जलरंग वर्कशॉपमधल्या होमवर्कचा गुलाब राहिलाच होता. टीचरने वॉर्निंग पण दिलेली :ड
तर आज तिरंगा उपक्रमाच्या निमित्ताने नारिंगी गुलाब करुन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय
मॅगी तू बोललीस तसा अजूनही हात मुक्तपणे फिरत नाहीय. हात ग्राफिककडेच वळतोय. पण प्रयत्न करतच रहाणार. :)
मॅगीच्या जलरंग वर्कशॉपमधे तिने इतके छान शिकवले की जलरंगाची भूलच पडलीय. अजून फार काही जमत नाहीये पण प्रयत्न करावासा वाटला.
निसर्गातही आपला तिरंगा कितीतरी वेळा झळकतो. कधीतरी मनात बसलेले हे चित्र, कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केलाय. झाडांचा हिरवा, आकाशाचा पांढरा, त्यात निळी नदी, लाटांमधून दिसणारे अशोकचक्र, आणि सुर्योदयाने आकाशात पसरलेला केशर! मनात खूप काय काय होतं. किती हातून उतरलं तुम्हीच सांगा
Julio Cesar नावाच्या ब्राझिलियन आर्टिस्टची चित्र पाहण्यात आली, कुठलाही फोटो बघून त्या माणसाचं व्यंगचित्र काढण्यात त्याची हातोटी आहे आणि ती चित्र फोटोपेक्षा अफाट सुंदर आहेत.
त्यातलंच हे एक चित्र माझ्या डोक्यात घर करून राहिलं आणि शेवटी उतरवलंच कागदावर..