नीलूताई सध्या बिझी असल्याने धागा काढायची जबाबदारी माझ्यावर आली आहे. आय होप एखदं तरी चित्र काढायला जमावं..
तर हे आहेत ह्या इंक्टोबरचे प्रॉम्प्ट्स.. येऊद्या मस्त चित्रं!!
रिटायर होताना तुमच्याकडे एखादा छंद असेल तर मिळालेला मोकळा वेळ अगदी आनंदात जातो म्हणतात.
आणि ते किती खरंच आहे हे माझ्या आईकडे उमा महादेव मठकर हिच्याकडे बघितल्यावर लक्षात येईल.
खरं तर इन्क्टोबर सुरू होऊन आठवडा झालाय. पण यंदा कार्यबाहुल्यामुळे माझं इन्क्टोबर चित्र काढणं अगदी तळ्यात मळ्यात आहे म्हणून धागा काही काढणं झालंच नाही शिवाय यावेळचे prompts मला जरा जास्तच डेंजर वाटतायत कदाचित मला तेवढा विचार करायला वेळ मिळत नाही म्हणून असेल :Biggrin:
पण बस्कु ने आवर्जून धागा काढायलाच लावला :)
मी यावेळी काही inktober आणि काही इतीहा तर्फे आयोजित Folktober च्या prompts वर चित्रं काढेन म्हणतेय बघू कसं किती जमतंय ते.
मी दोन्ही prompts लिस्ट इथे देतंय तुम्ही पण तुम्हला जमेल तस चित्र काढा.
शीर्षक वाचून जरा गोंधळात पडला असाल ना? तुम्ही म्हणाल ईंक्टोबर झालं आता हे कसले नवीन खूळ आणलं हिनं?
तर काय झालं, सध्या फेसबुक, ईन्स्टा सगळीकडेच या हॅशटॅग खाली खूप सुंदर सुंदर चित्रे नजरेला पडतायत. ती बघून मलाही तश्या पध्दतीची चित्रे काढायचा मोह व्हायला लागला. म्ह्णून म्ह्टलं बघावं हे प्रकरण आहे तरी काय नक्की?
येत्या ४ ५ दिवसातच तोच तो आपला लाडका ऑक्टोबर सुरु होतोय आणि २०१८ पासुन मैत्रिणवर दर ऑक्टोबरला इन्क्टोबरचे वारे वाहतायत त्यालाच अनुसरुन यंदा ही ती प्रथा पाळावीच लागेल ना
पण ही प्रथा जाचक नाही हा नवनिर्मितीचा आनंद देणारी, उत्साहाने भारलेली अशी प्रथा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही तयार आहात ना इन्क्टोबर चॅलेंज साठी?? आपापली आयुधे तयार ठेवा बघू.. म्हणजे आपले स्केच बुक, पेन्स, ईन्क्स, ब्र्श ई... ३१ ऑक्टोबर पर्यंत धम्माल करु.
आता उद्या शाळा सुरु होणार म्हणून मागच्या आठवड्यात कप्पा आवरताना लेकीला तिचीच जुनी चित्रं सापडली आणि त्यातल्या चुका पण सापडल्या. त्यामुळे त्या दुरुस्त करुन त्याच कॅरॅक्टरच नविन चित्र काढलं आहे. ह्या वेळी पहिल्यांदाच तिला काय वाटलं जुनी चित्र सापडल्यावर आणि हे नविन काढताना ते पण तिने व्हिडीओ मध्ये सांगितल आहे.
नक्की बघा :)
०.१२ नंतर दिसतोय व्हिडीओ काहीतरी अपलोड करताना गडबड झाली आहे.