बर्याच मैत्रीणींना माहीत असेलच तरीपण परत एकदा सांगते.
मध्यंतरी आं.जा वरील एका पोस्टने आमचे डोके सटकले. तर ते सटकलेले डोके ताळ्यावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न...
Julio Cesar नावाच्या ब्राझिलियन आर्टिस्टची चित्र पाहण्यात आली, कुठलाही फोटो बघून त्या माणसाचं व्यंगचित्र काढण्यात त्याची हातोटी आहे आणि ती चित्र फोटोपेक्षा अफाट सुंदर आहेत.
त्यातलंच हे एक चित्र माझ्या डोक्यात घर करून राहिलं आणि शेवटी उतरवलंच कागदावर..
मला काही भारी चित्र काढता येत नाही. पण मला चित्रं काढायला मात्र भारी आवडते!! :heehee:
आईने व्हॉट्सॅपवर ही स्केचेस पाठवली अन विस्मरणात गेलेल्या कितीतरी गोष्टी आठवल्या! मी सदोदित कुठल्यातरी पुस्तकातून पाहून चित्रे काढायचे. मजा होती एकदम!! ही सगळी १२ एक वर्षं जुनी आहेत. माझी चित्रकला आता ह्याहीपेक्षा खराब झाली आहे. :) एनीवे- हसू नका बरे!
(शेवटचे सगळ्यात भारी मी नाही काढलेले. माझी चित्रकार मैत्रीण मला शिकवत होती)