दोन वर्षांपूर्वी दिवाळीनिमित्तने एक प्रयोग केला होता दिवे बनवायचा. त्यात थोड्या पणत्या टाईप वाट्या केल्या त्यात टी कँडल्स लावता येतील अशा तर्हेने पण अशा कँडल्स उघड्यावर ठेवणे इथे अगदीच शक्य नाही कारण दिवाळीत बरेचदा इथे वारे वगैरे असते. मग त्यातुन सुचलेली कल्पना म्हणजे हा दिवा -
तोच दिवा दिवाळीदिवशी मी बाहेर ठेवलेला तो असा दिसत होता -
त्याच प्रकारचे अजुन थोडे लहान टी लाईट होल्डर्स बनवले यावर्षी -
अजुन प्रयोगाची खुमखुमी जात नव्हती म्हणुन मग हा प्रकार केला -
बरं दिवाळी म्हणजे पार्टी आलीच नाही का? मग त्यासाठी इतर भांडी नकोत? लोणची/चटण्या ठेवायला लहान मडकी गोड दिसतात ना? मग हीच ती -
अरे चटणी लोणची झाली मग कोशिंबिरीला काय?
ही सगळी भांडी माझ्या येत्या प्रदर्शन/विक्री केंद्रावर मिळतील.