गाऊन, त्याच रंगाची एक छोटीशी पर्स आणि काळ्या रंगांची एक छत्री घेऊन ती बाहेर पडली. तिला बाहेर येण्याजण्यासाठी त्यांची स्वतंत्र कॅरीज होती. अगदी फॅन्सी नाही, साधीशीच आणि लहान. तिने ड्रायव्हर ला जागा सांगितली. घोड्यावर चाबूक ओढून ते निघाले. जागेच्या जवळ आल्यावर तिने ड्रायव्हर ला पाठवून दिले आणि ती स्वतः परत येईल असे सांगितले. ती चालत नदीकाठाच्या दिशेने जाऊ लागली. तिच्याकडच्या पॉकेट वॉचमध्ये तिने वेळ तपासून पाहीली तर त्यांच्या नेहमीच्या वेळेला अजून 15 20 मिनिटे बाकी होती. तरीही हेन्री अद्याप यायला हवा होता असे तिला वाटून गेले. तिने आजूबाजूला पाहिले. सहजच ती झुडपांवर उमललेली जांभळी फुलं तोडून तिच्या पांढऱ्या सिल्कच्या रुमालात वेचायला सुरू केले. आजूबाजूला थोडा अंधार पडायला लागला तेव्हा तिची तंद्री तुटली. . पुन्हा पॉकेट वॉच काढून पाहिले तर अर्धा तास होऊन गेला होता. चुकामुक होऊ नये म्हणून ती पुलावर नेहमीच्या जागी जाऊन उभा राहीली. ती या वेळी इथे एकटी कधीच आलेली नव्हती त्यामुळे तिला आजूबाजूच्या शांत वातावरणाची थोडीशी भीती वाटत होती. पाण्याच्या प्रवाहाचा आवाज, पक्षांचा वाढलेला किलबिलाट यांच्या जोडीला आता पावसाची रिपरिप, तडतड चालू झाली होती. तिने तिच्याजवळची छत्री उघडली. अजून अर्धा तास लोटला असावा. अंधार वाढत चालला होता. तिला तिथे थांबणे आता बरे वाटेना. तसेच एरव्ही ती या वेळेआधीच निघालेली असे आणि बरोबर हेन्री असे. उगीच आपण चार दिवसांआधीचे पत्र वाचून इथे आलो, कदाचित हेन्री ला परत येण्यास उशीर झाला असावा, असा सगळा विचार करत ती तिथुन निघण्यासाठी वळणार तेवढ्यात तिला नदीच्या प्रवाहाबरोबर काहीतरी वाहत येताना दिसले. कदाचित एखाद्या झाडाचा ओंडका वगैरे असावा. एव्हाना पावसाने जोर धरला होता. नदीच्या प्रवाहाचा वेग ही वाढला होता त्यामुळे ते नदीत वाहत येणारेही वेगाने तिच्या जवळ येत होते. हळूहळू ते नजरेच्या टप्प्यात आले. व्हिक्टोरियाने अजून व्यवस्थित दिसावे म्हणून छत्री मान आणि छातीच्या आधाराने दाबून धरली आणि दोन्ही हात आधारासाठी बनवलेल्या पुलाच्या लाकडी ओंडक्यावर ठेऊन खाली वाकून पाहू लागली. त्यानंतर तिला जे काहो दृश्य दिसले त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि भवताल एकदा वेगात गोल फिरून स्थिर झाला. जवळची छत्री प्रवाहात पडून वाहून जाऊ लागली.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 8

जमिनीवर आपले पाय मरगळल्या सारखे पडताहेत, कोणीतरी आपल्याला धरून चालवत नेत आहे असं काहीसं ग्लानीत असलेल्या व्हिक्टोरियाला जाणवत होतं. कोणीतरी आपल्याला गाडीत बसवत आहे असं वाटत असताना ती घाबरून थोडीशी भानावर आली. तिच्या अंगावर घातलेल्या कोटाने तिला थोडीशी उब वाटत होती. तो माणूस तिचे डॅड आहेत हे पाहून तिला धीर आला.
"डॅड, तुम्ही कधी आलात? त्या नदीत कोणीतरी वाहून.. त्याचा चेहरा"
" विकी शांत हो बाळा, सावकाश बोलू आपण सगळं" विल्यम्स ने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले.
"मी खूप घाबरलो होतो बेटा. संध्याकाळ उलटून गेली तरी तू घरी नाहीस असं मला कार्व्हर ने फोन करून कळवलं. तो म्हणाला की तूच त्याला सांगितलंस की येताना तू स्वतः येशील म्हणून , हे खरं आहे?"
" हो डॅड. कारण मी हेन्री ला .. डॅड मी नदीत वाहून जाताना काहीतरी बघितलं"
" विकी, that's enough. तू बेशुद्ध होऊन पडली होती पावसात कितीतरी वेळ. जरा आराम कर , आपण नंतर बोलू"
"ठीक आहे , पण तुम्ही हेन्री ची चौकशी कराल असं प्रॉमिस करा"
"ओके मी करतो"
व्हिक्टोरिया विल्यम्स च्या खांद्यावर डोके ठेऊन डोळे मिटून बसली. थंडीने ती पूर्ण काकडली होती. तिच्या डोळ्यामोरुन तो अंधुकपणे दिसलेला चेहरा जात नव्हता. नदीकाठचा अंधार, तिथलं वातावरण सगळ्याचा तिने धसका घेतला होता. मनात नको नको ते विचार येत होते. ती घरी कधी गेली, कपडे कधी बदलले आणि बेडवर जाऊन कधी झोपली हे अर्ध्या जागेपणी, अर्ध्या ग्लानीतल्या अवस्थेत तिलाच कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी तिला बरीच उशिराने जाग आली. झोपेत वेगवेगळी, विचित्र स्वप्न पडत होती. उशिरा उठली खरी पण झोप शांत लागली नसल्याने सकाळी उठल्यावर तिचे डोके जड झाले होते. झोपेतून उठल्याबरोबर कालची सगळी घटना तिच्या डोळ्यांसमोरून विजेसारखी चमकून गेली. तिला राहवेना. ती लगेचच तिच्या वडिलांना शोधत खाली आली. विल्यम्स च्या स्टडी हॉल मध्ये कुठल्याशा मिटिंग्ज मध्ये सगळे व्यस्त दिसत होते. मधल्या मोठ्या टेबलावर भलामोठा मॅप पसरवून विल्यम्स सगळ्यांना काहीतरी सांगत होता. कशाचाही विचार न करता ती तडक आत गेली.
" डॅड, काल तुम्ही प्रॉमिस केलं होतं"
स्टडी मधलं शांत गंभीर वातावरण तिच्या अचानक आलेल्या आवाजाने ढवळून निघालं. विल्यम्ससकट सगळ्यांनी चमकून तिच्याकडे पाहीलं. नुकतेच झोपेतून उठल्यामुळे विकटलेले केस्, झोपताना घालायचे काहीसे चुरगळलेले कपडे अशा वेशात ती सगळ्यांसमोर आल्यामुळे विल्यम्स ला संताप आला. पण मुलीची मनस्थिती पाहता चिडून उपयोग नव्हता म्हणून त्याने स्वतःला सावरले.

" व्हिक्टोरिया, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन थांब. मी लगेचच येतो"
" नाही डॅड, मला आता जाणून घ्यायचं आहे, हेन्री बद्दल तुम्ही चौकशी केली का" व्हिक्टोरिया चा एकंदर आवेश बघून
विल्यम्सला मिटिंग सोडल्याशिवाय पर्याय नव्हता.
" एस्क्यूज मी जंटलमेन, आय विल बी राईट बॅक " म्हणत तो व्हिक्टोरिया चा दंड धरत तिला हॉल बाहेर घेऊन गेला आणि तिला स्वतःच्या खोलीत नेले.

" मला हे अजिबात आवडलं व्हिक्टोरिया. मॅनर्स कुठे गेले तुझे? "
" डॅड, तुम्ही हेन्री ची चौकशी केलीत का?" व्हिक्टोरिया शांत पण ठाम आवाजात विल्यम्स च्या डोळ्यात डोळे रुतवून म्हणाली.
विल्यम्स चा आवेश ओसरला.
" बस बेटा तू आधी खाली"
दोघेही विल्यम्स च्या रूम मध्ये असलेल्या सोफ्यावर बसले.
" मला सांग, तू काल हेन्री ला भेटीला नदीकाठी जाणार आहेस हे मला का सांगितलं नव्हतं?"
" आम्ही तिथे नेहमीच भेटतो डॅड, काय झालंय , मला खूप भीती वाटतेय आता, सांगा प्लिज"
" विकी, हेन्री काल नदीत पडून गेला. काल रात्री मला हे कळलं पण तूझी अवस्था.. तू वाहून जाताना पाहीलं तो.."
ते एकेक शब्द व्हिक्टोरियाच्या कानांच्या पडद्याला काट्यांसारखे टोचले, नदीत वाहून जाणारी आकृती डोळ्यासमोर आली. पण तिला त्या कशावरच विश्वास बसेना.
" काय बोलताहात तुम्ही डॅड, असा कसा मरु शकतो तो? पाण्यात पडून? त्याला पोहता येतं डॅड.. आणि म्हणजे तो तिथे आला होता मग मला का भेटला नाही?? "
" त्याची बॉडी सापडली तेव्हा त्याच्या डोक्यावर मार बसल्याचा खुणा होत्या. तू येण्याआधीच तो तिथे आला असावा. प्रवाहात पडल्यावर नदीतल्या खडकामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असावा असं डिटेक्टिव्ह सांगत होते. कदाचित त्यामुळे तो. . नंतर पावसाने ही जोर धरला होता. वाहत जाऊन कुठल्याशा जाळ्यात अडकून बसलेली ती बॉडी तिथे जवळ राहणाऱ्या माणसाला दिसली आणि त्यानेच डिटेक्टिव्ह ऑफिस ला कळवले" विल्यम्स एकेक वाक्य जमेल तेवढ्या सावकाशपणे उच्चारत म्हणाला.
व्हिक्टोरिया ला बसल्या जागी घेरी आली.
" त्याची बॉडी? कुठेय आता ती ? "
" त्याच्या शेजाऱ्याने त्याच्या घराच्या आवारात ठेवली आहे . त्याची आई येईपर्यंत. मला कळल्याबरोबर मी स्वतः काही तिथे गेलो , त्याच्या आईचे सांत्वन करायला. पण शेजारच्या लोकांकडून कळलं की ती काल सकाळीच कुठेतरी गावाला गेली आहे. मी तिथे थोडावेळ थांबलो पण मला आजच्या मीटिंगसाठी अर्जंटली परत यावं लागलं" सांगताना विल्यम च्या चेहरा पडला होता.
तेरेसा ने हेन्री आणि व्हिक्टोरिया चे लग्न ठरल्यापासून विल्यम्स च्या घरचे काम सोडले होते. हेन्री नोकरी करायला लागल्यापासून केवळ वेळ जावा म्हणून जवळच्या शेतात ती अधूनमधून कामावर जात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिची आणि व्हिक्टोरिया ची भेट नव्हती. व्हिक्टोरियाच्या मनात भीती, दुःख, राग सगळ्या भावना एकवटल्या.
" नो डॅड, नो " म्हणत तिने विल्यम्स च्या अंगावर स्वतः ला ढकलून दिले. विल्यम्स पुढचा अर्धा तास काही न बोलता तिला थोपटत राहीला. त्याने ने मिटिंग पोस्टपोन केली. दोघेही हेन्री च्या घराकडं निघाले. संपूर्ण प्रवासात व्हिक्टोरिया प्रेतवत बसून राहीली. एवढया छोटयाशा कालावधीत तिच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली होती. हेन्रीच्या घराच्या आवारात पोहोचल्यावर बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत ते आत गेले. हेन्री च्या आईचा अजूनही पत्ता नव्हता. व्हिक्टोरिया ने हेन्री च्या बॉडी वरचे पांढरे पांघरून काढले. पाण्यात पडल्याने आणि खूप वेळ उलटून गेल्याने शरीर फुगलेले होते, चेहरा विद्रुप दिसत होतं. तो हेन्रीच आहे यावर तिचा विश्वास बसेना. व्हिक्टोरिया चा बांध पुन्हा फुटला.
शेवटी सगळ्यांच्या मते अजून फार उशीर न करता हेन्रीवर अंत्यसंस्कार करून घेण्याचे ठरले. नदीकाठाजवळच त्याला पुरण्यात आले. थरथरत्या हाताने व्हिक्टोरियाने त्याच्यावर शेवटची मूठभर माती टाकली.

पुढचे जवळपास पंधरा दिवस असेच गेले. आधीचे काही दिवस रडून रडून व्हिक्टोरियाचा चेहरा, डोळे कायम सुजलेले असत. तिचे कशातच लक्ष नसे. एवढ्या दिवसांत स्वतःच्या रूम च्या बाहेर ती क्वचितच आली होती.
एका सकाळी डेझी तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन गेली.
डेझीला पाहून ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली.
"डेझी?" एवढ्या दिवसांत पहिल्यांदा व्हिक्टोरिया स्वतःहून काहीतरी बोलली होती.
" त्या दिवशी तू मला हेन्री चं पत्र दिलं होतं ते तुझ्याकडे कोणी दिलं होतं ?"
" मिस्टर लिटल, मॅडम"
"ओके.. थँक यु. तू जाऊ शकतेस"
" अम् मॅडम , तुमचा वेडींग ड्रेस.. " डेझी पापण्यांची उघडझाप करत खाली पाहत म्हणाली.
व्हिक्टोरिया ला एकदम आठवले. ज्या दिवशी हेन्रीला भेटायला ती गेली त्याच दिवशी तो मिळणार होता. पण नंतर दुर्दैवाने ज्यासाठी तो खास बनवून घेतला ते आता कधीच होणार नव्हतं.
" मला तो आणून दे"
फक्त मानेनेच होकार देत डेझी निघून गेली. पाचच मिनिटात हातात एक सुंदर कोरीव काम असलेली लाकडी पेटी घेउन आली आणि व्हिक्टोरिया च्या हातात देऊन पुन्हा निघून गेली. व्हिक्टोरिया ने एकदा पेटीवरून हात फिरवला पण न उघडता च तो तिच्या कपाटात ठेऊन दिला. आता ती दुःखातून हळुहळु सावरू लागली होती. डोळ्यातले पाणी आटले होते. एका क्षणी एकदम तिला हेन्रीच्या आईची आठवण झाली. त्या परत आल्यानंतर त्यांच्या एकुलत्या एक तरुण मुलाचा एवढा वाईट अंत झालेला झालेला ऐकून त्यांना काय वाटले असेल? त्यांना त्याच्या मृत शरीराला देखील पाहता आले नाही. त्या कशा असतील? कदाचित डॅड ना माहीत असेल. पण नको कोणालाही विचारण्याच्या भानगडीत न पडता आता थेट हेन्री च्या घरी जाऊया. असा विचार करत तिने ब्रेकफास्ट न करता पटकन कपडे बदलले आणि कार्व्हर ला बोलावून घेतले. कार्व्हर ने कॅरीज तयार केली आणि दोघे हेन्री च्या घरी निघाले. रस्त्यात तिला नदीकाठाकडे जाणारा रस्ता दिसला. तिकडे चटकन दुसरीकडे तोंड वळवले. काही मिनिटांच्या प्रवासानंतर ते घरापाशी पोहोचले. पण त्या दिवशी प्रमाणे आजही हेन्री चे घर बंद होते. तिला आश्चर्य वाटले. कॅरीज आणि घोड्यांच्या टापांचा, फुरफुरण्याचा आवाज ऐकून कोण आलं आहे हे बघायला कुतूहलाने हेन्री च्या शेजारच्या घरातून एक मध्यमवयीन मनुष्य बाहेर आला. त्याला पाहून व्हिक्टोरिया त्यांच्या गेट बाहेर येऊन थांबली.
" एस्क्यूज मी सर, मी आत येऊ शकते का? "
" ओह, तुम्ही मिस विल्यम्स ना ? प्लिज या"
" थँक यु, तुमचे नाव?"
" डेव्हिड, डेव्हिड रसेल"
व्हिक्टोरिया त्यांच्या घरात गेली. छोट्याशा हॉल मध्ये लाकडी सोफा आणि दोन खुर्च्या मांडल्या होत्या. दोघे दोन खुर्च्यांवर बसले.
"मिस्टर रसेल, तुम्ही त्या दिवशी हेन्री ची बॉडी तुमच्याकडे.. " व्हिक्टोरिया ला पुढे बोलवेना
" तुम्ही हेन्री साठी जे काही केले, त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानते"
" प्लिज, मिस विल्यम्स, ते माझे शेजारी होते आणि मी केलं ते काहीच नव्हतं"
" तुम्ही होते असे का म्हणालात? हेन्री ची आई? ती इथेच राहते ना अजून. मी त्यांनाच भेटायला आले होते.अजूनही त्या कशा आल्या नाहीत?"
रसेल ने आश्रयाने व्हिक्टोरिया कडे पाहीले.
" म्हणजे तुम्हाला माहीत नाही? मला वाटलं तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितले असेल"
व्हिक्टोरिया काहीच कळत नसल्याचे भाव चेहऱ्यावर घेऊन रसेल कडे पाहत राहिली. डॅड ने काय सांगितलं नसावं?
" खरंतर, त्या घटनेपासून मी घरातल्या लोकांशी अगदी गरजेपुरतं बोलतेय. इन फॅक्ट मी माझ्या रूम मधून आजच बाहेर पडलेय. कदाचित मला अजून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी याबाबत मला काहीही सांगितले नसावे. ते माझी जरा जास्तच काळजी करतात."
" असू शकेल. मिस विल्यम्स , त्या घटनेनंतर तीनेक दिवसांनी मिसेस तेरेसा चे आम्हाला एक पत्र आले. त्यांना आता या घरात, या गावात पायही ठेवायचा नाहीये. जिथे त्यांच्या मुलाला त्यांना शेवटचे भेटताही आले नाही , त्या जागेशी त्यांना काही एक संबंध ठेवायचा नाहीये. हेन्री ला जिथे पुरले तिथे येऊन तशाच त्या निघून गेल्या. त्या आता पुन्हा कधीच परत येणार नाहीत , असे त्यांनी लिहिले आहे"
" काय? तुमच्याकडे ते पत्र आहे? तुमची हरकत नसेल तर मला पाहता येईल?"
" हो, का नाही"
रसेल कडून ते पत्र घेऊन व्हिक्टोरिया पुन्हा एकदा त्याचे आभार मानून बाहेर पडली. जाता जाता एकदा तिने हेन्री च्या घराकडे नजर टाकली. तिलाही आता इकडे येण्यासारखे काहीच उरले नव्हते.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 9

व्हिक्टोरिया ने तेरेसा चे पत्र वाचले. तिच्याकडे एक लहानशी लाकडी पेटी होती. त्यात तिने आजवर तिला जपून ठेवावीशी वाटतात अशी पत्रं ठेवलेली होती. तेरेसाचे पत्र ठेऊन देण्यासाठी ती पेटी तिने बाहेर काढली . पेटी उघडताच सगळ्यात वर ठेवलेले हेन्री ने मरण्याच्या आधी तिला लिहिलेल्या पत्राचे पाकीट ठेवलेले होते. हेन्री ची शेवटची आठवण! तिने ते सहज उलटून पालटून पाहीले. उघडून पत्र बाहेर काढले, पुन्हा वाचले. पाकिटात खाली असलेली जांभळी फुलं तशीच होती, फक्त सुकून करडी पडलेली, हात लावला की चुरा होणारी. तिने पत्राचा कागद पुन्हा नीट घडी घालून पाकिटात ठेवला. ठेवताना पाकिटाच्या फ्लॅपच्या आतल्या बाजूला तिला काहीतरी जाणवलं. त्यावर तिने मागे पुढे बोट फिरवून पाहीलं तर वाळलेल्या ग्लू सारखं ते वाटत होतं. पाकीट आपल्याआधी कोणीतरी फोडलं होतं का? पण ते साहजिक होतं. पाकिटावर बाहेरून सरकारी स्टॅम्प होता आणि ते कोणासाठी आहे हेही बाहेर लिहिलं नव्हतं. डेझी काल म्हणाली तसं कदाचित मिस्टर लिटल नी ऑफिसच्या संबंधात आहे असं समजून ते पाहिलं असावं. तिला अचानक जाणीव झाली, हेन्री च्या अंत्यसंस्कारानंतर आपण तिथे परत गेलोच नाहीये. आज एकदा जायलाच हवं असं तिला वाटलं. त्याबरोबर ती निघाली. यावेळी तिने कार्व्हरला बरोबर न घेता, चालत जाण्याचे ठरवले. व्हिक्टोरिया चं घर गावाबाहेर होतं आणि नदीकाठही. घरापासून चालत जाऊन अर्ध्या ते पाऊण तासांचं अंतर होतं. पावसाच्या भुरभुरीने थोडी उसंत घेतली असली तरी त्याचा काही भरवसा नसल्याने तिने यावेळी छत्री न घेता काळा ओव्हरकोट चढवला, पावसाळी बूट घातले आणि बाहेर पडली. घरापासून दुतर्फा झाडे असलेला रस्ता पार करून ती मुख्य रस्त्याला लागली. गावाबाहेरच्या रस्ता असल्याने क्वचितच एखादे दारात लहानशी बाग असलेले छोटेसे घर दिसतहोते. रस्ता काहीसा खाचखळगे असलेला असल्याने अंदाज चुकला की पाय पडून खळग्यातले पाणी थपकन अंगावर उडत असे. बाहेरची मोकळी हवा लागल्याने तिला ताजेतवाने वाटत होते. आजूबाजूला जनावरांना घेऊन जाणारी माणसं, डोक्याला रुमाल बांधून , मळकट गाऊन घातलेल्या शेतात काम करणाऱ्या स्त्रिया, एखाद्या कुरणात गायींची दूध काढणारी माणसं अशा सगळ्या भवतालाचे निरीक्षण करत करत ती नदीकाठाकडे जाणाऱ्या फाट्यापर्यंत कधी पोहोचली तिलाही कळले नाही. पण त्या रस्त्याला लागताच तिचा मूड अखेर बदललाच. हृदयाची धडधड वाढली, घाम फुटल्यासारखा झाला. तिथूनच मागे वळावे असाही विचार तिच्या मनात आला. पण नाही, आज काही झाले तरी हेन्री ला भेटल्याशिवाय ती परत फिरणार नव्हती. आता तिला हेन्रीला पुरले त्या जागेचा उंचवटा आणि त्यावर खोवलेला क्रॉस दिसू लागला. तिकडे जाण्याआधी तिने काही जांभळी रानटी फुलं तोडली. हेन्री च्या थडग्याजवळ पोहोतचताच गुडघे टेकून बसली. काय विरोधाभास होता! तिच्या आयुष्यातले सर्वात आनंदाचे क्षण सर्वात प्रिय व्यक्तीबरोबर जिथे तिने घालवले तीच जागा तिच्या दुःखाचे अस्तित्व होऊन राहीली होती. तिने मनातल्या मनात हेन्री साठी प्रार्थना केली, जवळची फुले वाहिली आणि उठून जाण्यास निघाली. थोड्याश्याच अंतरावर दिसणाऱ्या त्या अभद्र पुलाकडे तिची नजर जाताच तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तिला आता तिकडे थांबवेना. मागे फिरून पटापट पाय टाकत ती परतीच्या रस्त्याला लागली. गर्द झाडीतून येणारे अदृश्य पक्ष्यांचे आवाज आणि डबक्याच्या साठलेल्या पाण्यात पडणाऱ्या पुन्हा सुरू झालेल्या पावसाच्या थेंबांची टिपटीप यांच्या सोबतीला असलेली कानठळ्या बसवणारी त्या एकांताची शांतता तिला जीवघेणी वाटली. पण त्या रात्री तिला बऱ्याच दिवसांनी शांत आणि गाढ झोप लागली.

...
हेन्री ला जाऊन आता दोन महिना उलटले होता. एका सकाळी नेहमीच्या वेळेत अँजेला तिचा ब्रेकफास्ट घेऊन खोलीत आली. तिची आधीची मेड डेझी गेल्या चार दिवसांपासून तब्येत बरी नसल्याच्या कारणाने रजेवर होती. अँजेला येताच व्हिक्टोरियाने तिला विचारले.
"डेझी बद्दल काही कळलं का तुला? कशी आहे आता ती?"
"नो मॅडम, तिला अस्थमा आहे एवढंच मला माहित आहे. तो तिला आधीपासूनच होता. नवरा एकटाच थोडंफार कमवणारा त्यात घरात चार मुलं, कमावण्यापेक्षा खाणारी तोंडं जास्त , पुअर सोल"
अँजेलाकडून नेहमीच विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा जास्त माहीती मिळे. डेझी चं तसं नव्हतं. कामाशी काम, जेवढं विचारलं तेवढंच उत्तर. गेल्या पाच वर्षात तिने चुकूनच कधीतरी तिच्या फॅमिलिबद्दल सांगितलं असेल, तेही चौकशी केल्यावर. तिचा नवरा कदाचित तिच्यासारखाच सभ्य, प्रामाणिक, प्रेमळ असावा. तिचे त्याच्यावर प्रेम असावे. त्याच्याबद्दल चुकून कधी विषय निघालाच तर तिच्या डोळ्यात चमक येत असे. याउलट अँजेला. तशी ही डेझी पेक्षा बरीच तरुण होती. व्हिक्टोरिया सारखीच कदाचित 19, 20 वयाची. आकर्षक दिसणारी. इथली बरीच मुलं तिच्यात इंटेरेस्टेड असले पाहीजेत. त्यापैकीच एकाने हिला ती घालून मिरवते ते हिल्स दिले असले पाहीजेत. वर बडबडी , गरजेव्यतिरिक्त चार गोष्टींबद्दल जास्तीची माहिती ठेवणारी. गॉसिप गर्ल .. हा शब्द तरी अस्तित्वात आहे का ? व्हिक्टोरियाने स्वतःशी स्माईल केलं. अँजेला च्या बोलण्याने व्हिक्टोरिया विचारातून बाहेर
" मॅडम, पण मला नाही वाटत डेझी खूप आजारी वगैरे असेल. तिला इथे काम करायचं नसावं कदाचित" अँजेला कपबशी व्हिक्टोरिया कडे देत म्हणाली. "
" हे तुला कसं कळलं आता" व्हिक्टोरियाने कुतूहलाने विचारलं.
" असंच कुठूनतरी. आपल्या गावात रुमर्स ला कमी नाही"
" येस रुमर्स. त्यामुळे त्या आपल्याकडून अजून पुढे जाणार नाहीत याची काळजी घ्यावी" तिच्या बोलण्याने जसा काही अँजेलामध्ये बदल होणार होता.
"सॉरी मॅडम. मी लक्षात ठेवेन" अँजेला ओशाळल्यागत म्हणाली.
अँजेला निघून गेली तशी व्हिक्टोरिया तिच्या सो कॉल्ड रुमर वर विचार करू लागली. डेझीची विचारपूस करायला आपल्याला तसही गेलंच पाहीजे, तिला काही पैशांची मदत करता आली तर तेही बघुयात. असा विचार करून ती तयार होऊन डेझीकडे जाण्यास निघाली. कार्व्हर च्या कॅरीज मध्ये बसून डेझी राहते त्या वस्तीत आली. इथे आजवर तिने कधीही पाय ठेवला नव्हता. एक दोन ठिकाणी कार्व्हर ने विचारपूस् करत तिचे घर शोधून काढले. व्हिक्टोरीयाने बंद दारावर नॉक केले. काही सेकंदातच आतून दार उघडण्याचा आवाज आला. ती डेझीच होती. व्हिक्टोरियाला असं अचानक आपल्या दारात पाहून ती चमकली.
"सॉरी , आय मस्ट हॅव स्टार्टल्ड यु. "
" मॅडम तुम्ही? तुम्ही इथे काय करत आहात? " डेझी एकटक पहात म्हणाली.
" तू आजारी आहेस असं कळलं, म्हणून बघायला आले"
आपण व्हिक्टोरियाला अजून दारातच ठेवले आहे हे डेझिच्या लक्षात आले.
"आय अम एक्स्ट्रीम्ली सॉरी मॅडम. प्लिज कम इन, हॅव अ सीट"
डेझीचे घर म्हणजे दोन लहानश्या खोल्यात गरजेपुरत्या थोडयाशाच वस्तूंनी थाटलेला संसार होता. हॉल मध्ये एक कोपऱ्यात काहीशा जुनाट, काही मोडक्या लाकडी खेळण्या पडलेल्या होत्या. एका बाजूला जुनी पॉलिश नसलेली बॅसिनेट होती. त्यात एक गोंडस बाळ शांत झोपलेलं होतं. व्हिक्टोरिया तिकडे पाहत आहे हे बघून डेझी म्हणाली " माय यंगेस्ट डेव्हील, पहील्या तीन मुलांनंतर ही पहिलीच मुलगी. मला वाटलं हीला तरी आमची काळजी असेल , बट नो लक"
व्हिक्टोरिया ला हसू आले . डेझी तिच्या घरात असताना केवढी मोकळी वाटतेय! तरीही आजारी असल्यामुळे असेल कदाचित, थोडीशी सुकल्यासारखी वाटत होती. डोळ्यांखाली काळ्या वर्तुळाचे अस्तित्व जाणवत होते.
" कशी आहेस तू डेझी? मला कळलं तुला बरं नाहीये"
" मी ठीक आहे. अस्थमा अधूनमधून डोकं वर काढतो. मी खूपदा दुर्लक्ष करते पण यावेळी पूर्ण बरं वाटत नाही तोवर नवऱ्याने घराबाहेर पडायचं नाही अशी सक्त ताकीद दिली आहे" डेझी म्लान हसत म्हणाली.
" तू हवी तेवढी रेस्ट घे. तुझा पगार कट होणार नाही याची काळजी मी घेते. जेव्हा तुला बरं वाटेल तेव्हा जॉईन हो"
डेझी यावर काहीच बोलली नाही.
"मॅडम तुम्ही काय घेणार ? चहा चालेल?"
" चालेल"
डेझीच्या छोटयाशा घरात व्हिक्टोरिया ला प्रसन्न वाटत होतं. ती किंवा तिचा नवरा किंवा दोघेही बरेच धार्मिक असावेत. घरात आत येताच दिसेल आशा ठिकाणी येशूला सुळावर चढवलेली मूर्ती भिंतीवर टांगलेली होती. त्याच्या पुढे एका लोखंडी अँगल वर बसवलेल्या लाकडी फळीवर साधासा पण चकचकीत कँडल स्टँड आणि त्यात बसवलेल्या पांढऱ्या कँडल होत्या. तिथेच शेजारी एका खुंटीला मध्यभागी क्रॉस असलेली माळ अडकवली होती. मूर्तीसमोरच कँडल स्टँड जवळ बायबल ची छोटीशी प्रत ठेवली होती. आपण शेवटचं कधी बायबल वाचलं होतं याचा ती विचार करू लागली. तेवढ्यात डेझी कपबशी घेऊन आली.
" डेझी, हे काही पैसे तुझ्याकडे राहूदे. उपचारासाठी कामाला येतील"
" नाही मॅडम, मी हे नाही घेऊ शकत" आत्तापर्यंत शांत वाटणारी डेझी एकदम अंगावर पाल पडल्यासारखी चमकली.
" डोन्ट वरी. हे काही फार जास्त नाहीत आणि मला परत नको आहेत."
" तसं नाही मॅडम पण मला खरंच तशी गरज नाही"
" डेझी, तुला हवं असेल तर तुझ्या पगारातुन ऍडव्हान्स देतेय असं समज"
डेझी एकदम गप्प झाली.
"काय झालं डेझी ?"
" मॅडम" पुन्हा गप्प
" बोल डेझी , काही प्रॉब्लम आहे का? तुला म्हणलंच आहे मी, तू हवी तेवढी सुट्टी घेऊ शकते"
" मॅडम, मी कदाचित पुन्हा जॉईन होणार नाही"
अँजेलाची रुमर खरी आहे तर.
"का? काय झालं? असं अचानक का ठरवलंस्?"
" बस ठरवलं. मला तिकडे काम करायचं नाही" डेझी खाली मान घालत चाचरत म्हणाली.
" हा तुझा पर्सनल प्रश्न आहे डेझी पण तू हे का ठरवलं हे मला माहिती म्हणून तरी कळायला हवं. तुझा नवरा ?"
" हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला आहे. त्यालाही मी तिकडे काम केलेलं नकोय"
व्हिक्टोरिया चा धीर संपला. खुर्चीतून उभा राहून तिने डेझीचे दंड दोन्ही हातांनी धरले.
"डेझी , प्लिज . खरं काय आहे ते सांग. तुझ्याशी कोणी तिथे मिसबीहेव्ह केलं का? तसं असेल तर मी डॅडना सांगून..डेझिने डोळे मिटले आणि एकदम म्हणाली
"हो तुमचे डॅडच, ही इज अ मॉन्स्टर, ही इज सिनर"
व्हिक्टोरिया चमकली.
" डॅड? काय बोलतेयस तुझं तुला तरी कळतंय का"
"हो मिस्टर विल्यम्स. त्यांनीच त्या इनोसंट मुलाला मारून टाकलं. तुमचा फियोन्से. हेन्री. अशा माणसाशी आम्हाला काहीही संबंध ठेवायचे नाहीयेत, हे पाप आहे" डेझी व्हिक्टोरिया च्या नजरेला नजर देत म्हणाली.
व्हिक्टोरिया ला संताप आला.
" डेझी, तू आज तुझी लिमिट क्रॉस केलीस. मी तुला काय समजत होते आणि तू.."
" मॅडम मला माफ करा. पण यातला शब्द न शब्द खरा आहे. तुम्ही खूप चांगल्या आहात मॅडम आणि तुमचे वडील तेवढेच..."
"या सगळ्याचं काय प्रूफ आहे तुझ्याकडे डेझी?" व्हिक्टोरिया चिडून म्हणाली.
" माझा नवरा बेन डिटेक्टिव्ह ऑफिस मध्ये त्याच्या मित्राला सोडवायला गेला होता. त्याने दारू पिऊन त्याच्या कामाच्या ठिकाणी गोंधळ केला म्हणून त्याला जेल मध्ये त ठेवलं होतं. त्याने हे प्रकार खुपवेळेस केले आहेत म्हणून यावेळी ते त्याला सोडयला अजिबात तयार नव्हते. त्यांनी माझ्या नवऱ्याला ही बाहेर हाकलून दिलं. त्याने त्यांच्यापुढे खूप विनंती केली, पण दंडाची रक्कम मिळाल्याशिवाय ते त्याला सोडेचनात. मध्यरात्र झाली होती. शेवटी बेन घरी आला. आमच्या जवळ आम्ही काही पैसे साठवले होते त्यातले पैसे घेतले, मी नाही म्हणत असताना ही. पण तो पुन्हा गेलाच. तिथे पोहोचला तर स्टेशन मध्ये एका असिस्टंट शिवाय तिथे कोणीही नव्हते. त्याला ऑफिस च्या मागे बोलण्याचे काही आवाज आले. तिकडे जाऊन पाहतो तर ऑफिसपासून थोड्याशा अंतरावर दोन डिटेक्टिव्हस् खुर्च्यांवर बसून ड्रिंक करत होते. बेन थोडासा जवळ गेला तर त्याला तुमचे नाव ऐकल्यासारखे वाटले. कुतूहलाने तो एका झाडाआड उभं राहून ऐकू लागला. हेन्री हे नाव आता गावात जवळपास सगळ्यांना ठाऊक आहेच. पुढे बेन ने जे ऐकले त्याप्रमाणे हेन्रीला चार दिवस बाहेरगावी पाठवले गेले होते ते कामासाठी नसून त्याला तिथे मिस्टर विल्यम्स ने सांगितल्याप्रमाणे व्हिक्टोरियाशी ठरलेले लग्न मोडून, गाव सोडून कायमचा निघून जाण्यासाठी टॉर्चर केले गेले. तो काही केल्या ऐकेना. शेवटी त्याच्या आईला मारण्याची धमकी दिली तेव्हा त्याने मान्य केले. तरीही शेवटी त्याच्या आईचा खून केला गेला आणि त्यालाही संपवून टाकण्यात आले. तो पाण्यात पडला नव्हता, त्याला मारून तिथे टाकण्यात आले होते. इट वज अ मर्डर!
" हे सगळं खोटं आहे, माझे डॅड माझ्याशी असे कधीच वागू शकत नाहीत." व्हिक्टोरीया ओरडत म्हणाली. तिच्या आवाजाने बाळ जागे होऊन कुरकुरायला लागले.
"बेन ने जे काही ऐकले त्यावर त्याचा आणि माझा पूर्ण विश्वास आहे. मॅडम मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटते. तुम्ही माझ्यासाठी इथे आलात त्याबद्दल मी खूप आभारी आहे . माझी नोकरी सोडून, तुम्हाला खोटं सांगून मला काय मिळणार आहे? माझी फक्त तुम्हाला एक विनंती आहे. बेन ने कोणालाही ही गोष्ट कळू देऊ नको असे प्रॉमिस माझ्याकडून घेतले होते. काहीही झालं तरी आमच्यासारख्या गरीब माणसांचं यात नाव येऊ देऊ नका. आम्ही कायमचे उध्वस्त होऊ"
व्हिक्टोरिया च्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती वेड लागल्यासारखे डेझी कडे नुसतीच पहात राहीली.
"मॅडम प्लिज.. आय बेग यु" डेझी रडकुंडीला येत म्हणाली.
काहीही न बोलता व्हिक्टोरिया तडक त्या घरातून बाहेर पडली.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 10

घरी पोहोचल्यानंतर व्हिक्टोरिया विल्यम्स ला स्टडी हॉल , रूम, घरात सगळीकडे शोधू लागली. शेवटी तिने घरातल्या नोकर माणसांना विचारल्यावर तो कुठल्याशा दौऱ्यावर गेलाय आणि रात्रीच परतेल असं तिला कळालं. या वेळेत तिला शांत बसवले नाही. ती पुन्हा हेन्री च्या घराकडे गेली. जवळ तेरेसा चे पत्र होतेच. शेजारी रसेल्स च्या घराचे दार ठोठावले. आतून एक वेगळाच माणूस बाहेर आला.
" मला डेव्हिड रसेल यांना भेटायचं आहे"
तो माणूस प्रश्नार्थक नजरेने व्हिक्टोरिया कडे पहात राहीला.
" तुम्ही कोण?"
"मी मिस व्हिक्टोरिया विल्यम्स. प्लिज माझं खूप अर्जंट काम आहे. ते आहेत का घरात? "
"तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझं नाव आर्थर रसेल आहे, डेव्हिड नावाचं कोणीही आमच्या घरात राहत नाही"
आधीच एकामागून एक धक्के बसल्यामुळे व्हिक्टोरियाचे डोके भणाणले होते. आता तिचे पेशन्स संपले. ती त्या माणसाला जवळजवळ ढकलत आत शिरली.
"हेय, काय करताय तुम्ही"
आत जाऊन तिने सगळ्या खोल्या तपासल्या, पण तिला भेटलेला डेव्हिड कुठेच नव्हता.
"झालं समाधान. मी सांगतोय ते ऐका आता. इथे कोणीही डेव्हिड राहत नाही, इन फॅक्ट माझ्या नातेवाईकांत कोणीही डेव्हिड नाही. समजलं?"
"मिस्टर आर्थर. हे पत्र इथे राहणाऱ्या डेव्हिड रसेल्स कडून मला मिळालं. इथे, इथे बसून आम्ही बोललो, आणि तुम्ही म्हणताहात तो माणूसच अस्तित्वात नाही? हे कसं होऊ शकतं. मला वेड लागलंय असं तुम्हाला वाटतंय का?"
" हे बघा मिस विल्यम्स, मला तशी शंका येण्याआधी तुम्ही इथून निघून जा नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल"
"पण मिस्टर रसेल्स.."
"प्लिज, तुम्ही आता निघा, मी शेवटचं सांगतोय"
व्हिक्टोरिया नाईलाजाने तणतणत तेथून बाहेर पडली.
हे पत्र, डेव्हिड रसेल हा सगळाही बनाव होता? आत्तापर्यंत डेझी च्या कुठल्याच वाक्यावर मला विश्वास बसला नव्हता.माझ्या मनातली भीती खोटी ठरवण्यासाठी मी इथे पडताळणी करायला आले होते. पण अखेर तीच खरी ठरली. हे काय घडतंय माझ्याबरोबर? डॅड, का केलं तुम्ही हे? हेन्री च्या जाण्याने जेवढं दुःख मला झालं त्यापेक्षा कैक पटींनी आज मला त्रास होतोय. काय खरं काय खोटं, कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाहीये. अँजेला? डेझी? डेव्हिड? आर्थर? डॅडी? मी स्वतःवर तरी विश्वास ठेवावा का? की मलाच सगळे भास मलाच होताहेत.
व्हिक्टोरिया तशाच नादात घरी आली तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. ती घरी आली तेव्हा विल्यम्स समोरच उभा असलेला दिसला.
" विकी बेटा, मी तुझीच वाट पाहत होतो, कुठे गेली होतीस?" विल्यम्स नेहमीसारखा उत्साहात बोलला.
व्हिक्टोरिया चा भावनांचा कडेलोट झाला.
" बास, बास करा ही नाटकं, किळस येतेय मला तुमची " व्हिक्टोरिया चा आवेश पाहून विल्यम्स च्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो व्हिक्टोरियाच्या जवळ येउ लागला.
"विकी, काय झालं ? काय बोलतेयस?"
"बास म्हणलं ना.. व्हिक्टोरिया एवढ्या जोरात ओरडली की घरातली सगळी नोकरमाणसं बाहेर येऊन काय झालंय ते पाहू लागली.
" तुमच्या तोंडातून नाव ही नकोय मला माझं." व्हिक्टोरिया चा चेहरा लालेलाल झाला. केसांपासून ते नखांपर्यंत सर्वांग थरथरू लागले.
डोळ्यांतुन अश्रू ओघळू लागले.
"मान्य आहे मला मी खूप हट्टीपणा, बालिशपणा केला आमचे लग्न ठरावे म्हणून. पण मी तो माझ्या डॅड कडं केला. मला माहीत होतं तेव्हाच तुम्ही ते मान्य कराल. पण मी मोठी झालेय डॅड, मी काय निर्णय घेतेय ते मला माहीत होतं. हेन्री ला माहीत होतं. माझी तयारी होती कष्ट सोसायची. हेन्रीने ही वेळोवेळी मला तशी जाणीव करून दिली होती. तुम्हाला अजिबात मान्य नव्हतं तर तुम्ही मला शिक्षा द्यायची होती, हाकलून द्यायचं होतं घरातून. तुम्ही त्या साध्या, सभ्य मुलाला टॉर्चर केलं, तेवढं कमी होतं की काय तुम्ही त्याला जीवानिशी मारूनच टाकलं? त्याची ती गरीब आई? तिलाही तिची काही चूक नसताना त्याची हकनाक किंमत चुकवावी लागली. आणि मी, मी ही तेवढीच गुन्हेगार होते या सगळ्यात, मला मात्र मागे या नरकात जिवंत ठेवलंत? काय मिळवलंत डॅड तुम्ही हे करून?
व्हिक्टोरिया धाय मोकलून रडू लागली. विल्यम्स ला आता दिखावा करून उपयोग नाही हे कळून चुकले.
" मी मोडून गेले होते डॅड, हेन्री चा तो तसा विद्रुप चेहरा पाहून. कित्येकदा जगण्यात अर्थ नाही असं वाटून मनात नाही नाही ते विचार आले. आपणही द्यावं स्वतःला त्या प्रवाहात झोकून असं वाटलं. पण त्या त्या वेळी मला तुम्ही दिसायचात डॅड. मी गेल्यावर तुम्ही एकटे पडाल, मला एवढा जीव लावणारे, माझ्या हट्टासाठी मनाविरुद्ध तडजोड करणाऱ्या माझ्या डॅड चं कोणीच राहणार नाही असा विचार करून मी मनावर संयम ठेवला. पण तुम्ही राक्षस होतात, राक्षस, देवपणाच्या बुरख्याखाली !माझ्यापुढे सत्य कधीच येणार नाही असं कसकाय वाटलं तुम्हाला? इतकी मूर्ख वाटते मी तुम्हाला?"
"विकी मला .."
"इनफ डॅड. मला माझे नावही तुमच्या तोंडात नकोय. " व्हिक्टोरिया आता दमली होती. तिच्या आवाजाची तीव्रता कमी झाली. स्वतःचे भिजलेले गाल तिने पुसून काढले.
"आजपासून आपला संबंध संपला. माझे डॅड माझ्यासाठी कायमचे मेले. मी निर्णय घेतलाय.आज हे घर मी कायमचं सोडून जातेय. आणि हो तुमच्यात जरा तरी माणुसकी शिल्लक असेल ना, तर मला शोधायचा, मला पुन्हा आणायचा , प्रेमाने, बळजबरीने, कुठलेही घाणेरडे राजकारण करून मला इकडे येण्यास भाग पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करणार नाहीत. तुमच्याकडे पैसे आहे, माणसं आहेत, प्रतिष्ठा आहे आणि अशा गोष्टी करणं तुम्हाला सहज शक्य आहे हे मला आता चांगलंच माहिती झालंय. पण इथून पुढे माझं जे काही होईल, त्याला मी जबाबदार. तसही मी जे काही भोगलय त्यापेक्षा वाईट या जगात आता अजून काहीही नसेलंच. यापुढे माझ्या कुठल्याही बाबतीत तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही. आणि जर मला तशी कुणकुणही लागली तर मी त्याच क्षणी स्वतःला संपवून टाकेन. मला आता जगायचं आहे. मला तुम्हाला जगू द्यायचं असेल तर तुम्ही एवढं कराल."
व्हिक्टोरिया जिन्याकडे वळता वळता पुन्हा थांबली.
" एक गोष्ट मी माझ्याकडूनही स्पष्ट करते. तुमच्याबद्दल माझ्या मनात आता कसल्याही भावना उरणार नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला अटक करवेन, शिक्षा मिळवून देईन, तुमच्यावर सूड उगवेन तर तसं काहीही होणार नाहीये हे ध्यानात असू द्या. कुठल्याच प्रकारे आता मला तुम्ही माझ्या आयुष्यात नको आहात. "
व्हिक्टोरिया मागे वळून विल्यम्स च्या डोळ्यात पहात म्हणाली.
" ज्या माणसाची पत्नी, मुलगी मेली आहे, मुलगा असून नसल्यासारखा आहे , जो माणूस या वयात चारही बाजुंनी या भल्या मोठ्या जगात एकटा पडलाय त्याला मी अजून काय शिक्षा देणार? तो स्वतःच शिक्षा भोगतोय"
विल्यम्स स्वतःचं डोकं धरत सोफ्यावर बसला.
व्हिक्टोरिया जिन्यावरून चढत तिच्या रुम मध्ये गेली दहा मिनीटात ती हातात एक गाठोडं घेऊन आली. दारातून बाहेर जाताना तिने मागे वळूनही पाहीले नाही. त्या गाठोड्यात तिने जपून ठेवलेली पत्र आणि तिच्या वेडिंग ड्रेस ची पेटी याशिवाय काही नव्हते.

...
पावसाची सततची रिपरिप चालुच होती. व्हिक्टोरिया अखंड चालत राहीली. चीड, करुणा, दुःख, गिल्ट सगळ्या भावनांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं होतं. एका हाताने गालावर ओघळणारे अश्रू पुसत, हुंदके देत ती कितीतरी वेळ चालतच होती. पायपीट करत ती गावापासून खूप दूरवर आली होती. रात्रीची वेळ होती. गाव केव्हाच संपून गेल्याने दिवे, मशाली , स्ट्रीट लाईट्स , उजेडाच्या लहानसहान खुणा सगळे मागे पडले होते. पुढे मोकळा रस्ता संपून दाट झाडी सुरू झाली होती. गर्द हिरवा , काळा रंग एकमेकांत मिसळून अंधार आणखी दाटत गेला तशी तिला चिंता वाटू लागली. रातकीडयांनी सूर धरला होता. अधून मधून वाळलेल्या पाचोळ्यावर कोणाचे तरी पाय पडून तो कुस्करला जाण्याचे आवाज येत होते. चिखल, दगड धोंडे, झाडांच्या आडव्यातिडव्या फांद्या सगळ्यांना कापत ती चालत होती. दिवसभरात एकानंतर एक घडलेल्या घटनांनी तिच्या मनाला, मेंदूला प्रचंड श्रम पडले होते. ती अतोनात दमली होती. पोटात भुकेची जाणीव होऊ लागलीहोती, पाय दुखू लागले होते. झाडीतून मार्ग काढताना सतत सतर्क राहून चालावे असल्याने तिच्या मेंदूवर अतिरिक्त ताण पडत होता. या सगळ्या ताणाने शेवटी टोक गाठले आणि ती ग्लानी येऊन खाली वाळलेल्या पण पावसाने ओलसर झालेल्या पाचोळ्याच्या खचात कोसळली.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 11

