बॅग

विणलेला वाघोबा

लॉकडाऊन सुरू झाल्यावर काही दिवस tp केला पण नंतर वेळ जाता जाईना, आजूबाजूचं वातावरण पाहुन उगाच नको ते विचार डोक्यात येऊ लागले म्हटलं आता मेंदू मेजर बिझी राहील अस काही करायला हवं. विणकाम स्ट्रेसबस्टर आहेच, म्हणून ते सुरू केलं, ताजी फुलं/हार बाप्पा साठी बंद झाले म्हणून एक छानसा हार विणला पण ते आधी केलेलंच काम होत त्यामुळे फार वेळ नाही लागला. आधी न केलेलं आणि कठीण काम हातात घ्यायचं होत, बऱ्याच दिवसांपासून हा वाघोबा विशलिस्ट मध्ये येऊन बसलेला पण लैच वेळखाऊ प्रकरण म्हणून नंतर करू नंतर करू अस म्हणत राहतच होता. मग तोच निवडला.

Keywords: 

कलाकृती: 

प्रिटी वुमन

क्रोशे... बस नाम ही काफी है :haahaa: मैत्रीणवरच या विषयावर इतके धागे आहेत की यातुनच याच वेड दिसून येतं. वरवर टिपिकल वाटणारी कला एकदा वेड लागलं की तिचा आवाका कळतो. करावं शिकावं तितकं कमी. अशाच नवनवीन डिझाइन्स, टेक्निक शिकता शिकता हा ही प्रयोग करावासा वाटला. करता करता जमलाही आणि सगळ्यानी भरपुर कौतुकही केलं. मला स्वतः केलेले पॅटर्न लिहायची सवय अजिबातच नाहीय, करता करताच मी बरेच चेंजेस करत असते.. नेटवरचेही पॅटर्न मी 100% क्वचितच फॉलो करते माझे आयत्यावेळचे प्लस मायनसेस असतातच.

Keywords: 

कलाकृती: 

Subscribe to बॅग
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle