नवरात्री, दसरा, दिवाळी साठी खास रंगीत क्रोशे टीलाईट होल्डर..
मेटल वाटी आणि कँडल सहित मिळतील.. यात कँडल किंवा रेडिमेड लाईट्सही ठेवता येतात. नवरात्री, दसरा, दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळी देवासमोर सुका नैवेद्य किंवा फुलं ठेवायला उपयोग होतो. शिवाय हळदीकुंकू वाण किंवा गिफ्ट म्हणून ही उत्तम पर्याय. पूर्णपणे एकसंध आणि हाताने बनवलेले आहेत.
लॉकडाऊन सुरू झाल्यावर काही दिवस tp केला पण नंतर वेळ जाता जाईना, आजूबाजूचं वातावरण पाहुन उगाच नको ते विचार डोक्यात येऊ लागले म्हटलं आता मेंदू मेजर बिझी राहील अस काही करायला हवं. विणकाम स्ट्रेसबस्टर आहेच, म्हणून ते सुरू केलं, ताजी फुलं/हार बाप्पा साठी बंद झाले म्हणून एक छानसा हार विणला पण ते आधी केलेलंच काम होत त्यामुळे फार वेळ नाही लागला. आधी न केलेलं आणि कठीण काम हातात घ्यायचं होत, बऱ्याच दिवसांपासून हा वाघोबा विशलिस्ट मध्ये येऊन बसलेला पण लैच वेळखाऊ प्रकरण म्हणून नंतर करू नंतर करू अस म्हणत राहतच होता. मग तोच निवडला.
क्रोशे... बस नाम ही काफी है :haahaa: मैत्रीणवरच या विषयावर इतके धागे आहेत की यातुनच याच वेड दिसून येतं. वरवर टिपिकल वाटणारी कला एकदा वेड लागलं की तिचा आवाका कळतो. करावं शिकावं तितकं कमी. अशाच नवनवीन डिझाइन्स, टेक्निक शिकता शिकता हा ही प्रयोग करावासा वाटला. करता करता जमलाही आणि सगळ्यानी भरपुर कौतुकही केलं. मला स्वतः केलेले पॅटर्न लिहायची सवय अजिबातच नाहीय, करता करताच मी बरेच चेंजेस करत असते.. नेटवरचेही पॅटर्न मी 100% क्वचितच फॉलो करते माझे आयत्यावेळचे प्लस मायनसेस असतातच.
बरेच महिने चालु असलेलं प्रोजेक्ट अखेर पुर्ण झालं... खरं तर समर प्रोजेक्ट म्हणून फळांची थीम घेतलेली पण काही वैयक्तिक कारणांनी उशीर होत होत आतास झालं पुर्ण
फक्त लहान मुलांसाठीच अस नाही मोठ्या मुलीही वापरू शकतात. थीम बेस्ड पार्टीज वगैरे असतात तेव्हाही वापरता येतील. आई मुलगी, बहिणी, सख्ख्या मैत्रिणी म्हणून ही मॅचिंग करता येतील सेट. सिंगल सुद्धा छानच दिसतील. स्लीक आणि कॉम्पॅक्ट आहेत. क्लच साखळी बेल्ट लावून स्लिंग करता येतील नको तेव्हा असेच क्लच म्हणून ही वापरता येतील.
बरेच दिवस हा पॅटर्न /आयडिया डोक्यात घोळत होती. खरंतर फॅब्रिक चे करायचे होते पण हवं तसं कापड सापडेना मग म्हटलं विणूयाच पाहिजे तसं. तिकडे इतके हृचू गोळा झालेत की दिल जोरजोरात धडकतायत म्हटलं आपण ही मोहोलात सामील व्हावं. कोणाला आपल्या हृचू ला छोटंसं गिफ्ट पाठवायच असेल तर पाठवा बरं यातुन
पूर्णपणे हॅन्डमेड क्रोशे केक गिफ्ट बॉक्स... परफेक्ट गिफ्ट सोल्युशन केक लवर्स साठी. नंतर ज्वेलरी बॉक्स म्हणून ही वापरता येईल आणि रोमँटिक आठवणी कायम उजाळा देत राहतील
अजुन येतीलच लवकर :fadfad:
मैत्रिणीने राखीची ऑर्डर दिली, कधी केल्या नव्हत्या त्यामुळे धाकधूक होती मनात. करायला घेतल्या आणि प्रेमातच पडत गेले :dhakdhak: 2-4 तरी कर असं सांगितलेलं तरी बघता बघता 12 केल्या मी मजा आली. सिम्पल पण एलिगंट राख्या सगळ्याना आवडतील अशी आशा :)