ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले
मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा, सीमा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.
चेन्नईच्या शुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.
आता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.