व्हिक्टोरीयाने डोळे किलकिले करून पाहीले तेव्हा ती कुठल्याशा घरात होती. जाग आली तशी ती पटकन उठून उभा राहीली. आजूबाजूला पाहु लागली. ते एक लहानसे, जुनाट पण मजबूत दगडी घर वाटत होते. भिंतीतल्या एका कोनाड्यात कंदील ठेवलेला. चौकोनी आकाराचा, काचेच्या भिंती असलेला. त्याचाच मंद, मरगळलेला प्रकाश त्या खोलीत पसरलेला होता. तिच्या लक्षात आलं की घरात सामान असं काही नाहीच. एका भिंतीत जमिनीलगत जळून राख झालेली लाकडं असलेली अगदी लहानशी फायरप्लेस होती एवढंच. नक्की कोणती वेळ असावी ही? रानातला रस्ता लागला तेव्हा रात्र झाली होती हे तिला आठवले, आपण कोसळून खाली पडलो होतो हेही आठवले. आता काय आहे? सकाळ? रात्र? हे घर जणू काळाच्या परिघाच्या बाहेर होतं. जिथे काळ एकाच जागी थांबलेला असतो किंवा अस्तित्वातच नसतो. घरात कसलीशी विचित्र, अस्वस्थ, कोंदट, गुदमरून टाकणारी जाणीव होती. कालचे डेझीच्या घरचे पवित्र , प्रसन्न वातावरण तिला आठवले. कुठल्या गूढ, अनोळखी, अभद्र घरात आलो आहोत, कसे आलो? कोणी आणले असावे? व्हिक्टोरीया ला विचार करून धडकी भरली. तेवढ्यात तिला जवळच्या गाठोड्याची आठवण आली. तिने खाली पाहीले, तिच्या शेजारीच ते पडून होते. तिने ते चटकन उचलले आणि इथून आता लवकरात लवकर काढता पाय घ्यावा असा विचार करत ती बाहेर पडण्यासाठी दरवाजा शोधू लागली. तिला दरवाजा दिसेनाच, साधी खिडकीही नाही. ती गोंधळून गेली. तिच्या श्वासांची गती वाढली, ह्रदयाचे ठोके कानापर्यंत ऐकु येऊ लागले.
" आय होप यु स्लेप्ट नाईस अँड वेल"
अचानक आलेला किनरा, घोगरा आवाज ऐकून व्हिक्टोरीया चे हृदय एका क्षणासाठी छातीतून बाहेर पडले.
तिने झटकन मागे वळून पाहीले.
ती अत्यंत कृश म्हातारी बाई होती. वय सहज नव्वदीच्या पुढे असावे. अंगकाठीच्या मानाने जरा जास्तच उंच पण कंबरेत काहीशी वाकलेली होती. अंगात गुडघ्यांच्या खालपर्यंत आलेला , खालच्या घोळापाशी लेस असलेला जुनाट , काळा गाऊन आणि कोपरापर्यंत असलेल्या त्याच्या बाह्यांतून बाहेर आलेले सुरकूतलेले, लांबसडक हात म्हणजे जणू लांबलचक हाडंच खांद्यापासून लटकत होती. तशाच लांबसडक बोटांची , मंद हालचाल करताना बोटं प्रत्येक पेरांत वाकत होती. नखे बरीच वाढलेली, काहीशी तुटलेली, पिवळी काळी पडलेली दिसत होती. निस्तेज, पांढऱ्याफटक चेहऱ्यावर गालांची हाडं वर आलेली, मंद हसताना विलग झालेल्या काळसर ओठांतून दिसणारे नखांच्याच रंगाचे दातांचे तुकडे. डोक्यांवर जवळजवळ टक्कलच पण जेवढे शाबूत आहेत तेवढया, कंबरेपर्यंत रुळणाऱ्या पांढऱ्या केसांच्या पातळ दोऱ्या. तिच्याशी पुन्हा नजरानजर होताच खोबणीत बसवलेले करडे भेदक डोळे पाहून व्हिक्टोरीया च्या अंगावर काटा आला. आजूबाजूला काहीसा अंधार आणि कंदिलाच्या प्रकाशाची एक तिरीप म्हातारीच्या चेहऱ्यावर पडून ती अजूनच भयानक दिसत होती.
व्हिक्टोरीयाने मनातली भीती दाबत ओढून ताणून आवाजात कठोरपणा आणला.
"कोण तुम्ही? आणि मी इथे कशी आले"?
ते ऐकताच म्हातारी पुन्हा मंद हसत दोन पावले पुढे आली तशी व्हिक्टोरीया मागे सरकली.
" अरे, मला बघून तू घाबरली दिसतेयस. घाबरू नको. म्हातारपण प्रत्येकवेळी दयाळू असतंच असं नाही. "
व्हिक्टोरीया तिच्याकडे बघत राहीली.
"ही तर माझी नेहमीची जागा आहे. तू काय करतेस इथे? "
म्हातारी बोलता बोलता व्हिक्टोरीयाच्या आणखी जवळ आली.
"तुझ्यासारख्या सुंदर तरुण मुलीने असं रानावनात एकटं फिरू नये" असं म्हणत आपल्या किडकिडीत हाताचा पंजा व्हिक्टोरीयाच्या विस्कटलेल्या, मातीने काहीश्या मळलेल्या सोनेरी , रेशमी केसांवर फिरवत, केसांचा एक भाग हातात घेऊन दीर्घ श्वास घेत त्याचा सुगंध नाकात भरून घेतला.
व्हिक्टोरीयाला म्हातारीच्या अंगातुन येणाऱ्या दर्पाने भडभडून आले.
ती झटकन मागे सरकली.
" म्हातारी आहे गं. रोज रोज कुठे जाणार अंघोळ करायला, फार श्रम होत नाहीत मला आता. " म्हातारीने जणू काही तिच्या मनात डोकावून पाहीले होते.
" काही वेळापूर्वीच तू माझ्या घरासमोरच पडलेली दिसली. मी तुला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला. तू डोळे उघडलेस. मी कसाबसा आधार देत तुला उठवले पण तू ग्लानीतच होतीस. तशीच इकडं चालवत तुला घेऊन आले. आल्यानंतर तू झोपूनच राहीली. आता कुठे मध्यरात्र उलटून गेली आहे. तू पहाटेपर्यंत इथेच थांब, उजाडलं की जा. रात्री या रानातून एकट्याने जाणं धोक्याचं आहे" म्हातारी किनऱ्या, गूढ आवाजात बोलली.
" नाही, मला लांब जायचं आहे, माझे काका राहतात शेजारच्या गावात, तिकडेच निघाले आहे" व्हिक्टोरीयाने मनाला येईल ते सांगितले.
म्हातारी तिला खालपासून वरपर्यंत न्याहाळत म्हणाली
" चांगल्या घरातली दिसतेयस. घरातून पळून तर आलेली नाहीस ना?" म्हातारी मिश्किलपणे म्हणाली.
व्हिक्टोरीया यावर गप्प राहीली. पण तिच्या पोटाने मोठ्याने गुरगुरल्याचा आवाज केला.
" आह, उपाशी दिसतेस. थांब मी काहीतरी खायला आणते. " म्हणत म्हातारी आतल्या खोलीच्या दाराकडे वळाली.
"नको नको. मला काहीच नकोय"
" माझ्याकडे फार काही नाही, इथे रानात काही फळं मिळतात, त्याचं सूप बनवून देते" म्हातारीचा अवतार बघून व्हिक्टोरीया ला तिच्या हातचं काहीच खाण्याची इच्छा नव्हती. पण तिला आसरा दिल्यामुळे म्हातारीबद्दल तिला थोडीशी आस्था वाटू लागली होती. ही दिसते भयानक पण मायाळू वाटते. पोटातही प्रचंड खड्डा पडला होता. थोडं काहीतरी पोटात ढकलावं आणि निघावं असं तिला वाटलं.
म्हातारी तिच्या शांत बसण्याला होकार समजून आत निघून गेली. व्हिक्टोरीया सहज इकडे तिकडे बघू लागली तर तिला चक्क तिच्या मागच्या भिंतीवर दार दिसले. हे कसं शक्य आहे? आता थोड्यावेळापूर्वीच मी शोधलं तर हे कसं दिसलं नाही? मीच नीट पाहीलं नसावं कदाचित. तिने दारापाशी जाऊन कडी उघडली. दार करकरत उघडले आणि आतल्या शांततेला छेदत बाहेरच्या धो धो पावसाचा आवाज आत शिरला. बाहेर एवढा काळोख की कुठे जमीन कुठे संपतेय नि आकाश कुठे सुरू होतंय हेच कळत नव्हतं. तिने पटकन दार लावून घेतले तशी पुन्हा सगळं शांत झालं. दार लावून मागे वळून पाहते तोच ती पुन्हा जोरदार दचकली.
एक लाकडी वाडगा हातात घेऊन म्हातारी एकटक तिच्याकडे पाहत उभी होती. तिने पाहताच म्हातारीच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.
" तूला पाहून मला माझ्या तरूणपणाची आठवण येते. बरं घे, हे पिऊन घे"
वाडग्याच्या गरम स्पर्शाने व्हिक्टोरीयाला बरे वाटले. लालसर रंगाचे घट्ट सूप होते ते. पिण्याआधी तिने त्याचा वास घेतला. काहीसा कडवट, काहीसा चमचमीत असा वास होता. व्हिक्टोरीयाच्या पोटातला अग्नी भडकला. वाडगा तोंडाला लावून ती ते घटाघट पिऊ लागली. ही चव तिला पूर्णपणे अनोळखी, विचित्र होती पण भुकेच्या सपाट्यात तिला ते रुचकर लागत होते. तिला अजून थोडंसं मागून घेण्याचा मोह झाला पण तिने तो विचार तिने टाळला. व्हिक्टोरीया थोडीशी रिलॅक्स झाली होती. तिने म्हातारीला तिच्याबद्दल विचारले.
" हे बघ, माझं कोणीच नाही. आणि एक सांगते, जगात कोणीच आपलं नसतं. आपण जगतो ते आपल्या इच्छांसाठी, महत्वकांक्षेसाठी. मी इथवर कशी आले? याच दोन गोष्टींमुळे. "
नुकत्याच आपल्यासोबत घडून गेलेल्या घटना आणि म्हातारीचे शब्द दोन्हींवर व्हिक्टोरिया विचार करू लागली. तिला अजून काही विचारायचे होते पण तिला आता झोप अनावर होऊ लागली होती. तिने म्हातारीची परवानगी घेऊन तिथंच जमिनीवर अंग टाकले आणि थोड्या वेळात तिला गाढ झोप लागली.

