शाळेत असताना चित्रकलेच्या पेपरात "सूर्योदयाचा देखावा" असा विषय नेहेमी असे. त्यात दोन डोंगर, मधोमध उगवता सूर्य, कडेला नदी, उडणारे पक्षी, एक घर एक झाड असा साधारण देखावा सगळे काढायचो :) तोच देखावा मोठे झाल्यावर काढला तो असा दिसला -
मी वर्षा. माबोवर तुम्ही कदाचित माझी कलर्ड पेन्सिल माध्यमातील चित्र पाहिली असतील.
मागील वर्षी मला काही जणांनी हे ड्रॉइंग शिकवशील का असं विचारलंही होतं, तेव्हा लगेच जमणार नव्हतं पण तेव्हापासून याबद्दल मनात घोळत होतं. तर आता या नवीन वर्षात या दिशेने मी पाउल उचलेले असून कलर्ड पेन्सिल ड्रॉईंगची बेसिक टेक्निक्स शिकवणारे चार तासांचे वर्कशॉप मी येत्या २९ जानेवारीला दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये १ ते ५ या वेळात घेत आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे.
वयोगटः वय वर्षे ७ आणि पुढे कितीही! :)
फी: रु.६०० प्रत्येकी फक्त.
मला काही भारी चित्र काढता येत नाही. पण मला चित्रं काढायला मात्र भारी आवडते!! :heehee:
आईने व्हॉट्सॅपवर ही स्केचेस पाठवली अन विस्मरणात गेलेल्या कितीतरी गोष्टी आठवल्या! मी सदोदित कुठल्यातरी पुस्तकातून पाहून चित्रे काढायचे. मजा होती एकदम!! ही सगळी १२ एक वर्षं जुनी आहेत. माझी चित्रकला आता ह्याहीपेक्षा खराब झाली आहे. :) एनीवे- हसू नका बरे!
(शेवटचे सगळ्यात भारी मी नाही काढलेले. माझी चित्रकार मैत्रीण मला शिकवत होती)