खरं तर इन्क्टोबर सुरू होऊन आठवडा झालाय. पण यंदा कार्यबाहुल्यामुळे माझं इन्क्टोबर चित्र काढणं अगदी तळ्यात मळ्यात आहे म्हणून धागा काही काढणं झालंच नाही शिवाय यावेळचे prompts मला जरा जास्तच डेंजर वाटतायत कदाचित मला तेवढा विचार करायला वेळ मिळत नाही म्हणून असेल :Biggrin:
पण बस्कु ने आवर्जून धागा काढायलाच लावला :)
मी यावेळी काही inktober आणि काही इतीहा तर्फे आयोजित Folktober च्या prompts वर चित्रं काढेन म्हणतेय बघू कसं किती जमतंय ते.
मी दोन्ही prompts लिस्ट इथे देतंय तुम्ही पण तुम्हला जमेल तस चित्र काढा.
फारा दिवसाने मैत्रिणवर येतेय.. ह्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे सगळंच उलटपालट झालय.. व्यवधाने वाढलीत त्यामुळे ईथे येणं जरा कमीच झालं. :sheepish:
यापुर्वी मैत्रिणवर मी काढलेली पेन आणि इन्कची चित्रे, Zentangle चित्रे पोस्ट केली होती.... म्हणजे आतापर्यंन्त स्वान्तसुखाय चित्र काढणं चालू होते. :) तेव्हा काही मित्र-मैत्रीणीनी Zentangle किंवा चित्रे काढायला शिकवशील का विचारले होते पण हे शिकवण्याचे काम-बिम काय आपल्याला जमायच नाही म्ह्णून कधीच मनावर घेतलं नव्हतं :ड