"हाती आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत :डोळामारा:
बुद्ध ....

आमचा ऑल टाइम फेव्हरेट .. डायनो

टिकी हेड पेनस्डॅन्ड

याच्या नशिबी रंग होते :-)

हे गुग्गूम पेनस्डॅन्ड..... बंगालीमध्ये घुबडाला गुग्गूम म्हणतात असं कुठेसं वाचल होत , तेंव्हा पासून आम्ही गुग्गूमच म्हणतो

दिवाळीत गिफ्ट मिळालेल्या जिरो निमो च्या पुस्तकांचा राखणदार ...

हा दिवसभर वापरलेली ज्वेलरी सांभाळणारा "डकी"

हा आईसाठी केलेला ज्वेलरीबॉक्स ..


आईला पक्के ओळखत असल्याने केलेली अरेंजमेंट..... अब वो कौन पूरा ढ्क्कन उठाये 

खजिन्याचा संदूक


आत सुवर्णमुद्राही आहेत हो..... मनात पाप असेल तर त्यांची माती होते 

हे बाबाच बर्थडे गिफ्ट ...त्याचे छोटे छोटे इलेक्ट्रॉनीक कंपोनन्ट ठेवायला ..

भातुकली खेळायला कधी मजा नाही आली पण बनवायला खूप मज्जा आली :-)


दिवाळीच्या सुट्टीत, ह्या सगळ्यांच एक छोटूस प्रदर्शन भरवल होत ..माझ्या फेंड्ससाठी :-)

त्या बुक्ससाठी स्टँडही आम्हीच बनवून रंगवलाय...तो बाहेर डोकावणारा ड्रॅगन आमचा बुकमार्क आहे..किती पुस्तक वाचून झाली ते दाखवतो तो . :-)
तुम्हीही नक्की सांगा हा ...कश्या वाटल्या माझ्या कलाकॄती :-)
