तर काल माझ्या नी या ब्रॅण्डला ९ वर्षे पूर्ण झाली. दर वर्षी अॅनिव्हर्सरीला मी नवीन कलेक्शन करायचे. गेल्यावर्षी काही नवीन मार्ग दृष्टीक्षेपात होता त्यामुळे नवीन कलेक्शन केले नाही. पण मग एकानंतर एक इतक्या विविध गोष्टी घडत गेल्या आणि इतके बदल झाले आयुष्यात की नी चा नवीन मार्ग वगैरे सगळ्या गोष्टी बासनात गुंडाळून ठेवाव्या लागल्या. आता मी काम परत चालू केले आहे आणि नवीन मार्ग, नवीन कल्पना यातले काहीही सोडून दिलेले नाहीये. पण या वर्षी नवीन कलेक्शन मात्र करता आले नाहीये. त्यामुळे यावर्षी थोडी वेगळ्या प्रकारे अॅनिव्हर्सरी साजरी करायचे ठरवले आहे.
7 वर्ष पूर्ण हे स्पेशल असते म्हणतात. तर त्या निमित्त मी ही थोडी नवी दिशा, नवी वाट धुंडाळायचा प्रयत्न करते आहे.
या कलेक्शनमधे दागिने नाहीत. दागिन्यांच्या पलिकडे हे माध्यम शोधायचा हा छोटासा प्रयत्न
इंग्लिशबद्दल माफ करा.
MW 02
जाल्यात मासोली - Fish in net
Steel and brass wire fish inspired by fish motif in Odisha sarees. Fish caught in copper wire net. Acrylic on canvas.
Diameter - 10.7 inches
गणेशोत्सवाचे निमित्त साधून तारचित्रांच्या प्रदेशात प्रवेश करते आहे.
सुरूवात अर्थातच श्रीगणेशाने
दोन दिवसांपूर्वी बाप्पा फॉर्मच्या स्टडीचा फोटो टाकला होता. त्या स्टडीचे पूर्णत्वाला जाणे अजून बाकी आहे. पण गणपतीचे एकच रूप थोडीच असते. ही काही वेगळी रूपे.
१. दगडावर बसवलेले गणपतीबाप्पा.
७*५ इंच.
पितळ आणि तांब्याच्या तारा.
२. अजून एक गणपती फॉर्म.
११.५*८.५ इंच
पितळेच्या तारा.