कुंभारकाम

कॉफी! कॉफी!! आणि कॉफी!!!

कॉफी एकेकाळी माझा वीक पॉईण्ट होता. आताही आहे पण मी दिवसात एखादा कप प्याले तर पिते.

मी आमच्या जवळच्या एका कॉफी शॉपमधे Pour Over Coffee Maker पाहिला, त्यात केलेली कॉफी प्यायले आणि मग आपण पण अशी कॉफी करायला पाहिजे असे वाटायला लागले. तेव्हाच कोणीतरी स्वतः केलेला कॉफी मेकर पाहिला आणि आपण पण तो करावा असे वाटायला लागले. एका मैत्रिणीने विकत घेतलेला होता असे कळले , तिला पिडून साईझ वगैरे मागवून घेतले इमेल मधे. आणि तीन Pour Over Coffee Maker केले. माझ्या टिचरने मनापासून पाठ थोपटली.

त्यातला १ घरात वापरते आहे , एक मैत्रिणीने विकत घेतला आणि राहिलेला एक माझ्या जुन्या एका मॅनेजरला भेट दिला.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

कुंभारकामातले प्रयोग - लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

दोन वर्षांपूर्वी दिवाळीनिमित्तने एक प्रयोग केला होता दिवे बनवायचा. त्यात थोड्या पणत्या टाईप वाट्या केल्या त्यात टी कँडल्स लावता येतील अशा तर्हेने पण अशा कँडल्स उघड्यावर ठेवणे इथे अगदीच शक्य नाही कारण दिवाळीत बरेचदा इथे वारे वगैरे असते. मग त्यातुन सुचलेली कल्पना म्हणजे हा दिवा -
Diva-1

तोच दिवा दिवाळीदिवशी मी बाहेर ठेवलेला तो असा दिसत होता -
Diva-2

Keywords: 

कलाकृती: 

अगं बाई! बरण्या?

थोडी टेक्निकल माहिती - झाकणाची भांडी बनवणे खुप नजाकतीचे काम असते. भांडे बनवायचे, त्याच्या गळ्याचे माप घ्यायचे. मग झाकण बनवताना ते माप सतत चेच्क करत रहायचे. मग त्याला वरचा दांडा (गोळा / नॉब ) लावायचा. आणि दोन वेळा भाजायचे. यात दुसर्‍या भाजण्यात जर ग्लेझ थोडाजरी गळाला, जास्त झाला तरी ते झाकण भांड्यापासून सुटे होत नाही. कधी कधी ते काढताना फुटते. कधी पूर्ण बरणी / कॅसेरोल फुटु शकतो. तर अशा अनेक प्रकारच्या परिक्षांमधून पास झालेल्या काही बरण्या तुमच्या समोर आणातेय.

Keywords: 

कलाकृती: 

चाय गररररररम ... मी केलेल्या कपातून!

IMG_20160828_080221-COLLAGE-01.jpeg

हे मधे केले होते. आपल्या घरी सुखाने नांदताहेत.

Keywords: 

कलाकृती: 

या चहा घ्यायला!

तर अलिकडे २ चहाच्या कपांचे सेट बनवले गिफ्ट म्हणुन. ज्यांना दिले त्यांना आवडले असे कळाले :)

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

माती, चिखल आणि कलाकृती

मला आता जवळपास १२ वर्षे होत आली कुंभारकाम करायला लागून पण त्यातली एकुण ६-७ वर्षेच सलग काम केले. याकाळात बरेच वेगवेगळे प्रयोग केले. निरनिराळ्या प्रकारची माती, वेगवेगळे रंग वापारून पाहिले, वेगळ्या प्रकारचे फायरिंग टेक्निक पण वापरून पाहिले. आता नवीन काय करते असे विचारले तर निरनिराळे सेट्स करते आहे. म्हणजे एकसारखे ४ कप, एक सारखे राईस बाऊल्स, एकातले एक असे मिक्सिंग बाऊल्स, झाकणाचे केसेरोल बाऊल्स असे करते.
Pottery तीन प्रकारे मुख्यत्वे केली जाते -
१. व्हील थ्रोन
२. Slab Work
३. Coil Work

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

Subscribe to कुंभारकाम
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle