लॉकडाऊन सुरू झाल्यावर काही दिवस tp केला पण नंतर वेळ जाता जाईना, आजूबाजूचं वातावरण पाहुन उगाच नको ते विचार डोक्यात येऊ लागले म्हटलं आता मेंदू मेजर बिझी राहील अस काही करायला हवं. विणकाम स्ट्रेसबस्टर आहेच, म्हणून ते सुरू केलं, ताजी फुलं/हार बाप्पा साठी बंद झाले म्हणून एक छानसा हार विणला पण ते आधी केलेलंच काम होत त्यामुळे फार वेळ नाही लागला. आधी न केलेलं आणि कठीण काम हातात घ्यायचं होत, बऱ्याच दिवसांपासून हा वाघोबा विशलिस्ट मध्ये येऊन बसलेला पण लैच वेळखाऊ प्रकरण म्हणून नंतर करू नंतर करू अस म्हणत राहतच होता. मग तोच निवडला. वाघोबा विणायचा डोक्यात होतच पण नक्की फायनल प्रोडक्ट काय म्हणून करू सुचत नव्हतं. टॉप/टी शर्ट ला मापाच गणित लागेल म्हणून ते बारगळलं. बॅग्ज बनवायला खूपच आवडतं म्हणून शेवटी बॅगच बनवायची ठरवली. बॅगला समोरून वाघोबा होताच मागे अगदीच प्लेन ही ठेवायच नव्हतं म्हणून पट्टेरी केलं खरतर वाघाच्याच पट्ट्या करणार होते पण थ्रेड्स पुरतील की नाही याची खात्री नव्हती, लोकडाऊन मुळे ऑर्डरही करता येणार नव्हते त्यामुळे आहे त्या स्टॉक मध्येच करायचं होतं म्हणून त्यातलेच जे रंग जास्त होते ते घेतले आणि माझ्या आतापर्यंतच्या कामात न केलेलं काम म्हणजे विणलेल्या बॅगला बॅक पॉकेट मग ते ही करायच ठरवलं. सम्पूर्ण अक्रालिक यार्न असल्यामुळे बॅग सॉगी होईल अस वाटलं म्हणून मग आतुन फर्म क्विलटेड लायनिंग विथ पॉकेट्स केलं. विणलेला बेल्ट ही खेचून लूज होतो दुमडतो अस लक्षात आलं म्हणून विणलेल्या बेल्टलाही खालून रेडिमेड बेल्टचा बेस दिला. अशा रीतीने टायगर बॅग रेडी झाली. संपूर्णपणे डिजाईन करायला मजा आली. :dhakdhak:
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle