चेन्नईच्या शुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.
आता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.
भारतातील अनेक शहरांतील, जगातील अनेक देशांतील भारतीय स्त्रिया ऑगस्टपासून ही ब्लँकेट्स विणत आहेत. प्रत्येकजण एक,एक स्क्वेअर मीटरचे ब्लँकेट विणताहेत.प्रत्येक स्त्री सदस्य किमान दोन वा त्याहून जास्त ब्लँकेट्स विणत आहेत. प्रत्येक शहरातील ब्लँकेट्स जोडली जातील. अन शेवटी ही सगळी ब्लँकेट्स चेन्नईत सोडली जातील. अशा रितीने हजारो हातांनी विणलेले वर्ड्स लार्जेस्ट ब्लँकेट 26जानेवारी 2016ला तयार होईल. गिनीजचे तज्ज्ञ येतील अन हे रेकॉर्ड तपासले आणि जाहीर केले जाईल.
हे प्रोजेक्ट इथेच संपणार नाही. यामागे एक मोठी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. एकदा हे रेकॉर्ड मान्य आणि जाहीर झाले की त्या नंतर हे मोठे ब्लँकेट पुन्हा छोट्या ब्लँकेट्स मधे रुपांतरीत केले जाईल. आणि अनाथ, गरजू लोकांना ही ब्लँकेट्स पुरवली जातील. हजारो हात हजारो गरजुंना पांघरूण घालतील.
या प्रचंड मोठ्या प्रोजेक्टमधे माझाही खारीचा वाटा आहे हे मला खूप अभिमानाचे आणि आनंदाचेही :-) माझी 82वर्षाची आईही यात सहभागी आहे. या प्रोजेक्ट मधे अगदी 8वर्षापासून 82 वर्षापर्यंतच्या स्त्रियांचा अतिशय उत्साही सहभाग आहे.
आज पुण्यातील काही जणी एकत्र आल्या. त्यातील अनेकजणी प्रथमच एकमेकींना भेटत होत्या. पण त्यांच्यातला ब्लँकेटचा समान धागा त्यांच्यातले नाते उबदार करायला पुरेसा होता :-)
या भेटीचे काही फोटो :
या प्रोजेक्ट साठी ज्यांना विणकाम करायचे आहे, अथवा आर्थिक सहाय्य द्यायचे आहे त्यांनी कृपया फेसबुक वरील MOTHER INDIA'S CROCHET QUEENS या गृपवरती संपर्क साधावा.
सध्या प्रत्येक विणणारी ब्लँकेटचा खर्च स्वत:च करते आहे. 26जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी (गिनीजच्या तज्ज्ञांना बोलावणे, तेथील स्टिडियम भाड्याने घेणे, त्या दिवशीचा इतर खर्च वगैरे साठी)स्पॉन्सरर लागणार आहेत.
आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि प्रोत्साहनही लागेल :-) आशा आहे गिनिज वर्ड रेकॉर्ड बरोबरच अनेक गरजुंपर्यंत आपल्या शुभेच्छा पोहचतील. धन्यवाद !