हस्तकला

Nee 9th anniversary selection

तर काल माझ्या नी या ब्रॅण्डला ९ वर्षे पूर्ण झाली. दर वर्षी अ‍ॅनिव्हर्सरीला मी नवीन कलेक्शन करायचे. गेल्यावर्षी काही नवीन मार्ग दृष्टीक्षेपात होता त्यामुळे नवीन कलेक्शन केले नाही. पण मग एकानंतर एक इतक्या विविध गोष्टी घडत गेल्या आणि इतके बदल झाले आयुष्यात की नी चा नवीन मार्ग वगैरे सगळ्या गोष्टी बासनात गुंडाळून ठेवाव्या लागल्या. आता मी काम परत चालू केले आहे आणि नवीन मार्ग, नवीन कल्पना यातले काहीही सोडून दिलेले नाहीये. पण या वर्षी नवीन कलेक्शन मात्र करता आले नाहीये. त्यामुळे यावर्षी थोडी वेगळ्या प्रकारे अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करायचे ठरवले आहे.

Keywords: 

कलाकृती: 

कला कार्निवल - उमा मठकर

रिटायर होताना तुमच्याकडे एखादा छंद असेल तर मिळालेला मोकळा वेळ अगदी आनंदात जातो म्हणतात.
आणि ते किती खरंच आहे हे माझ्या आईकडे उमा महादेव मठकर हिच्याकडे बघितल्यावर लक्षात येईल.

Keywords: 

कलाकृती: 

नी उत्सवी कलेक्शन २०२१

सर्वांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सवी कलेक्शन २०२१ - दागिने
सण, उत्सव ही परंपरा असते. परंपरेला धरून अनेक गोष्टी आपण करतो त्यात सणासुदीचे स्पेशल कपडेलत्ते, दागिनेही आले. तेही पारंपरिकच असतात. पण जसेच्या तसेच नुसते अनुकरण करण्यापेक्षा परंपरांकडे नवीन प्रकारे, आजच्या काळाच्या दृष्टीकोनातून बघणे आणि त्या प्रकारे परंपरांच्यात बदल करणे हे ही गरजेचे असतेच.

Keywords: 

कलाकृती: 

सुपारीचे भटजी/बटू (रुखवत)

भाच्याच्या मौंजीसाठी रुखवत म्हणून आज सुपारीचे भटजी/बटू केले.
पहिल्यांदाच केले. थोडं यु ट्यूब थोडं स्वतःचं डोकं! नवऱ्याने असिस्टंट म्हणून पुष्कळ मदत केली :)
साहित्य: सुपारी, काजू, काडेपेट्या, कागद, कार्डबोर्ड, दोरा, लेस!!

IMG_20201213_215907__01.jpg

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

नी या ब्रॅण्डचा पाचवा वाढदिवस

एप्रिलमधे नी या ब्रॅण्डला पाच वर्षे पूर्ण झाली.
पाच वर्षपूर्तीसाठी म्हणून बरेच काय काय योजले होते. ते करोनाच्या संकटामुळे गळपटले.
सगळ्या निरूत्साही वातावरणात पाचव्या वर्षपूर्तीचे कलेक्शनही रखडले.

पण आता आपले आपणच बळ एकवटून कामाला लागण्याशिवाय पर्याय नाहीये.
पाचव्या वर्षपूर्ती कलेक्शनची तयारी जोरात चालू आहे.
लवकरच पाचवे वर्षपूर्ती कलेक्शन तुमच्या समोर येईल.

पाचव्या वाढदिवसानिमित्त माझ्या तारकामाच्या प्रवासातले टप्पे माझ्या पेजवर, फेसबुक भिंतीवर, इन्स्टावर टाकले होते.
हे काम करत राहणे हा माझ्या आनंदाचा भाग आहे. दाखवणे हा ही. ते सर्व टप्पे याच धाग्यात आहेत.

Keywords: 

कलाकृती: 

Macramé - मॅक्रमे - दोर्‍याच्या गाठींची कला

क्रोशे करतानाच पिंटरेस्टवर मॅक्रमे बघत होते आणि एक दिवस अचानक मॅक्रमेनं नटवलेल्या बाटल्या पाहिल्या आणि धाडकन प्रेमात पडले. धीर करून मग मी देखिल एक करून पाहिली.

e5c1694f-3f53-4b1a-9d82-49b3955f3fff.jpg

b5e76dc7-2e0c-4db7-bb29-614571d8dea7.jpg

कलाकृती: 

३० दिवसांचे ओरिगामी चॅलेंज

मै वरच्या प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम चॅलेंजवरून ही कल्पना सुचली की सलग ३० दिवस काही ना काही ओरिगामीचं मॉडेल बनवायचं. अर्थात बघून - व्हिडिओ किंवा स्टेप्स. त्या निमित्ताने मी युट्युब वर सेव्ह किंवा लाईक केलेले असंख्य मॉडेल्स डोळ्याखालून घातले. एखादी गोष्ट सातत्याने करता येते का ह्याची चाचपणी झाली. सुट्टी असल्याने मी नेमके ३ वीकांत घरी नव्हते, पण जिकडे गेलो होतो तिकडे कागद घेऊन गेले आणि त्याचं त्या दिवशी मॉडेल केलं.
मी केलेल्या मॉडेल्सचे फोटोज देत आहे. सगळी मॉडेल्स नेटवरून / पुस्तकातून बघून केली आहेत.

१.

Keywords: 

कलाकृती: 

कॉफी! कॉफी!! आणि कॉफी!!!

कॉफी एकेकाळी माझा वीक पॉईण्ट होता. आताही आहे पण मी दिवसात एखादा कप प्याले तर पिते.

मी आमच्या जवळच्या एका कॉफी शॉपमधे Pour Over Coffee Maker पाहिला, त्यात केलेली कॉफी प्यायले आणि मग आपण पण अशी कॉफी करायला पाहिजे असे वाटायला लागले. तेव्हाच कोणीतरी स्वतः केलेला कॉफी मेकर पाहिला आणि आपण पण तो करावा असे वाटायला लागले. एका मैत्रिणीने विकत घेतलेला होता असे कळले , तिला पिडून साईझ वगैरे मागवून घेतले इमेल मधे. आणि तीन Pour Over Coffee Maker केले. माझ्या टिचरने मनापासून पाठ थोपटली.

त्यातला १ घरात वापरते आहे , एक मैत्रिणीने विकत घेतला आणि राहिलेला एक माझ्या जुन्या एका मॅनेजरला भेट दिला.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

पाने

Subscribe to हस्तकला
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle