कॉफी एकेकाळी माझा वीक पॉईण्ट होता. आताही आहे पण मी दिवसात एखादा कप प्याले तर पिते.
मी आमच्या जवळच्या एका कॉफी शॉपमधे Pour Over Coffee Maker पाहिला, त्यात केलेली कॉफी प्यायले आणि मग आपण पण अशी कॉफी करायला पाहिजे असे वाटायला लागले. तेव्हाच कोणीतरी स्वतः केलेला कॉफी मेकर पाहिला आणि आपण पण तो करावा असे वाटायला लागले. एका मैत्रिणीने विकत घेतलेला होता असे कळले , तिला पिडून साईझ वगैरे मागवून घेतले इमेल मधे. आणि तीन Pour Over Coffee Maker केले. माझ्या टिचरने मनापासून पाठ थोपटली.
त्यातला १ घरात वापरते आहे , एक मैत्रिणीने विकत घेतला आणि राहिलेला एक माझ्या जुन्या एका मॅनेजरला भेट दिला.
Pour Over Coffee Maker मधे २ पार्ट असतात, एक वरची गाळणी आणि खाली कप. कप थोडा मोठा असू शकतो जर तुम्ही एकावेळी जास्त कॉफी करणार असाल तर. पण मी एका कपच्या मापाचेच केले.
ही कॉफी कशी करतात त्याची माहिती मला इथे मिळाली
विकण्यापूर्वी त्यात कॉफी नीट ड्रिप होते का ते पहाण्यासाठी काढलेले हे फोटो -