मैत्रिणींनो... कलाजगतामधील पवित्र महिना ऑक्टोबर उजाडला आहे आणि त्यासोबत आपलं इन्क्टोबर चॅलेंज ही :ड
मला गेल्या वर्षभरात ठरवूनही हातात पेन-पेन्सिल धरण्याचे सातत्य राखता आलं नाही तर किमान हा एक महिना तरी जमतंय का बघू. :)
गेल्या वर्षी मैत्रिणवर इन्क्टोबरला उदंड प्रतिसाद मिळाला. आता यावर्षीही त्याहून जास्त प्रतिसाद येऊ देत. :)
तर चला चला पेन, ब्रश उचला आणि चित्रं काढायला सुरुवात करा.
३१ तारखेपर्यंत, ईंक वापरुन रोज एक चित्र...
नवीन मैत्रिणींनी इन्क्टोबरच्या अधिक माहितीसाठी वरील लिंक बघावी.
परफेक्शनपेक्षा स्ट्रेस बस्टर आणि सकारात्मक उर्जेसाठी ही मोहीम आहे त्यामुळे तुम्ही जे काढाल ते गोडच असेल :)