व्हिक्टोरीयाची झोप चाळवली तेव्हा तिच्या हाताला प्रचंड आग होत होती. तिने डोळे चोळत हात उपडा करून पाहीला. मनगटाच्या खाली कुठल्याशा तीक्ष्ण वस्तूने कोरलेले काहीतरी कोरलेले होते. एक गोल आणि त्यात गोलाला टोकांनी स्पर्श करणारी चांदणी असे ते चिन्ह होते . त्यातून अजूनही थोडेसे रक्त ओघळत होते. तिच्या डोळ्यावरची झोप खाडकन उडाली. तेवढ्यात तिला हळुवार गुणगुणन्याचा आवाज ऐकू आला. वर पाहीले तर कोणीतरी बाई पाठमोरी उभी होती. तिच्या अंगात स्वच्छ पांढरा, सोनेरी फुलांची दाट एम्ब्रॉयडरी असलेला, पाठीवर खोल गळा असलेला सुंदर गाऊन होता. त्या गळ्यातून त्या कृश बाईच्या दोन्ही खांद्याची त्रिकोणी हाडं आणि कंबरेपर्यंत पोहोचलेली मणक्याची गोल गोल हाडांची माळ स्पष्ट दिसत होती. तिने आजूबाजूला पाहीले. तिचे गाठोडे उलगडलेले होते. त्यातली लाकडी पेटी रिकामी होती. त्या कृश म्हातारीने घातलेला गाऊन म्हणजे तिचा वेडींग ड्रेस होता. तिला प्रचंड संताप आला. ती जागेवर उठून उभा राहीली.
" तुझी हिम्मत कशी झाली माझ्या वस्तूला हात लावायची? काढ तो ड्रेस. आत्ताच्या आता मी इथून निघून जाते. आणि हे काय आहे माझ्या हातावर? तू केलंस हे?"
तो ड्रेस म्हातारीच्या उंचीला थोडाफार व्यवस्थित झाला असला तरी रुंदीला सगळ्या बाजुंनी सैल होता. दोन्ही खांद्यावरच्या बाह्या त्या त्या हातांनी वर ओढत ती पुढे पाय टाकू लागली.
" काढू म्हणतेस . हे घे"
म्हातारीने हातांनी खांद्यावर ओढून धरलेला ड्रेस खाली सोडून दिला. तो जड ड्रेस म्हातारीच्या अंगावरून घरंगळत जमिनीवर पडला. म्हातारी आता पूर्ण नग्न होती. व्हिक्टोरीयाला काहीच सुचेना. तिने तिची नजर दुसरीकडे वळवली. म्हातारी चालत तिच्या जवळ आली.
" खूप वर्ष उलटली. पाचशे, सहाशे? मी मोजनंच सोडून दिलंय. आता बास . मी थकून गेलेय.. मला आता शांती हवी आहे. या कामातून मला कायमची मुक्तता हवी आहे. "
" कसलं काम? काय बरळतेस तू?"
म्हातारी आता गंभीर झाली होती. तिचे करडे भेदक तिने डोळे व्हिक्टोरीयावर रोखले.
" तुझ्या हातावर ते काय आहे माहीत आहे? सेटन्स साइन. सैतानाचा महामहिम, पाताळाचा राजा त्याने निवडले आहे तुला आणि त्याबदल्यात मला स्वातंत्र्य बहाल केले आहे त्याने."
" यु डॅम डिसगस्टिंग वुमन. डोकं फिरलंय का तुझं" व्हिक्टोरीया चा संताप अनावर झाला. तिने म्हातारीला जोरात ढकलले. खाली जमिनीवर पडलेला तिचा ड्रेस उचलला. गोळा करून पेटीत ठेवला . पेटी पुन्हा गाठोड्यात बांधली आणि दाराच्या दिशेने वळाली. पण पुन्हा तिथे दारच नव्हतं. तिने म्हातारीकडे पाहीले. म्हातारीने तिच्या पांढऱ्या विरी गेलेल्या भुवया उंचावल्या आणि जोरजोरात भेसूर हसू लागली. व्हिक्टोरीया चे हातपाय गळाले. उसनं अवसान आणून ती म्हातारीच्या दिशेने गेली , तिचा गळा धरला.
" यु ब्लडी विच. हे तू काय चालवलंयस ?. कुठेय दरवाजा? सांग, नाहीतर मी तुला मारून टाकेन"
म्हातारी तरीही हसतच होती. व्हिक्टोरीया ने गळ्यावर धरलेली पकड अजूनच मजबूत केली. मग दोन्ही हातांनी आवळू लागली. तरीही म्हातारीवर त्याचा परिणाम झाला नाही. तिने आता हसणे थांबवून व्हिक्टोरियाला जोरात ढकलले. व्हिक्टोरीया खाली पडली. धडपडत उठून ज्या भिंतीच्या जागी दरवाजा होता तिथे जाऊन भिंतीवर थपड्या मारू लागली. मोठ्यामोठ्याने मदतीसाठी हाका मारू लागली . रडू, ओरडू लागली. शेवटी कोलमडून त्याच भिंतीला पाठ घासत पायांना पोटाशी आवळत खाली बसली.
म्हातारी तिच्या जवळ आली.
" मूर्ख आहेस तू . ही खुश होण्याची गोष्ट आहे, आनंद साजरा कर. काय ठेवलंय त्या माणसाच्या जन्मात? काय करणार होतीस तू पळून जाऊन? वाटेत संपवलं असतं तुला एखाद्या हिंस्र प्राण्याने. किंवा एखादया क्रूर माणसाने स्वतःची भूक भागवण्यासाठी वापरून फेकून दिलं असतं तुला, शरीरावर असंख्य ओरखडे ओढून. तुझं प्रेम होतं ना त्या मुलावर? कुठेय तो आता? आणि झालं असता तुमचा संसार यशस्वी, नंतर काय? तू देऊ शकली असतीस खात्री की पुढे काहीही वाईट न घडता तो टिकुनच राहीला असता? "
व्हिक्टोरीया म्हातारीला दूर ढकलत जमिनीवर अंग टाकून रडू लागली .
" तुझा तो जन्मदाता बाप. स्वतः गळा घोटला ना त्याने तुझ्या सुखाचा, तुझ्या आयुष्याचा ? "
व्हिक्टोरीयाने रडतच कुतूहलाने म्हातारीकडे पाहीले
" एवढं सगळं होऊन तुला प्रश्न पडलाय की मला हे कसं कळलं? तू रानात बेशुद्ध पडली होती ती तुझी नियती होती आणि हे होणार हे मला पूर्वीपासून माहीत होतं. तुला काय वाटलं ? तुझे वडील वागले तसा माणूस अचानक का वागतो? त्याच्या मनात एवढं क्रौर्य कसं निर्माण होतं? " म्हातारीने तिच्या हातावर कोरलेल्या लालभडक चिन्हावर बोट ठेवले. "हा आहे या सगळ्या खड्ड्यात लोटणाऱ्या भावनांचा निर्माता. तो तुम्हाला भाग पाडत नाही पण संधी देतो. कसं वागायचं ते तुम्ही ठरवता. विचार कर हे असं बाहुलं बनून राहायचंय तुला ? "
मी तुला ओळखलय. तुझ्यात ती क्षमता आहे. माझा, याचा वारसदार होण्याची. माझ्यावर विश्वास ठेव. "
म्हातारी आता उठली
" नसेलच मान्य तरी तुला पर्याय नाही. तुझी निवड झालेली आहे. हीच तुझी नियती आहे आता. या मर्त्य, कमजोर , कमनशिबी माणसांच्या आत्म्यांचा सौदा करायचाय तुला आणि बदल्यात मिळवायचंय भरपूर आयुष्य, अदभुत शक्ती. तुला कोणाला कायमचं उध्वस्त करायचंय? कोणाचा सूड घ्यायचाय? बेशक कर. तुला अडवणारं, अडवू शकणारं आता कोणी नाही. तू जे प्यायलंस ना मघाशी सूप म्हणून?दॅट वज पार्ट ऑफ द रिच्युअल. त्याने त्याचं काम केव्हाच सुरू केलंय"
हे सगळं ऐकून मघापासून अखंड रडणाऱ्या व्हिक्टोरीयाला भडभडून आलं. ती पळत आतल्या घरात गेली, दोनदा , तीनदा उलटी केली. तिथेच बाजूला काही वेळ ती स्तब्ध बसून राहीली.
तिला आता एकाएकी शांत वाटू लागलं होतं.
तिच्या शरीरात, मनस्थितीत, स्वभावात होऊ लागलेले बदल तिला जाणवू लागले होते. तिने डोळे पुसले. बाहेरच्या घरात आली. ती कृश म्हातारी आता तिथे नव्हती. तिचं गाठोडं आणि लाकडी पेटी तशीच खाली पडलेली होती. समोरच्या भिंतीत पुन्हा दार दिसु लागलं होतं. पण तिला आता त्याचा काही फरक पडणार नव्हता. हळवी, नाजूक, vulnerable व्हिक्टोरीया आता पूर्ण बदलली होती.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 12 (शेवटचा भाग)

