'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.
तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.
आठ इंच व्यासाच्या आकाराचे हे वॉल हँगिंग. त्यावरची फुलं, पानं क्रोशाने विणून तयार केली अन मग कार्डबोर्डवरती कागद चिकटवून त्यावर ही फुलं पानं चिकटवली. बाजुनी लेस चिकटवली, वरून रॅपिंग प्लॅस्टिक लावले. मागे हूक म्हणून लेसचाच तुकडा चिकटवला. झाल् वॉल हँगिंग तयार :-)