रिटायर होताना तुमच्याकडे एखादा छंद असेल तर मिळालेला मोकळा वेळ अगदी आनंदात जातो म्हणतात.
आणि ते किती खरंच आहे हे माझ्या आईकडे उमा महादेव मठकर हिच्याकडे बघितल्यावर लक्षात येईल.
आयुष्यभर तीने मुंबई महापालिका शाळांमध्ये माध्यमिक विभागात सचोटीने मराठी, इंग्रजी, इतिहास भूगोल शिकवला. तिथल्या हजारो विद्यार्थ्यांना शिस्त लावली. त्यांचं आयुष्य घडवायला जो पाया हवा तो बांधायला मदत केली. आजही अनेक विद्यार्थी तिला त्यासाठी मानतात. महापालिकेने शाळांमध्ये कॉम्प्युटर दिल्यावर ते सगळं नव्याने शिकून मुलांना शिकवलं आणि रिपोर्ट वगैरे बनवले. आणि हे सगळं चांगलं काम नोंदवून घेत मुंबई महापालिकेकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार तिला दिला गेला . ही एक खूप अभिमानाची गोष्टं होती. हे सगळं करताना तिने तिचे चित्रकला आणि हस्तकला हे छंद मात्र अविरत सुरू ठेवले.
60 व्या वर्षी रिटायर झाल्यावर तिने या छंदाला भरपूर वेळ द्यायला सुरुवात केली आणि घरात सगळीकडे तिचे पेंटिंग्ज , हस्तकला दिसायला लागले. रोज सकाळी दहाच्या आधी सगळं घरकाम आटपून ती नवीन काहीतरी करायला घेते. ते कधी रंगकाम असतं, कधी हस्तकला , कधी शिवणकाम असतं. चित्र रेफरन्स इंटरनेट वरून शोधणे त्याचे प्रिंट घेणे मग त्याचं कशावर काय करायचं हे ठरवणे हे ती करते. त्यासाठी लागणारे प्रिंट आणणे , इतर साहित्य आणणे, फ्रेम , कापड आणून देणे यात बाबा तिला सहाय्य करतात.
एकदा कशावर कोणतं चित्र करायचं हे ठरवलं की मग ते पूर्ण होईपर्यंत ती त्याचाच ध्यास घेते. कधी भिंतीवरच्या फ्रेम्स असतात, कधी चादरी, साडी , टीशर्ट, टॉप्स रंगले जातात तर कधी ग्रीटिंग कार्ड्स असतात. या वस्तू अमच्याघरी लावल्या जातात किंवा प्रेमाने गिफ्ट म्हणूनही दिल्या जातात.
एक काम पूर्ण झालं की दुसरं असं सातत्याने ती करत राहाते. आज 74व्या वर्षीही ती तितक्याच उत्साहाने तिची रोजची कला साधना सुरू आहे.
यावर्षी या कलासाधनेचा उत्सव म्हणून काम करतानाचे किंवा तयार वस्तूंचे व्हिडीओ रेकॉर्ड करून युट्यूब चॅनल सुरू करूयात अशी माझ्या भावाची कल्पना होती. आणि त्यावर त्याने काम सुरू केलं , सगळे व्हिडीओ रेकॉर्ड करायला घेतले. बेसिक रेकॉर्डिंग आई आणि बाबांना शिकवलं आणि त्यांच्याकडून रेकॉर्डिंग करून घ्यायला सुरुवात केली. आता जी नवीन कलाकृती बनते तिचं रेकॉर्डिंग ते दोघे स्वतः करू शकतात.
यातल्या बऱ्याच व्हिडीओचं एडिटिंग माझा 11 वर्षीय भाचा करतोय ही अजून एक अभिमानाने मिरवण्याची बाब आहे.
तर असं हे युट्युब चॅनल
कला कार्निवल - कलेचा उत्सव.
सगळ्यांनी नक्की बघा, लाईक करा, subscribe करा
https://youtube.com/@kalacarnival
#kalacarnival
#umamathkar
#artandcraft
#hobbyartist
#kalechaUtsav
#retirementgoals
#retirementpassiion