नवरात्री, दसरा, दिवाळी साठी खास रंगीत क्रोशे टीलाईट होल्डर..
मेटल वाटी आणि कँडल सहित मिळतील.. यात कँडल किंवा रेडिमेड लाईट्सही ठेवता येतात. नवरात्री, दसरा, दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळी देवासमोर सुका नैवेद्य किंवा फुलं ठेवायला उपयोग होतो. शिवाय हळदीकुंकू वाण किंवा गिफ्ट म्हणून ही उत्तम पर्याय. पूर्णपणे एकसंध आणि हाताने बनवलेले आहेत.
लॉकडाऊन सुरू झाल्यावर काही दिवस tp केला पण नंतर वेळ जाता जाईना, आजूबाजूचं वातावरण पाहुन उगाच नको ते विचार डोक्यात येऊ लागले म्हटलं आता मेंदू मेजर बिझी राहील अस काही करायला हवं. विणकाम स्ट्रेसबस्टर आहेच, म्हणून ते सुरू केलं, ताजी फुलं/हार बाप्पा साठी बंद झाले म्हणून एक छानसा हार विणला पण ते आधी केलेलंच काम होत त्यामुळे फार वेळ नाही लागला. आधी न केलेलं आणि कठीण काम हातात घ्यायचं होत, बऱ्याच दिवसांपासून हा वाघोबा विशलिस्ट मध्ये येऊन बसलेला पण लैच वेळखाऊ प्रकरण म्हणून नंतर करू नंतर करू अस म्हणत राहतच होता. मग तोच निवडला.
मैत्रिणीने राखीची ऑर्डर दिली, कधी केल्या नव्हत्या त्यामुळे धाकधूक होती मनात. करायला घेतल्या आणि प्रेमातच पडत गेले :dhakdhak: 2-4 तरी कर असं सांगितलेलं तरी बघता बघता 12 केल्या मी मजा आली. सिम्पल पण एलिगंट राख्या सगळ्याना आवडतील अशी आशा :)