उन्हें उतरलीं
एक सावली
पुढें दिठीवर थेंब नवा
या वळणाशीं
दुःख उराशीं
सूर वितळतो जणुं भगवा.
- ग्रेस (अजून कोण!)
वर्षाने शिकवल्यापासून बरेच दिवस कलर पेन्सिलने लँडस्केप करायचे होते. युट्युबवर शोधून एका चित्राचा फोटो काढून ठेवला होता. बऱ्याच दिवसांनी काल मुहूर्त मिळाला आणि करून टाकले लँडस्केप! धन्यवाद वर्षा इतक्या छान मिडियमची ओळख करून दिल्याबद्दल :)
मागच्या वर्षीपासून पेंडींग असलेलं हे चित्र आता पूर्ण केलं.
CPM म्हणजे कलर्ड पेन्सिल मॅग्झिनतर्फे दर महिन्याला चित्रांची चॅलेंजेस दिली जातात. त्यातल्या २०१६ च्या जुलै महिन्याचं हे चॅलेंज होतं.
फॅबर कॅसल कंपनीच्या क्लासिक आणि पॉलिक्रोमोस तसेच डेरवन्ट कलरसॉफ्ट या ब्रँडच्या पेन्सिल्स मी यात वापरल्यात. कागद साधाच आहे फार जाड नाही. टोमॅटोची स्कीन स्मूथ दिसणे आणि त्यावरील रंगांचे ग्रेडेशनही स्मूथ दिसणे हे फार चॅलेंजींग होते. नाहीतर टोमॅटो की सफरचंद असं होऊ शकते. :ड
कदाचित तुम्हाला माहित असेल की मी बिगिनर्ससाठी कलर्ड पेन्सिल वर्कशॉप घेत असते.
पण यावेळेस प्रथमच मी सबजेक्ट स्पेसिफिक असे वर्कशॉप घेतेय. माझ्याच घरी. जास्तीत जास्त ५ जणांचा ग्रूप असेल.
विषय आहे, फुलपाखरु. दोन तासांच्या या वर्कशॉपमध्ये आपण फुलपाखरु इन डीटेल रेखाटणार आहोत.
स्केचिंगचे बेसिक्स ठाऊक असले तर उत्तमच. सो, या शनिवारी सकाळी दोन तास वेळ असेल तर नक्की या. मजा येईल.
शाळेत असताना चित्रकलेच्या पेपरात "सूर्योदयाचा देखावा" असा विषय नेहेमी असे. त्यात दोन डोंगर, मधोमध उगवता सूर्य, कडेला नदी, उडणारे पक्षी, एक घर एक झाड असा साधारण देखावा सगळे काढायचो :) तोच देखावा मोठे झाल्यावर काढला तो असा दिसला -
इथे अनिश्काने लिहीलेले वाचून अमेझॉन वरून ब्लॉक्स व कलरिंग मटेरिअल मागवलेले घरी येउन
पडले आहे. हे वाक्य शोले मधील पिस्तौल जेल में आ चुका है ह्या अॅक्सेंट मध्येच वाचावे.
युट्रूब वर विडीओ बघत आहे.
लाकडाचे कोरलेले ब्लॉक्स, कलर च्या बाटल्या, बाइंडरचा मोठा डबा व फिक्सर ची बारकी बाटली आली आहे. पण त्याचे कसे वापरायचे ते प्रमाण दिलेले नाही. तुम्हाला काही माहिती असल्यास लिहा. मी ट्रायल एरर नी करेनच. बाकी टेक्निक व्हिडीओ वर बघितले आहे.
हैद्राबादला ब्लॉक प्रिंटींगचे मोठे केंद्र आहे व उत्तम कपडे साड्याओढण्या मिळतात. तेव्हा पासून हे करून बघायचेच होते.
२०१८ सालातले हे कलर्ड पेन्सिल माध्यमातले पहिले चित्र मी शेअर करतेय.
या वर्षी मी जास्तीत जास्त चित्रे काढण्याचा संकल्प केलाय, बघूया कसे जमतेय.
खालील चित्र 'प्लेन टायगर' (किंवा आफ्रिकन मोनार्क) जातीच्या फुलपाखराचे आहे. फुलपाखरांचा छंद मला अलिकडेच लागलाय. किंबहुना फोटोग्राफी करायला लागल्यापासून माझे फुलपाखरांकडे अंमळ जास्तच लक्ष जायला लागलेय. फोटोग्राफी करण्याचाही छंद अलिकडचाच, हेतू हा की चित्रासाठीचा रेफरन्स माझ्याकडेच हातासरशी असावा! असो.
खरतर हे आगाऊचे खरडकाम तुमास्नी दावू कि नको असं होत होतं पण बस्कुबायने लय मोटिवेट केलं तवा कुटं धीर धरुन आज फोटो टाकणार हाय मी इतं..
तशे थोपू अन इंस्टा फिंस्टावर टाकत असतो मी अदुनमदुन पण सार्यासयले दिसत नाइ ना थे.. निस्त्या लिश्टीतल्या मैत्रीणीले दिसते म्हणुन इथं टाकाचा प्रपंच..
इथल्या मोठ्या मोठ्या आर्टिश्ट मैतरणींमंदी आपलाबी एक पैसा मनलं.. घ्या जमवून..
तर..उगाच काहितरी गिरगिटणं म्हणुन सुरु केलेला हा अजुन एक छंद..
माबोवर रारने तिचं काम टाकलेलं तेव्हा लक्षात आलं कि अरे ये तो अपुनबी करता हय..पण मग तिथे धागा काढायचा राहूनच गेला..
मी 2004 मध्ये फाईन आर्ट्स चा फाउंडेशन कोर्स केला. वर्षभर असाईनमेंट्स घोटून घोटून हातावर सॉलिड हुकूमत आलेली. अगदी कशाचंही स्केच मी यु काढत असे. 2005 ला इंटिरियर ला ऍडमिशन घेतली आणि स्केचिंग जरा कमी झालं. मग जॉब , मग लग्न , मग मूल यात 12 -13 वर्ष कशी निघून गेली ते कळलं ही नाही . रेहा चा जन्म झाल्यावर मी नोकरी सोडली. असं वाटलं खूप पैसे कमावले आता थोडं थांबुया !