सध्या लेक बरीच चित्र काढते त्यातली काही चित्र आणि तिच्या युट्युब चित्राचा व्हिडीओ देते आहे. तिची बरीच चित्र इमॅजिनेरी कॅरॅक्टर्स असतात.
हल्लीच एकांना त्यांच्या चॅनल साठी पण तिने छोटासा व्हिडीओ करुन दिलाय :)
माझी लेक (वय १४) डिजिटल आर्ट आणि अॅनिमेशन करण्याचा प्रयत्न करतेय. तिचा नविनच youtube चॅनल पण केला आहे. त्यावर तिने चित्र कसे काढले हे पण दिसेल.
हे तिचे आजचे चित्र
फारा दिवसाने मैत्रिणवर येतेय.. ह्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे सगळंच उलटपालट झालय.. व्यवधाने वाढलीत त्यामुळे ईथे येणं जरा कमीच झालं. :sheepish:
यापुर्वी मैत्रिणवर मी काढलेली पेन आणि इन्कची चित्रे, Zentangle चित्रे पोस्ट केली होती.... म्हणजे आतापर्यंन्त स्वान्तसुखाय चित्र काढणं चालू होते. :) तेव्हा काही मित्र-मैत्रीणीनी Zentangle किंवा चित्रे काढायला शिकवशील का विचारले होते पण हे शिकवण्याचे काम-बिम काय आपल्याला जमायच नाही म्ह्णून कधीच मनावर घेतलं नव्हतं :ड
मैत्रिणींनो... कलाजगतामधील पवित्र महिना ऑक्टोबर उजाडला आहे आणि त्यासोबत आपलं इन्क्टोबर चॅलेंज ही :ड
मला गेल्या वर्षभरात ठरवूनही हातात पेन-पेन्सिल धरण्याचे सातत्य राखता आलं नाही तर किमान हा एक महिना तरी जमतंय का बघू. :)
गेल्या वर्षी मैत्रिणवर इन्क्टोबरला उदंड प्रतिसाद मिळाला. आता यावर्षीही त्याहून जास्त प्रतिसाद येऊ देत. :)
तर चला चला पेन, ब्रश उचला आणि चित्रं काढायला सुरुवात करा.
३१ तारखेपर्यंत, ईंक वापरुन रोज एक चित्र...
नवीन मैत्रिणींनी इन्क्टोबरच्या अधिक माहितीसाठी वरील लिंक बघावी.