क्रोशे... बस नाम ही काफी है :haahaa: मैत्रीणवरच या विषयावर इतके धागे आहेत की यातुनच याच वेड दिसून येतं. वरवर टिपिकल वाटणारी कला एकदा वेड लागलं की तिचा आवाका कळतो. करावं शिकावं तितकं कमी. अशाच नवनवीन डिझाइन्स, टेक्निक शिकता शिकता हा ही प्रयोग करावासा वाटला. करता करता जमलाही आणि सगळ्यानी भरपुर कौतुकही केलं. मला स्वतः केलेले पॅटर्न लिहायची सवय अजिबातच नाहीय, करता करताच मी बरेच चेंजेस करत असते.. नेटवरचेही पॅटर्न मी 100% क्वचितच फॉलो करते माझे आयत्यावेळचे प्लस मायनसेस असतातच. त्यामुळे याबद्दल ही विचाराल तर मला अजिबात सांगता येणार नाही क्रॉस स्टीचच पॅटर्न मी क्रोशेत कन्व्हर्ट केलाय इतकंच सांगू शकेन
एकदा वुमन मनासारखी तयार झाल्यावर तिला नक्की कशी म्हणून समोर आणू समजत नव्हतं मग मैत्रिणींचे सल्ले घेऊन स्लिंग बॅग मध्ये रूपांतर केलं. आत लायनिंग, कप्पे केले आणि झिप लावली, झाली तयार माझी प्रिटी वुमन बॅग तयार