मी वर्षा. माबोवर तुम्ही कदाचित माझी कलर्ड पेन्सिल माध्यमातील चित्र पाहिली असतील.
मागील वर्षी मला काही जणांनी हे ड्रॉइंग शिकवशील का असं विचारलंही होतं, तेव्हा लगेच जमणार नव्हतं पण तेव्हापासून याबद्दल मनात घोळत होतं. तर आता या नवीन वर्षात या दिशेने मी पाउल उचलेले असून कलर्ड पेन्सिल ड्रॉईंगची बेसिक टेक्निक्स शिकवणारे चार तासांचे वर्कशॉप मी येत्या २९ जानेवारीला दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये १ ते ५ या वेळात घेत आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे.
वयोगटः वय वर्षे ७ आणि पुढे कितीही! :)
फी: रु.६०० प्रत्येकी फक्त.
आज उठल्या उठल्या संघमित्राने fb वर शेअर केलेले सुंदर लँडस्केप फोटो पाहिले. त्यातलं एक composition खूपच आवडलं
दिवाळीत एक डूडल केल्यामुळे थोडा आत्मविश्वास वाढला म्हणून एक जेल पेन घेतलं आणि डूडलूनच थांबले :P
मॅगीच्या वर्कशॉपमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अॅनिमेशन शिकताना सुरुवातीला 15 दिवस चित्रकला शिकवली गेली. मला टेक्निकली चित्रकलेचे शिक्षण नव्हते. सो ते 15 दिवस खूप शिकायला मिळाले. त्या वेळी काढलेली ही स्केचेस.
शिकाऊ पातळीवरचीच आहेत, फार काही छान नाहीत. पण शेअर करावी वाटली या निमित्ताने. गोड मानून घ्या