२०१८ सालातले हे कलर्ड पेन्सिल माध्यमातले पहिले चित्र मी शेअर करतेय.
या वर्षी मी जास्तीत जास्त चित्रे काढण्याचा संकल्प केलाय, बघूया कसे जमतेय.
खालील चित्र 'प्लेन टायगर' (किंवा आफ्रिकन मोनार्क) जातीच्या फुलपाखराचे आहे. फुलपाखरांचा छंद मला अलिकडेच लागलाय. किंबहुना फोटोग्राफी करायला लागल्यापासून माझे फुलपाखरांकडे अंमळ जास्तच लक्ष जायला लागलेय. फोटोग्राफी करण्याचाही छंद अलिकडचाच, हेतू हा की चित्रासाठीचा रेफरन्स माझ्याकडेच हातासरशी असावा! असो.
मी वर्षा. माबोवर तुम्ही कदाचित माझी कलर्ड पेन्सिल माध्यमातील चित्र पाहिली असतील.
मागील वर्षी मला काही जणांनी हे ड्रॉइंग शिकवशील का असं विचारलंही होतं, तेव्हा लगेच जमणार नव्हतं पण तेव्हापासून याबद्दल मनात घोळत होतं. तर आता या नवीन वर्षात या दिशेने मी पाउल उचलेले असून कलर्ड पेन्सिल ड्रॉईंगची बेसिक टेक्निक्स शिकवणारे चार तासांचे वर्कशॉप मी येत्या २९ जानेवारीला दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये १ ते ५ या वेळात घेत आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे.
वयोगटः वय वर्षे ७ आणि पुढे कितीही! :)
फी: रु.६०० प्रत्येकी फक्त.