आमच्याकडे ४ फोल्डींग खुर्च्या आहेत, हाऊसपार्टीज ना बर्या पडतात.
पण वापरून वापरून त्यांची अगदी रया गेलेली. फारच उदास दिसायच्या.
यातलीच एक मी डेस्क साठी वापरते. काल परवा, बस्के आणि नंदिनीच्या डेस्क चे फोटो पाहिले :) दुसर्या धाग्यावर आणि म्हटलं, आपल्या होम ऑफिस चा सुद्धा जरा कायापालट करावा.
खुर्चीने सुरुवात smile
आधी मेटल पण परत स्प्रे पेंट करणार होते, पण मला ग्रे आणो कोरल हे काँबो खूप आवडतं, आणि भिंती पण फिकट ग्रे आहेत. तर ते तसच ठेवलं.
पण यांच्या जीवनात रंग ओतल्यापासून किती आनंदी झाल्यात बघा smile