कसुती हा आहे कानडी शब्द, कई (हात) व सुत (धागा) या दोन शब्दांपासून बनलेला. याचेच अजुन एक नाव म्हणजे - कर्नाटकी कशिदा. या शब्दाशी आपल्यापैकी अनेकांची ओळख
'रेशमाच्या रेघानी, लाल काळ्या धाग्यानी,
कर्नाटकी कशिदा मी काढला'
माझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.
ही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.
भाच्याचे गडग्नेर (केळवण) आहे उद्या. त्याला आम्ही सगळे मिळून पैसेच देणार आहोत, त्याच्या नवीन संसारासाठी, नवीन घरासाठी उपयोगी वस्तू घेण्यासाठी!
पण पैसे, चेक हातात देण्याएेवजी या घरात घालून देणार :)
हे समोरून. दरवाजा, दोन खिडक्या, मधोमध घंटा - तिचा उपयोग आहे हं ...
हे बाजुनी. एक मोठी खिडकी, घराला छान व्हेंटिलेशन आहे हो आमच्या. अशीच पलिकडेपण आहे हं!
इथे सगळ्या नवशिक्या, बनचुक्या, गुरू, शिष्यांनी आपापले क्रोशाकामाचे फोटो टाकावेत. शक्य असेल तर जेथून बघून केले त्या लिंका द्याव्यात. काही शंकाकुशंका असतील तर विचारविमर्श करावा.
अवल टिचरच्या हाताखाली खुप जणींनी क्रोशाचे धडे गिरवले आहेत, गिरवीत आहेत. काहींनी स्वतः इंटरेस्ट घेऊन युट्युबबरून पाहुन नवीन काय काय विणायला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर स्नोफ्लेक्स करून पाहू शकता. या साईटवर प्रचंड नमुने आहेत.
ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले
मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा, सीमा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.
एक मोठं प्रोजेक्ट पूर्ण झालं. एक्स एल साईजचे दोऱ्याचे जाकिट पूर्ण झालं. दोऱ्याचे इतके मोठे प्रथमच केले. पण मजा आली. होप तुम्हालाही आवडेल.
निळे क्रिम आहे ते नेट वरचे. तसेच करून हवे असे म्हटल्यावर थोडे टेंन्शन होते. थोडी काही मापं पण बदलायची होती. सो ट्रायल एरर होती. पण जमलं. पांढरा अॅश मी केलेला.