There is a beauty in imperfection वगैरे कोट्स असतात ना त्याचा आलेला हा ताजा अनुभव. वरचं before स्केच काढून झालं तेव्हा केस थोडे डार्क हवेत, ओठ जरा पातळ आलेत, डोळे जास्त मेसी झालेत, भुवया दाट झाल्यात, केस अतीच विस्कटलेत असं म्हणून ते जरा डागडुजी करायला घेतलं आणि खालचं after तयार झालं. काही कंडिशन्स डोक्यात होत्या नाहीतर असे विस्कटलेलं रुपडं असतंच की. पण यावेळी ज्या रेफरन्स वरून काढलं त्यानुसार नव्हतं. आता हुबेहूब रेफरन्स प्रमाणे काढण्याचं कौशल्य अजून अवगत नाही पण त्यातल्या त्यात जवळ जाईल इतकं काढण्याचा प्रयत्न करते. सध्या प्रमाण बरोबर येतातहेत की नाही त्यावर लक्ष देणं मला गरजेचं वाटतं. तर सगळी ठाकठुक करून झाली , फायनल झालं म्हणून फोटो काढला. काही तासांनी मोबाईल चाळताना वरचा फोटो दिसला आणि ठाकठुक केल्याचा जाम पश्चाताप झाला! मरो त्या कंडिशन्स हेच किती जास्त alive झालं होतं ..
असो, तर सेल्फ टॉट लेसन नंबर 1637873, गरज नसताना फक्त perfection साठी बदल करायला जाऊ नयेत..!
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle