भाच्याचे गडग्नेर (केळवण) आहे उद्या. त्याला आम्ही सगळे मिळून पैसेच देणार आहोत, त्याच्या नवीन संसारासाठी, नवीन घरासाठी उपयोगी वस्तू घेण्यासाठी!
पण पैसे, चेक हातात देण्याएेवजी या घरात घालून देणार :)
हे समोरून. दरवाजा, दोन खिडक्या, मधोमध घंटा - तिचा उपयोग आहे हं ...
हे बाजुनी. एक मोठी खिडकी, घराला छान व्हेंटिलेशन आहे हो आमच्या. अशीच पलिकडेपण आहे हं!
ती समोरची घंटा धरून थोडं वर ओढलंत ना की छप्पर अलगद वर उचललं जाईल. (घंटेमागचे विल क्रो अलग होईल) आतलं झाकणही उघडेल अन आतला डब्यातला एेवज दिसेल. आता अजून ठेवला नाहीये, म्हणून तुम्हाला नुसताच मोकळा डबा दिसेल
आवडेल ना भाचा अन सुनेला हे पैशाचे घर? :)