......
क्रिस्टन चा फोन खणखणला. आरशा समोरून ती तशीच तिच्या पर्सकडे गेली. जेसीका चा फोन होता.
" क्रिस्टन, गुड न्यूज. Carry's मधून मला फोन आला होता. तुझा ड्रेस आजच मिळतोय. इन फॅक्ट आताच. मी तिकडंच आहे आता. ड्रेस पीक केलाय आता बिलिंग च्या लाईन मध्ये आहे. आधी थेट घरीच येऊन सरप्राईज देण्याचं प्लॅन..
" जेसीका, ठेऊन दे तो ड्रेस. मला नकोय."
" काय? क्रिस ही जोक करण्याची वेळ नाही, चल बाय मी बिल पे करते"
" मी सिरीयस आहे. ठेऊन दे तो ड्रेस. मला नकोय. " क्रिस्टन थंड आवाजात शेवटचं बोलून फोन ठेवला.
क्रिस्टन ने असं बोलणं अर्ध्यातच तोडून टाकल्याने जेसीका वैतागली. क्रिस्टन ला अचानक काय झाले? लग्न होणार आहे म्हणून हिची कोल्ड फीट फेज सुरू झाली की काय? की डॅन शी काही भांडण झालं? क्रिस्टन अशी एकदम टोकाचे निर्णय घेणारी मुलगी अजिबात नाहीये पण. तेवढ्यात तिच्या मागे बिलिंग साठी थांबलेल्या माणसाने तिला हटकले आणि ती बाजूला झाली.
क्रिस्टन आता पुर्णपणे क्रिस्टन राहीली नव्हती. तो वेडींग ड्रेस् अंगात चढवल्यापासून ती कुठल्याशा प्रभावाखाली आलेली होती. ती भराभर चालत किचन मध्ये गेली. ड्रॉवर उघडले. त्यात दोन तीन वेगवेगळ्या आकारांच्या सुऱ्या होत्या. त्यातली सगळ्यात मोठी आणि धारदार सूरी तिने उचलली. घराच्या बाहेर पडली. गाडी घेऊन ती अंदाधून पळवत निघाली. दहाच मिनिटात ब्रेक्स चे जोरदार आवाज करत तिने गाडी एका बिल्डिंग समोर थांबवली. सूरी हातात घेतली. गेट च्या आत जाताना तिला हटकायला तिथे कोणीच नव्हतं. लिफ्ट मध्ये चढली. पाचव्या मजल्यावर थांबताच ताड ताड पाय टाकत एका दरवाज्या समोर थांबली. दाराची बेल वाजवली. काही सेकंदाने दार उघडले.
" क्रिस्टन , इथे काय करतेयस? आणि हा वेडींग ड्रेस का घालून आलीयेस? डॅनियल क्रिस्टन ला असं अचानक समोर पाहून गोंधळून गेला.
तिने घराच्या आत पाय ठेवला तसा तो आपोआप मागे सरकला.
" लग्नाआधीच नवऱ्याने त्याच्या पत्नीला वेडींग ड्रेस मध्ये पाहणं अशुभ मानतात, तेच प्रुव्ह करायला आलेय" असं म्हणत त्याला काही समजायच्या आत मागे ठेवलेला हात तिने समोर आणला आणि डॅनियल च्या पोटात ती सूरी खुपसली. बाहेर काढून दोनदा, तीनदा त्याला भोसकले. ती सूरी तिथेच टाकून ती त्याच भारलेल्या दाराच्या बाहेर पडली. गाडीत बसून गाडी चालू करतेच तोच तिने स्वतःच्या हाताकडे पाहीले. सुरीवरचे रक्त ओघळून तिच्या हातावर आले होते. ती अचानक भानावर आली. रक्त पाहून ती प्रचंड घाबरली. तिने कळले की आपण अजूनही त्याच ड्रेस मध्ये आहोत. तिने आजूबाजूला पाहीले. गाडी घेऊन आपण कधी निघालो , कुठे आलोय हे तिला कळेना. तिने खिडकीतुन बाहेर डोकावून पाहीले आणि त्याचबरोबर तिच्या लक्षात आले की ही डॅनियल ची बिल्डिंग आहे. तिला काहीतरी चुकीचं घडल्याचे जाणवले. ती पुन्हा गाडीतून उतरली, धावत लिफ्ट मध्ये चढली. डॅनियल च्या सताड उघड्या फ्लॅटसमोर उभी राहीली आणि तिच्या तोंडातून मोठ्याने किंकाळी बाहेर पडली. डॅनियल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खाली बसून ती त्याला त्या त्याला हाक मारत गदागदा हलवू लागली. पण आता उपयोग नव्हता. तो आधीच गतप्राण झाला होता.

...

क्रिस्टन जेल च्या एका अंधाऱ्या खोलीत छातीशी घेतलेल्या गुडघ्यानवर डोकं ठेऊन बसली होती. जेसीका , तिचे आजी आजोबा गेले दोनही दिवस् तिला भेटायला येऊन गेले होते. त्यांनी तिला या सगळ्या घटनेबद्दल खोदून विचारले. पण आपण हे का केले याचे कारण खुद्द क्रिस्टनलाच ठाऊक नव्हते. तिला स्वतःला कशावर विश्वासच बसत नव्हता. तिलाच या सगळ्याचे उत्तर हवे होते. ती त्यांना सतत त्या वेडींग ड्रेस बद्दल सांगत होती. पण अशा कुठल्याच प्रकारची पेटी, ड्रेस तिच्या आजी आजोबांनी आजवर पाहीली नव्हती. काही कारणांमुळे क्रिस्टन ची अचानक मनस्थिती बिघडली आहे, या निष्कर्षावर ते येऊ लागले होते आणि त्यामुळे क्रिस्टन अधिकच खचत चालली होती

"पुअर सोल. आता या क्षणी तुला माहीत नाही मी तुझ्या अवस्थेशी किती रिलेट करू शकतेय ते. मलाही माझ्या आयुष्यातलं एकमेव प्रेम गमवावं लागलं. माझ्यावर प्रेम केल्याची त्याला शिक्षा मिळाली. नंतर मला कळालं, I am cursed. त्या दिवसापासून मी अंतर्बाह्य बदलले आणि ठरवलं, Not just me, all William girls should be cursed. By me. कुठल्याशा गावात मला कोणीतरी साध्या सुध्या अवतारात पाहीलं आणि त्यांना वाटलं मी दरिद्री होऊन लोकांच्या घर ची कामं करत राहतेय कुठेतरी आणि तशीच गरिबीत आयुष्य काढत मरून गेले. सच फुल्स!
तुझी आई.. सगळ्यांना असं वाटत आलंय की तुझ्या आईने खचून आत्महत्या केली. पण असं नव्हतं. एक भला मुलगा तिच्याशी लग्न करण्यास आणि तुझी जबाबदारी घेण्यास तयार झाला होता. त्यांचा जवळजवळ निश्चय झाला आणि एक दिवस तिलाही हाच ड्रेस तिच्या घरात सापडला. तिने तो तुझ्यासारखाच त्याच्याकडे आकर्षित होऊन घालूनही पाहीला. त्या दिवसापासून मी तिचेच विकनेस वापरून तिला मेंटली टॉर्चर करायला सुरुवात केली. ती त्या मुलाची दरवेळी वेगवेगळे क्रूर प्रकार वापरून हत्या करतेय अशी स्वप्ने तिला पडू लागली. ही गोष्ट तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आणि एक दिवस कोणाकडेही हे बोलून न दाखवता तिने स्वतःला संपवले. मग काही वर्षांनी पिक्चर मध्ये तू आलीस आणि आज तू इथं आहेस. Unfortunately you are the last one. जेलसी ही खूपच घाणेरडी गोष्ट आहे, नाही का!
मी कधीही ब्राईड होऊ शकले नाही, या घराण्यातल्या कुठल्याच मुलीला मी ब्राईड होऊ दिले नाही. हो , पण आयुष्यात एकदा त्यांना जगातला सगळ्यात सुंदर ' वेडींग ड्रेस' घालण्याची संधी जरूर दिली."
व्हिक्टोरीयाने एकदा तिच्या वेडींग ड्रेस च्या पेटीवरून हात फिरवला आणि मागे वळून चालायला लागली. क्रिस्टन अजूनही गुडघ्यात डोकं घालून बसली होती!

समाप्त

संदर्भ: 2015 साली इंटरनेट सर्फ करताना एकदा प्रसिद्ध होंटेड ऑब्जेक्ट्स ची लिस्ट डोळ्यासमोर आली होती. त्यावेळी त्यात एक होंटेड वेडींग ड्रेस ही होता. त्याबाबत तिथं एक शॉर्ट डिस्क्रिप्शन असं होतं, की हा ड्रेस जिचा होता तिचं तिच्या प्रियकराबरोबर लग्न न होऊ दिल्याने प्रेमभंग झाला होता. नंतर ती घर सोडून जाते आणि गरिबीत आयुष्य काढते. आता एका म्युझियम मध्ये (हे कदाचित काँजुरिंग मधल्या जोडप्याने घेतलेलं च म्युझियम आहे) तो ठेवला आहे. ही घटना तेव्हा मला खूप interesting वाटली आणि त्यावर तेव्हाच सहज एक छोटीशी 2 किंवा 3 लहान भागांची गोष्ट पाचवीच्या इंग्लिश मध्ये लिहून माझ्याकडेच ठेवली. नंतर याच घटनेवर मला जरा डिटेल्ड गोष्ट मराठीत लिहावीशी वाटली आणि जरा पात्र, घटना, कल्पना, ड्रामा वाढवून जमेल तसा'वेडींग ड्रेस' चा घाट घातला.
मला आजच सर्फिंग करताना असं कळलं पण नक्की खात्री नाही, की नुकत्याच रिलीज झालेल्या ' ऍनाबेल कम्स होम ' मध्ये अशीच होंटेड वेडींग ड्रेस ची कन्सेप्ट आहे, ज्यात तो घातल्यावर ती तिच्या फियोंसे ला मारते. काय गंमत आहे बघा! जग लहान आहे, पृथ्वी गोल आहे वगैरे..

Keywords: 

लेख: