थोडी टेक्निकल माहिती - झाकणाची भांडी बनवणे खुप नजाकतीचे काम असते. भांडे बनवायचे, त्याच्या गळ्याचे माप घ्यायचे. मग झाकण बनवताना ते माप सतत चेच्क करत रहायचे. मग त्याला वरचा दांडा (गोळा / नॉब ) लावायचा. आणि दोन वेळा भाजायचे. यात दुसर्या भाजण्यात जर ग्लेझ थोडाजरी गळाला, जास्त झाला तरी ते झाकण भांड्यापासून सुटे होत नाही. कधी कधी ते काढताना फुटते. कधी पूर्ण बरणी / कॅसेरोल फुटु शकतो. तर अशा अनेक प्रकारच्या परिक्षांमधून पास झालेल्या काही बरण्या तुमच्या समोर आणातेय.
मला आता जवळपास १२ वर्षे होत आली कुंभारकाम करायला लागून पण त्यातली एकुण ६-७ वर्षेच सलग काम केले. याकाळात बरेच वेगवेगळे प्रयोग केले. निरनिराळ्या प्रकारची माती, वेगवेगळे रंग वापारून पाहिले, वेगळ्या प्रकारचे फायरिंग टेक्निक पण वापरून पाहिले. आता नवीन काय करते असे विचारले तर निरनिराळे सेट्स करते आहे. म्हणजे एकसारखे ४ कप, एक सारखे राईस बाऊल्स, एकातले एक असे मिक्सिंग बाऊल्स, झाकणाचे केसेरोल बाऊल्स असे करते.
Pottery तीन प्रकारे मुख्यत्वे केली जाते -
१. व्हील थ्रोन
२. Slab Work
३. Coil Work
"हाती आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत :डोळामारा: