ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले
मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा, सीमा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.
मनात आणलं तर महिला काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. चेन्नईच्या सुबश्री नटराजन यांचे समर्थ नेतृत्वाखाली आणि अत्यंत कुशल प्रशासनाखाली अनेक अनोळखी महिला एका झेंड्या खाली एकत्र आल्या; मदर्स इंडिया क्रोशे क्विन्स! फेसबुक, व्हॉट्स अप अशा माध्यमांतून आणि प्रत्यक्ष गाठीभेटीतून हा समान धागा गुंफला गेला, आणि त्यातून विणले गेले हे जगातील सर्वात मोठे, महाप्रचंड ब्लँकेट!
सुरूवातीला केवळ 5000 स्क्वेअर मीटरचा टप्पा अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा टप्पा सहज ओलांडला गेला, नव्हे दुपटीपेक्षा जास्त संख्येने पार पडला.
या सोहळ्याची ही काही क्षण चित्रे!
सुबश्री मॅम, चेन्नईची टीम आणि जगभरातील सर्व सख्यांना खूप खूप आणि
अधिक फोटो फेसबुक वरील mother's india crochet queens या गृपवरती जरूर बघा
उपक्रमाची वाटचाल:
सुरुवात झाली ती सुबश्री नटराजन पासून. ऑगस्ट 2015 मधे तिने ही कल्पना मांडली आणि तिच्या अनेक मैत्रिणींनी ती उचलून धरली. पण हे शिवधनुष्य होते, अनेक जणींचा हातभार लागणे गरजेचे होते. जितक्या जास्तजणी सामिल होतील तितके छानच होते. मग फेसबुकचा मार्ग स्विकारला गेला. अनेकींनी आपापल्या मैत्रिणींपर्यंत हा उपक्रम पोहचविला(सप्टेंबर 2015).या उपक्रमामागचा सोशल कॉज बहुतेक जणींना स्पर्शून गेला. अन एक एक करत जवळ जवळ दोन हजार भारतीय महिला जगभरातून जोडल्या गेल्या. बहुतांशी फेसबुकवर तर काही जणी फक्त व्हॉट्स अपवरून संपर्कात होत्या.
सुबश्रीने विशिष्ट सुई, विशिष्ठ लोकरीचा प्रकार, ग्रॅनी स्क्वेअर हा पॅटर्न आणि 40*40इंचाचा(साधारण एक मीटर बाय एक मीटर)आकास एव्हढेच नियम ठेवले. रंगसंगती, त्यातील विविध डिझाईन्सची पूर्ण मुभा होती. त्यामुळे प्रत्येकीच्या क्रिएटिव्हिटीला भरपूर जागा होती.स्वाभाविकच अनेक जणींनी उत्साहाने यात सहभाग घेतला.
बहुतांशी विणणाऱ्या प्रत्येकीने लोकरीचा खर्च आपापला केला. काही लोकर स्पॉन्सर करणारेही पुढे आले, त्यांचाही उपयोग झाला. पण मोठा पार्ट सहभागी स्त्रियांनीच उचलला.
सुबश्रीचे फार कौतुक वाटते, कारण प्रत्येक स्टेजला तिने अतिशय विचारपूर्वक योजना विचार करून ठरवल्या आणि राबवल्या.
परदेश आणि राज्य पातळीवर, मोठ्या शहरांच्या पातळीवर तिने स्वतंत्र कॉऑर्डिनेटर्स नेमले. त्यांच्यामार्फत व्हॉट्स अप गृप्स करून संपर्काचे नेटवर्क उभे केले. (सप्टेंबर मिड)त्या गटांच्या महिना, पंधरा दिवसातून भेटी होत गेल्या. हळूहळू विश्वास दृढावत गेला. एकमेकींबद्दल घट्ट विण विणली गेली. मग त्या एरियातील महिलांनी एकत्र येऊन आपापली एक एक मीटरची ब्लँकेट्स जोडायला सुरुवात केली. ती करत असतानाही सुबश्रीने विचारपूर्वक नियम केले.
विक्रमाचे टार्गेट 5000स्क्वे. मी चे ठरवले होते. म्हणजेच 5000छोटी ब्लँकेट्स तयार होणे अपेक्षित होते. ही सर्व ब्लँकेट्स फायनल डेस्टिनेशन चेन्नईत असल्याने तिथे पाठवायची होती. परंतु ती सुटी सुटी पाठवली गेली तर ती तिथे जोडणे हे फारच मोठे काम झाले असते अन त्यांचे रेकॉर्ड ठेवणेही अवघड झाले असते. म्हणून सुबश्रीने 7 बाय 7अशी 49 बेबी ब्लँकेट्स जोडून एक मोठे ब्लँकेट तयार करावे आणि अशी मोठी ब्लँकेट्स चेन्नईला पाठवावीत असे सांगितले. या समान आकारामुळे फायनल जोडणीही सुकर झाली असती.
त्यामुळे प्रत्येक शहर, राज्य, देशातून अशी बिग ब्लँकेट्स तयार होऊ लागली. (नोव्हेंबर2015)आमचे एक उदाहरण सांगते. आमच्या सोसायटीमधे ओपन अँफि थिएटर आहे. तिथे भरपूर जागा असल्याने आमच्य एरियातील महिलांनी तिथे जमून एक बिग ब्लँकेट तयार केले. मग गच्चीवरती ते पसरले अन आम्हीच बघून भारावून गेलो. हे होते सात बाय सात म्हणजे 49 ब्लँकेट्सचे. अपेक्षित होते की अशी 103बिग ब्लँकेट्स जोडणे. तर चेन्नईला अशी बिग ब्लँकेट्स रवाना होऊ लागली. कधी रेल्वेतून पार्सल म्हणून कधी कोणी तिकडे जाणारे स्नेही, स्वत:बरोबर घेऊन. कधी परदेशातून विमानांनी इथल्या नातेवाईक...स्नेह्यांकडे मग हस्ते परहस्ते कॉऑर्डुनेटरकडे. अशा विविध मार्गांनी ब्लँकेटस प्रवास करत होती.
पण याच सुमारास चेन्नईमधे न भुतो न भविष्यती असा पाऊस सुरु झाला, अनेक ठिकाणी पाणी साचले, रस्ते बंद पडले. मग त्या शहरांमधे बिग ब्लँकेटस कोणाकोणाच्या घरी ठेवली गेली. पूर, पाऊस ओसरला तशी ही बिग ब्लँकेट्स हळूहळू चेन्नईला रवाना होऊ लागली.(साधारण नोव्हेंबर एंड)
ही बिग ब्लँकेट्स जोडणे हेही अतिशय मोठे काम होते. चेन्नईतील सदस्यांनी डिसेंबर2015आणि जानेवरी2016 मधे अक्षरश: दिवसरात्र ही जोडणी केली. त्यातून आमची अपेक्षा 5000ब्लँकेट्स ची होती. प्रत्यक्षात भारतीय महिलांचा उत्साह इतका दांडगा होता की दुप्पटहून जास्त बिग ब्लँकेट्स विणून तयार झाली होती. स्वाभावितच हे जोडणीचे कामही दुप्पट झाले. हॅट्स ऑफ टू ऑल वुमन्स त्यांनी 30जानेवारीला ही जोडणी पूर्ण केली. आणि 31जानेवारीला सकाळी गिनिजच्या लोकांनी मोजणी करून 11,148 स्क्वेअर मीटर मापाच्या जगातील सर्वात मोठ्या ब्लँकेटची घोषणा केली, आणि एकच जल्लोश झाला. मी तिथे प्रत्यक्ष नव्हते, पण तिथला व्हिडिओ बघताना, एेकताना माझेही डोळे भरून आले... यस वुई डिड इट thumbs up
(अजून काही तपशील निर्मला लिहू शकेल कारण ती तिथे प्रत्यक्ष गेली होती. संपदा अमेरिकेतून विणत होती, तिथले तपशीलीतले काही दुवे ती जास्त स्पष्ट करू शकेल.)