मै वरच्या प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम चॅलेंजवरून ही कल्पना सुचली की सलग ३० दिवस काही ना काही ओरिगामीचं मॉडेल बनवायचं. अर्थात बघून - व्हिडिओ किंवा स्टेप्स. त्या निमित्ताने मी युट्युब वर सेव्ह किंवा लाईक केलेले असंख्य मॉडेल्स डोळ्याखालून घातले. एखादी गोष्ट सातत्याने करता येते का ह्याची चाचपणी झाली. सुट्टी असल्याने मी नेमके ३ वीकांत घरी नव्हते, पण जिकडे गेलो होतो तिकडे कागद घेऊन गेले आणि त्याचं त्या दिवशी मॉडेल केलं.
मी केलेल्या मॉडेल्सचे फोटोज देत आहे. सगळी मॉडेल्स नेटवरून / पुस्तकातून बघून केली आहेत.