खरतर हे आगाऊचे खरडकाम तुमास्नी दावू कि नको असं होत होतं पण बस्कुबायने लय मोटिवेट केलं तवा कुटं धीर धरुन आज फोटो टाकणार हाय मी इतं..
तशे थोपू अन इंस्टा फिंस्टावर टाकत असतो मी अदुनमदुन पण सार्यासयले दिसत नाइ ना थे.. निस्त्या लिश्टीतल्या मैत्रीणीले दिसते म्हणुन इथं टाकाचा प्रपंच..
इथल्या मोठ्या मोठ्या आर्टिश्ट मैतरणींमंदी आपलाबी एक पैसा मनलं.. घ्या जमवून..
तर..उगाच काहितरी गिरगिटणं म्हणुन सुरु केलेला हा अजुन एक छंद..
माबोवर रारने तिचं काम टाकलेलं तेव्हा लक्षात आलं कि अरे ये तो अपुनबी करता हय..पण मग तिथे धागा काढायचा राहूनच गेला..
इथला अनिश्काचा झेंटँगल धागा पाहिल्यावर वाटल कि परत परत तेच टाकून तुम्ही उगा बोर होणार म्हणुन मग म्हटलं राहु देत पण बस्कुबाय आणि इतरही सार्यांनी धक्का दिल्यावर इथे मी तुम्हाला माझे काही सुरुवातीपासुन काढलेले डूडल आणि मंडल आर्ट दाखवायचं ठरवलयं..
सुरुवातीला स्क्रिबल वरुन सुरु केलेली गाडी डूडल, डिरेक्शनल डूडल, झेंटँगल आणि मंडला अशी फिरत फिरत आलीए.. सद्ध्या बरेच मंडल काढलेयत जे मी फ्रेम बनवून विकायच्या विचारात आहे.
बघु कसं जमतं ते.
हे काढण्याकरीता मी ऑक्सफोर्ड स्केच बुकचा वापर केलाय.
त्याबरोबर सुरुवातीला साधा स्केच पेन, जेल पेन आणि मग जरा हात बसल्यावर मायक्रॉन कंपनीचे वेगवेगळ्या पॉईंट्स चे पेन मी आता वापरते. जोडीला स्कायग्लोरी या कंपनीचे ०.४ मिमीचे रंगित पेन वापरते.
इथे कुणाला साधी सुरुवात करायची असल्यास मी माझे काही पॅटर्न्स तुमच्याशी शेअर करु इच्छिते.
हे पॅटर्न्स मी पूर्णपने माझे स्वतःचे आहे असे मी म्हणणार नाही पण प्रत्येकाचा हात एका विशिष्ट तर्हेने वळतो, हरेकाचं डोकं एका विशिष्ट दिशेने चालतं. या सार्यांचा तुम्ही नेहमी रेखाटता त्या लाईन्सवर खुप परिणाम होतो. म्हणुनच हरेकाचं डूडल सारखे पॅटर्न काढूनही वेगळं दिसतं..
त्याचप्रमाणे डूडल काढताना किंवा काढण्यापूर्वी तुम्ही काय विचार करत होते याचा सुद्धा इसेंस तुम्हाला तुमच्या चित्रात दिसतो.
हे पॅटर्न्स.. वास्तविक पाहता मी ढिगभर काढले आहे पण तुम्हाला जसे जसे पुढले डुडल, रेखाटनं, मंडल दाखवेल तेव्हा तुम्हालाच लक्षात येईल कि काढताना एका प्रकारच्या आकारात माझा हात जास्त वळतो.. प्रत्येकाची एक श्टाईल असतेच ना तसच.. असो..
हे काही पॅटर्न्स जे मी माझे अधिक इतरांचे बघुन काढले आहेत.
१.
२.
३.
.
.
.
यानंतर मी काही झेंटँगल काढले..
त्यावेळी मी ब्लीच नावाची अॅनिमी बघत होती सो साहजिकच त्यातल्या आवडत्या पात्राला घेऊन त्याचं डार्क शेड असणारं रुप काढलं.. हा आहे हॉलो(भूत थोडक्यात) रुपातला इचिगो कुरोसाकी..
.
.
हे मी ब्लीच च्या ट्रांस मधे असतानाच काढलेलं..मेलेम्या बकरीची खोपडी .. खरतर ब्लीच चा असर नाही हा; २०१५ मधे 'द विच' नावाचा एक चित्रपट आला होता त्यातल एक जुळं त्यांच्या फार्मवरच्या बकरी/बोकडाशी बोलत असल्याचा दावा करतं. १७शेव्या शतकात घडत असलेल्या त्या चित्रपटात ते बोकड म्हणजे शैतान, लुसिफर असतो.. ते डोक्यात असताना काढलेलं हे डूडल.. इन्स्पायर्ड आहे एका आर्टिस्ट च्या डूडलवर..
.
.
हि बया अधीच दिसली होती तेव्हा डोक्यात सगळे रंग जमा करुन म्हटल त्यांना इंद्रधनुष्याचा रंग देऊया..
.
.
मी कार्टून आहे न मला कार्टून पाहायला खुप आवडत म्हणुन परत एक नारुतो नावाच्या जपानी अॅनिमी सिरीज बघत असताना काढलेलं हे.. यातला तो लाल ढग नारुतो मधल्या विलनचा एक ग्रुप असतो आकात्सुकी त्यांचा सिंबल आहे..
.
.
.
बर्यापैकी जमल्यावर मग भारतावर अन त्यानंतर महाराष्ट्रावर आली.. पहिलं झेंटँगल म्हणता येईल तर दुसर मंडल..
.
.
.
हे हॅरी पॉटर फॅन्ससाठी.
.
.
अन हे रँगो नावाच्या अॅनिमेटेड चित्रपटातलं लीड कॅरेक्टर रँगो.
.
.
यानंतर मला संस्कृत मंडलच वेड लागलं.. मंडल म्हणजे आपल्या संस्कारभारती रांगोळ्या म्हणता येतील बस कागदावर चित्तारलेल्या.. त्या जरा सोप्याच होत्या पण माझा पहिला प्रयत्न मात्र फार बालिश होता :ड .. डूडल प्रमाणेच मंडल सुद्धा मेडिटेशनच काम करतो, हातावर असलेला कंट्रोल जरा जास्तच वाढवतो :P , अधिक कॉन्सट्रेशन पण वाढवतो. माझ्या बाबतीत म्हणाल तर सहनशक्ती पण वाढली त्यामुळे माझी . त्यातले काही मंडल शेअर करते.
.
१.
.
२.
.
३.
.
४.
.
५.
.
६.
.
७.
.
८.
.
बर्याच लोकांनी परत ते दाखवून बोर करण्याबाबत माफी मागुन माझं डूडल मंडलपुराण संपवते. :)
एक अख्खी स्केचबुक भरलीय. दुसरी अर्धी झालीय.. त्यातले सर्व दाखवता येणार नाही.. पण त्यातल्या त्यात बरे जमलेले मला आवडलेले आणि पूर्ण झालेले मी इथे शेअर केलेय. तुम्हाला आवडेल हि अपेक्षा करते. :)