'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
"हाती आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत :डोळामारा: