सक्युलंट्स... ही वेड लावणारी सुंदर झाडं माझ्या बागेत चांगलीच रुजली आणि बहरली. आता त्यांचं प्रपोगेशन करणंही चांगलंच जमायला लागलंय. त्यामुळे मला त्यांच्यासाठी नवीन प्लांटर्सची म्हणजेच कुंड्यांची सातत्याने गरज भासते. यावेळी नवीन प्लांटर्स आणण्याऐवजी म्हटलं आपल्या लॉन्ग लॉस्ट छंदाला जवळ करूया. सिरॅमिक्स.
मग आणली माती आणि तयार केले हे सुक्युलंट प्लांटर्स.
छान रंगात रंगवले आणि माझ्या सक्युलंट्सना नवीन घरं मिळाली.
गेले काही दिवस डूडल्स काढायची असं ठरवत होते.
मग एके दिवशी पिन्ट्रेस्टवर डूडल्स बघितले आणि म्ह्टलं सुरू तरी करुया :)
सध्या दर १-२ दिवसांनी एक डूडल काढायचं असं ठरवलेलं आहे.
ही काही सुरूवातीची डूडल्स :)
मी गेले २ वर्षे ब्रशपण हातात घेतला नव्हता. इथे गेले २ आठवडे बरीच थंडी होती म्हणुन पॉटरी पण केली नाही. हाताला काहितरी चाळा लागतो नाहितर वेळ सगळा फोनवर काहितरी बघत वाया जातो म्हणुन हे करुन पाहिले.
कॅलिग्राफी, सुलेखन, सुंदर हस्ताक्षर असणार्या/नसणार्या/आवडणार्या/न-आवडणार्या/जमणार्या/न-जमणार्या अशा सर्वांसाठी हा धागा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
२००९ सालामध्ये "जेक पार्कर" या कलाकाराने (comics short-story creator, concept artist, illustrator, and animator) स्वत:चे चित्र-कौशल्य सुधारण्यासाठी आणि चित्रातून सकारात्मकता विकसित व्हावी या उद्देशाने "इन्क्टोबर"(Inktober) ही मोहीम चालू केली.
ही मोहीम म्हणजे ईंक(Pen and Ink) वापरुन केलेल्या चित्रांचा (drawing and illustrations) एक वार्षिक उत्सवच म्हणायला हरकत नाही. ही मोहीम त्याने ऑक्टोबर मध्ये चालू केली म्हणून ते इन्क्टोबर.